Halloween Costume ideas 2015

सूरह इब्रहिम : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२४-२५) तुम्ही पाहत नाही काय की अल्लाहने ‘पवित्र वचना’ला३४ कशाची उपमा दिली आहे? त्याची उपमा अशी आहे जणू एका चांगल्या जातीचा वृक्ष ज्याचे मूळ जमिनीत खोलवर रुजले आहे आणि फांद्या आकाशाला भिडल्या आहेत,३५ प्रत्येक क्षणी ते आपल्या पालनकत्र्याच्या आज्ञेने फळे देत आहे.३६ ही उदाहरणे अल्लाह याकरिता देत आहे की लोकांनी यापासून बोध घ्यावा.

(२६) आणि दुर्वचनाची३७ उपमा एका हलक्या प्रतीच्या झाडासारखी आहे जे जमिनीच्या पृष्ठावरून उपटून फेकले जाते, त्यांच्यासाठी कसलीच दृढता नाही.३८


३४) मूळत: `कलिमा तैयिबा' हा शब्द आला आहे. याचा अर्थ होतो,  `पवित्र वचन' म्हणजेच `सत्यवचन' व `सत्यधारणा' जे पुर्णत: वास्तविकतेवर आणि सत्यावर आधारित आहे. हे `वचन' आणि `धारणा' कुरआननुसार एकेश्वरत्वाचा स्वीकार आणि पैगंबरांना आणि ईशग्रंथांना मान्य करणे आणि परलोक जीवनाला मान्य करणे आहे. कारण कुरआन एकेश्वरत्व, पैगंबरत्व आणि परलोकजीवन यांनाच मौलिक सत्य म्हणून प्रस्तुत करीत आहे.

३५) दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ म्हणजे जमिनीपासून आकाशापर्यंतच्या सृष्टीची व्यवस्था याच सत्यतेवर आधारित आहे ज्याचा स्वीकार ईमानधारक आपल्या पवित्र महावचनात करतो. म्हणुन सृष्टीनियम या पवित्र वचनाशी सुसंगत आहे. सृष्टीतील कोणत्याच वस्तूचे मूळ किंवा प्रवृत्ती या `पवित्र महावचनाचा' (कलमे तय्यबा) इन्कार करीत नाही. सृष्टीची कोणतीच वस्तुस्थिती आणि सत्यता या पवित्र महावचनाशी (कलमे तय्यबा) विसंगत मुळीच नाही. म्हणून पृथ्वीवरील संपूर्ण व्यवस्था या पवित्र महावचनाशी (कलमे तय्यबा) सहयोग करते आणि आकाश आणि आकाशातील पूर्ण जगत त्याचे स्वागत करते.

३६) म्हणजे हे असे फलदायी महावचन आहे की जे राष्ट्र अथवा मनुष्य या पवित्र महावचनाला (कलमे तय्यबा) आपल्या जीवनप्रणालीच्या व्यवस्थेचा निर्माणाधार बनवतो, त्यास प्रत्येक क्षणी पवित्र महावचनाचे लाभदायी परिणाम प्राप्त् होतात. ते `पवित्र महावचन' (कलमे तय्यबा) विचारसरणीत, धारणेत आणि स्वभावात समृध्दी, स्वभावात संतुलन व आचरणात दृढता, चारित्र्यात पावित्र्य, आत्म्यात शुद्धता, शरीरात पावित्र्य आणि स्वच्छता, व्यवहारात मधुरता, जीवनव्यवहारात सत्यता, संवादात सत्यप्रियता, वचनात दृढता, मामल्यात सद्व्यवहार, संस्कृतीत महानता, सभ्यतेमध्ये संतुलन, व्यवसायामध्ये न्याय आणि सहानुभूती, राजनीतीमध्ये ईमानदारी, युद्धामध्ये सज्जनता, संधीमध्ये निष्ठा आणि प्रतिज्ञेमध्ये दृढता निर्माण करते. `पवित्र महावचन' (कलमे तय्यबा) हे एक असे पारस आहे ज्याचा प्रभाव एखाद्याने व्यवस्थित स्वीकारला तर त्याचे सोने बनण्यास वेळ लागत नाही.

३७) हा शब्द ``कलमे खबीसा'' (असत्य वचन, अपवित्र वचन, मार्गभ्रष्ट वचन, चुकीची धारणा) पवित्र महावचन (कलमे तय्यबा) या शब्दाचा विरुद्ध अर्थी आहे. याला प्रत्येक असत्य आणि चुकीच्या गोष्टीसाठी वापरले जाते. परंतु येथे यापासून तात्पर्य ती प्रत्येक असत्य धारणा आहे ज्यावर मनुष्य आपल्या जीवनव्यवस्थेचा पाया ठेवतो. मग ती नास्तिकता असो, अनीश्वरत्व असो, अनेकेश्वरत्व असो किंवा मूर्तीपूजा असो, व्यक्तीपूजा असो तसेच अशी विचारसरणी जी पैगंबरांद्वारा आलेली नाही. 

३८) म्हणजे असत्य धारणा वास्तविकतेविरुद्ध आहे म्हणून प्रकृती नियम याच्याशी कोठेही मेळ खात नाही. सृष्टीचा प्रत्येक कण न कण त्याला अस्वीकार करतो, जमीन व आकाशातील  प्रत्येक वस्तू त्याचे खंडन करते. जमिनीमध्ये त्याचे बीजोरापण करण्याचा प्रयत्न झाल्यास जमीन त्यास ओकून देते. असत्य धारणेची शाखा आकाशाकडे वाढू लागली तर आकाश त्यास खाली ढकलून देतो. मनुष्याला परीक्षेसाठी निवडस्वातंत्र्य आणि कार्य करण्याची संधी दिली गेली नसती तर हे `अशुभवृक्ष' (विषवल्लीवृक्ष) कोठेच अंकुरित झाले नसते. परंतु अल्लाहने माणसाला आपल्या आवडीनुसार काम करण्याची संधी दिली आहे. म्हणून जे नादान लोक प्रकृती नियमांविरुद्ध या विषवल्लीवृक्षाची लागवड करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या धडपडीमुळे जमीन त्याला जागा देते. हवा-पाण्यापासून ते पोसले जाते आणि वातावरण त्याच्या फांद्याना पसरण्यासाठी नाईलाजास्तव काही अवसर देते. परंतु जोपर्यंत हे विषारी वृक्ष उभे असते, कडू, काटेरी आणि विषारी फळ देतच राहतो. परिस्थितीत बदल झाल्यास घटनाचक्रांच्या एका झटक्यात ते झाड मुळासकट उखडून फेकून दिले जाते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget