Halloween Costume ideas 2015

राष्ट्रीय स्तरावरील मोठे बदल


राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खडगे या वर्षी भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर नवा अवतार धारण करत आहेत. यातील सर्वंत महत्त्वाची घटना म्हणजे खडगे यांची काँग्रेस अध्यक्षपदावर निवड. एक विस्तृत आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेनंतर खडगे यांना काँग्रेसने आपला नवा अध्यक्ष निवडला आहे. खडगे काँग्रेससाठी अधिक योग्य अध्यक्ष आहेत की शशी थरुर अधिक योग्य ठरले असते हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की काँग्रेसला लोकशाही पद्धतीने अध्यक्ष मिळाल्याने गांधी परिवाराच्या विरोधकांना आता काँग्रेसवर टीका करण्याची मुभा राहिली नाही. तसे पाहता शशी थरुर अध्यक्ष झाले असते तर काँग्रेसमध्ये बरेच बदल झाले असते, जे पक्षासाठी अधिक महत्त्वाचे आहेत. ही प्रक्रिया आता लांबली पण काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता खडगे यांचे अध्यक्ष होणे यालाही तितकेच महत्त्व आहे. भारताच्या लोकशाहीने काही दिले की दिले नाही हा प्रश्न अलाहिदा, पण देशाच्या सर्वोच्च स्थानावर एक आदिवासी महिला आणि ऐतिहासिक राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी खडगे यांची वर्णी हे खरेच सराहनीय बाब आहे.

दुसरीकडे शिवसेनेत दुफळी करून एकनाथ शिंदे यांनी भला मोठा भाग भाजपसोबत नेला आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली, पण या अभूतपूर्व प्रक्रियेने दुसऱ्या प्रक्रियेला जन्म दिला ती म्हणजे उद्धव ठाकरे या एक प्रांतीय नेत्याला राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या स्थानावर जाऊन बसवले. सुरुवातीला पक्ष संपतो की काय अशीच सर्वत्र चचा होती, पण जसजसे दिवस उलटत राहिले ठाकरे यांची राजकारणावरील पकड अधिक बळकट होत गेली. लवकरच होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची खरी स्थिती पाहायला मिळणार आहे. जर या निवडणुकीत ठाकरे यांना यश मिळाले तर त्यांची पुढच्या दोन वर्षांनंतर होणार्या राज्य विधानसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील, पण हे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांवर अवलंबून राहणार आहे. काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाल्याने ह्या पक्षाचे मनोदय वाढलेले आहे. आणि म्हणून तो आपल्या भूमिकेवर फेरविचार करील आणि यामुळे सध्याच्या महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद निर्माण होतील, हे नक्की!

तिसरी घटना म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा. ह्या यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद आजपर्यंत मिळाला आले यासाठी रालुह गांधी या व्यक्तिमत्त्वापेक्षा महत्त्वाचे हे आहे की भारतीय नागरिकांना काय हवंय हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांना देशात विकासाच्या नावाखाली सांप्रदायिक द्वेष नको आहे. सर्वांना मिळून मसळून राहायचे आहे. हे त्यांचे देश आणि राष्ट्रप्रेम आहे.

त्याचबरोबर विशिष्ट विचारधारेच्या लोकांना देश आणि राष्ट्रप्रेम हे त्यांच्या विचारधारेवर अवलंबून आहे. शेवटी कोण जिंकतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. कुणालाही आपले विचार आणि त्या विचारांवर आधारित व्यवस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण मानवतेला नेमके काय हवंय हा मूळ प्रश्न आहे. आणि हा सगळा नियतीचा खेळ ठरणार.

राहुल गांधी यांना ह्या यात्रेने लोकनेता बनवले आहे, हे तथ्य कुणी आता नाकारु शकत नाही. आणि पिरवाराच्या दृष्टीने गांधी घराण्यासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे हेही सत्य आहे.

या यात्रेचा निवडणुकीशी कोणता संबंध नसल्याचा काँग्रेस पक्षाचे नेते सांगत राहिले तरी एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे सडकेवर येणे नक्कीच राजकारणावर प्रभाव टाकणारे आहे. पण आमच्या दृष्टीने हे महत्त्वाचे नाही. पक्ष कोणताही असो, त्याची विचारधारा सर्वसमावेशक असणे हे महत्त्वाचे आहे. देशाचे ऐक्य अबाधित राहावे याची सध्या गरज आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget