लोक माझे सांगाती’ या शरद पवार लिखित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात 2 मे रोजी शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली. राजीनाम्यावर जाणकार तर्कवितर्क लावत आहेत. मात्र पवारांच्या या अनपेक्षित राजीनाम्याने महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलणार एवढे मात्र खरे.
आजपासून 50-55 वर्षापूर्वी शरद पवारांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना काँग्रेस आयविरूद्ध बंड करून काँग्रेस (यू) च्या नेतृत्वाखाली पुलोद नावाची आघाडी करून वयाच्या 38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा आगळा वेगळा इतिहास त्यांनी घडविला होता. त्या क्षणापासून शरद पवार राज्याच्या राजकारणात असो की, राष्ट्राच्या राजकारणात नेहमी सक्रीय महत्त्वाची आणि अनन्यसाधारण भूमीका निभावली. तसाच ऐतिहासिक निर्णय पक्षाला निरोप देण्याची (राजकारणाला, समाज कारणाला नव्हे). दुसरी ऐतिहासिक आणि राष्ट्रीय राजकारणात भूकंप आणणारी घोषणा करून सर्वांना चकित आणि विशेष करून भाजपाला हतबल केले आहे. ते पक्षप्रमुख असताना भाजपाने जशी शिवसेनेची अवस्था केली तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था करण्याची मोहिम पूर्ण शक्तीने हाती घेतली होती. त्याचे हे स्वप्न पवारांनी धुळीस मिळविले. अजीत पवारांवर त्यांच्यासहीत राज्यातील जनतेचा विश्वास उडाला होता ते कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री व्हायला भाजपाची वाट धरणार होते? आता त्यांचे हातपायच जणू -(उर्वरित पान 7 वर)
पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेने गळाले आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी वयाच्या 65 वर्षापर्यंतही मिळाली नाही, ती संधी भाजपा शिवाय कुणी दुसऱ्या पक्षात मिळणार नव्हती. त्याचबरोबर ईडीच्या भीतीने ते ग्रस्त आहेत. ही भारतीय राजकारणाची शोकांतिका म्हणावी लागेल की देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जातेय याचा निर्णय ईडी आणि इतर वित्तीय संस्था करत आहेत. राजकारणी या संस्थेपुढे इतके हतबल झालेले आहेत की ते कधीही लोकाभिमुख योजना आणि सक्रीय राजकारण राबविण्याचा विचार सुद्धा करत नाहीत.
तसे शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि नवीन अध्यक्ष निवडीसाठी एका समितीचेही गठण केलेले असले तरी पक्ष कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आणि त्यांच्या दबावामुळे त्यांनी आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करायला 2-3 दिवसाचा वेळ मागितला. ते नक्कीच आपल्या घोषणेवर ठाम राहतील हे खात्रीने सध्या तरी सांगता येणार नाही.
पवारांनी वर उल्लेखित दोन ऐतिहासिक निर्णयाशिवाय 1999 साली आणखी एक ऐतिहासिक निर्णय सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वावरून काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. ही गोष्ट वेगळी की काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर देखील ते सदैव काँग्रेसच्या विचारांशी फारकत घेऊ शकले नाही. काँग्रेस पक्षाची साथ घेऊन दोन वेळा राज्यात सत्ता स्थापित केली. त्यांच्या राजकारणातली एक विशेष गोष्ट अशी की ते काँग्रेसपेक्षाही अधिक धर्मनिरपेक्ष राजकारण आणि सत्ताकारण करत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या बरोबर सुरूवातीला जाणारे तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा होते. एक मुस्लिम दूसरे ख्रिस्ती. त्यांच्या राजकारणातला बाणा असा की त्यांनी कधी धार्मिक उन्माद आणि द्वेषाला जवळ देखील येऊ दिले नाही. आणि म्हणूनच देशाच्या राजकारणात त्यांच्या इतका जनसामान्यांच्या हिताला, विकासाला वाहून गेलेला नेता दूसरा कोणीही नाही. देशातील सर्वश्रेष्ठ एकमेव राजकारणी म्हणजे शरद पवार. महाविकास आघाडीची स्थापना भाजपाला शह देण्यासाठी त्यांच्या इतका महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आहे की ज्यामुळे भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीसाठी संपवण्याला मदत झाली. त्यांना एकच खंत आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे. जर त्यांनी तसे केले नसते तर आज मविआची ताकद आणखीन वाढलेली असती हे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. यानंतर जर अजीत पवारांनी सुद्धा भाजपाचा हात धरला असता तर पवारांना यापेक्षा धक्का दूसरा कुणीही लावला नसता. जर शरद पवार आपल्या राजीनाम्यावर टिकूनच राहिले तर अजीत पवारांना कोणत्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश घेता येणार नाही. त्यांना जायचेच झाले तर आताच्या 54 आमदारांपैकी कमीत कमी 37 आमदारांना आपल्याबरोबर घेऊन जावे लागेल. तरच त्यांची आमदारकी टिकून राहील आणि आजच्या परिस्थितीत इतके आमदार कधीही बाहेर पडणार नाहीत हे पवारांच्या राजीनाम्यामुळे शक्य झाले आहे. याबाबत गेल्या दीड महिन्यापासून याबाबत उलट सुलट जी चर्चा चालू होती आणि भाजपाचे राष्ट्रीय नेता जितके या दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले होते. त्यांचा मोहभंग झाला.
महाविकास आघाडी बनवून शरद पवारांनी केवळ सत्ताच स्थापन केली नव्हती तर महाराष्ट्रात आपली राजकीय शक्ती उच्चशिखरावर नेली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून पुन्हा शिवसेनेवर कब्जा करून देखील राज्यात होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीत भाजपाला मविआने ज्या प्रकारे रोखले आहे आणि सतत ही शक्ती वाढत आहे. यामध्ये पवारांची भूमिका महत्त्वाची आहेच पण दूसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आपला ठसा उमटवला आहे. सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला मविआने धूळ चारली. मविआने 88 ठिकाणी सत्ता स्थापन केली. तर त्याच्या निम्म्यासुद्धा जागा भाजपा आघाडीला मिळाल्या नाहीत. बाजार समित्यांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी फार महत्त्वाच्या असतात. एक प्रकारे या निवडणुकीलां मिनी विधानसभा निवडणूक म्हटले जाते. या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की, राज्याचे शेतकरी भाजपाला भीक घालत नाहीत. त्याचबरोबर राज्यात राजकीय दृष्ट्या अस्थिरता असल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले नाही. ही एक मोठी सहकारी संस्था आहे. प्रत्येक ग्रामीण नागरिकांच्या संबंध या संस्थेशी येतो. म्हणजे ग्रामीण अर्थकारणात बाजार समित्यांच्या भूमिका नागरिकांच्या विशेषकरून ग्रामीण आणि त्याचबरोबर शेतकरी आणि कृषि उत्पन्नावर आधारित व्यापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका जिंकल्यानंतर मविआ आघाडीसमोर भाजपाचे तसेच शिंदे गटाचे राजकीय आव्हान संपुष्टात आले होते आणि अशात शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे भाजपाला आणखीन मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेने बरेच काही साध्य केले आहे. ते राजीनाम्यावर ठाम राहिले तरी किंवा निर्णय परत घेतला तरी काहीही फरक पडणार नाही. अध्यक्ष नसले तरी त्यांच्या मर्जीबाहेर कोणी जाणार नाही.
- सय्यद इफ्तेखार अहमद
Post a Comment