Halloween Costume ideas 2015

गरजूंची मदत करणे, एकमेकांचा सन्मान करणे राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक

ईद मिलन कार्यक्रम : इंजि. वाजीदअली कादरी यांचे प्रतिपादन


लातूर (प्रतिनिधी) :
मानवाने माणूस बणून जगणे गरजेचे आहे. ममत्व त्याच्या अंगी असणे गरजेचे आहे. गरजूंची मदत करणे आणि एकमेकांचा सन्मान करणे आज राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक आहे. धर्म मानवतेच्या कल्याणाची शिकवण देतात. मात्र मानवी समूहच त्यात भेळमिसळ करून जगणे अवघड बनवितो. त्यामुळे एकमेकांचा सन्मान करीत धार्मिक संवाद करणे गरजेचे असल्याचेही जमाअते इस्लामी हिंद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष इंजिनिअर वाजीद अली कादरी यांनी व्यक्त केले.  

लातूर शहर जमाअते इस्लामी हिंदतर्फे शनिवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेत ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी इंजि. कादरी बोलत होते. मंचावर मौलाना शौकत सहाब, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे. उपप्राचार्य प्रा. एस.एन. शिंदे, प्राध्यापक डॉ. रणजीत जाधव, पूर्व न्यायाधिश ड. आर.वाय.शेख, युथ विंग उस्मानपुरा बॉईजचे अलीम शेख, जमाअतचे शहराध्यक्ष अशफाक अहमद यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना इंजि. वाजीद कादरी म्हणाले, नैतिकतेला जीवनात प्रथम प्राधान्य असायला हवे. रमजानच्या महिना उच्चकोटीची नैतिकता अंगी बाळगण्याचे प्रशिक्षण देतो. सोबतच जकात, सदका, फित्रा आदींच्या माध्यमातून गरिबांप्रती आपले दायित्व निभावण्यासाठी अनिवार्य करतो. यातून आपल्यात दयेचा भाव, संयम आणि एकात्मता वाढीस लागते. ईद मिलन समारोहही एकात्मता, भाईचारा वाढविण्यास मदत करतो आणि सकारात्मक संवाद साधण्यास प्रेरित करतो. राष्ट्राच्या उभारणीत प्रत्येकाने योगदान देऊन आपले कर्तव्य बजावावे, असे आवानही वाजीद कादरी यांनी व्यक्त केले. यावेळी पूर्व न्यायाधीश ड. आर.वाय. शेख म्हणाले, लातूर शहरात सध्या काही समाजकंट खंडनी बहाद्दर दोन समाजात दरी पाडन्याचे काम करत आहेत. यांना वेळीख आवर घालणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रा. रणजीत जाधव यांनी ईदच्या माध्यमातून एकात्मता वाढीस मदत होते, असे सांगून ईद मिलन समारोहचे आयोजन सकारात्मक संवादासह एकमेकांना समजून घेण्याचे मोठे माध्यम असल्याचेही ते म्हणाले. हिन्दू-मुस्लिम भाईचारा हे लातूर चे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळे उदाहरण देऊन प्रा. एस. एन. शिंदे यांनी सांगितले. ईद मिलनमधून एकात्मता आणि भाईचारा वाढीस लागते असेही त्यांनी म्हटले. 

यावेळी रमजान महिन्यात महिनाभर जवळपास एक हजार रोजेदारांसाठी सहेरी घरोघर पोहोचविणाऱ्या युथ विंग उस्मानपुरा ग्रुपसह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे प्राचार्य महादेव गव्हाणे, प्रा.रणजित जाधव, दारूल इस्लाह उस्मानपुरा लातूर यांना सन्मानित करण्यात आले.  यावेळी संदेश विभागाचे प्रमुख युनूस पटेल,  एम.आय.शेख, अबरार मोहसीन आदींसह विविध समाजघटकातील नागरिकांची मोठी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाअते इस्लामी हिंद, युथ विंग आणि एसआयओच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर स्वादीष्ट शिरखुर्माचे आयोजन केले होते.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget