महिलांना आईच्या गर्भाशयापासूनच अत्याचार सहन करावे लागतात. कन्याभ्रुण हत्या हा शब्द जरी सहज उच्चारला जात असला तरी कन्याभ्रुण हत्येची प्रक्रिया आणि आफताबने श्रद्धाचे केलेले 35 तुकडे या दोहोंमध्ये गुणात्मकरित्या काहीच फरक नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या देशात अनेक मुली जन्माला येऊच शकत नाहीत. ज्या जन्माला येतात त्यांना बालपणापासूनच अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागते. पूर्वीच्या काळी महिला सतीच्या रूपांत जीवंत जाळल्या जात. आज कधी त्यांचे तुकडे केले जातात तर कधी तंदूरमध्ये भाजल्या जातात आणि हे सर्व कृत्य त्यांचे स्वतःचे बाप, भाऊ, प्रेमी, पती या अवतारातील सर्व पुरूष मंडळी करताना पहावयास मिळतात.
निया असद शेख (वय 20) या मेरठच्या सुभारती विद्यापीठात बीडीएस द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरूणीने आपला सहपाठी सिद्धांत याने असह्य अशी छेडछाड केल्याने 28 ऑ्नटोबर 2022 रोजी विद्यापीठ ग्रंथालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची तेवढी चर्चा झाली नाही जेवढी या आठवड्यात श्रद्धा वायकर हिच्या हत्येची झाली. एक आत्महत्या आणि दूसरी हत्या असली तरी दोन्ही घटनांमध्ये हाकनाक दोन तरूणी जिवाला मुकल्या. परंतु संकुचित प्रवृत्तीच्या समाजाने आत्महत्येकडे दुर्लक्ष केले आणि हत्येचा गवगवा केला. भौतिकतेवर आधारित आणि नैतिकेचा लवलेशही नसणारी ज्या प्रकारची शिक्षण आणि सामाजिकव्यवस्था देशाने स्वीकारलेली आहे, त्याचे दुष्परिणाम असेच समोर येतील, यात आश्चर्य ते कोणते? काल वानिया शेख गेली आज श्रद्धा वायकर गेली आणि लक्षात ठेवा जोपर्यंत भारतीय समाज नैतिक चौकट असलेली व्यवस्था स्वीकारणार नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार हे लिहून ठेवा.
लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे काय?
एक वयस्क स्त्री आणि एक वयस्क पुरूष लग्न न करता पती-पत्नीसारखे राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप होय. असे संबंध अनैतिक असतात परंतु बेकायदेशीर नसतात. फील इट-शट इट-अँड-फर्गेट इट अशी एकंदरित या संबंधांची रचना असते. 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा संबंधांना एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मान्यता दिली होती. तरी परंतु आजपर्यंंत या संदर्भात संसदेने कायदा केलेला नाही. लिव्ह इन रिलेशनशिप सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचा दाखला 2010 मध्ये अभिनेत्री खुशबू हिच्या, ’’लग्नापूर्वीचे लैंगिक संबंध समाजाने मान्य करायला हवेत,’’ अशा वक्तव्याविरूद्ध दाखल झालेल्या 23 याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाचे असे म्हणणे होते की, ’’ भारतात सामाजिक रचनेत विवाह ही महत्त्वाची बाब आहे. पण काही लोकांना तसं वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध योग्य असतात. त्यामुळे लोकांना आवडत नसलेले विचार मांडले म्हणून कोणाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही.’’
2006 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अंतर्गत ’व्याभिचार’ हा अदखलपात्र गुन्हा होता. 2018 मध्ये एका जनहित याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हे कलमच रद्द करून टाकले. त्यामुळे आता व्याभिचार हा भारतात गुन्हाच राहिलेला नाही. आता विवाह न करता एकत्रित राहणे हा व्यक्तीस्वातंत्र्या अंतर्गत येणारी बाब ठरलेली आहे. म्हणून या निर्णयानंतर भारतात अशा प्रकरणांना नकळत सामाजिक मान्यता मिळालेली आहे. एखादी वाईट गोष्ट समाजात रूजली की तिला सामाजिक मान्यता मिळते. लिव्ह इनचे तसेच झालेले आहे. सुरूवातीच्या काळात पापभिरू भारतीय समाजात असे संबंध स्विकार्ह नव्हते. परंतु आता यात कोणालाच वाईट वाटत नाही. अगदी मुस्लिम समाज, ज्यांचा पायाच कुराणच्या नैतिक शिकवणीवर आधारित आहे व ज्यांची विवाहसंस्था ही जगात सर्वात मजबूत समजली जाते, त्यांच्यातही तुरळक का होईना आता लिव्ह इनचे प्रकार सुरू झालेले आहेत. ज्याचा पुरावाच आफताब आमीन पुनावाला या बोहरा समाजातील (नवभारत टाईम्स या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत आफताब हा बोहरा समाजाचा आहे असे म्हटलेले आहे.) कृत्याने सिद्ध झाले आहे. आफताब आणि श्रद्धा दोघेही मुंबईचे. दोघेही अति पुरोगामी. दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेम संबंधांना मान्यता मिळाली नाही. म्हणून या जोडप्याने सरळ दिल्ली गाठली व लिव्ह इनमध्ये राहू लागले. पुढचा तपशील एव्हाना सगळ्या देशाला मुखोद्गत झालेले आहे.
लिव्ह इन रिलेशनशीपची सुरूवात कशी झाली?
साधारणपणे प्रत्येक वाईट गोष्ट सुरूवातीला युरोप आणि अमेरिकेमध्ये जन्म घेते आणि पुढे तिचा प्रचार आणि प्रसार जगभर होतो. अगदी एड्सपासून लिव्ह इन रिलेशनशीप पर्यंतच्या सर्वच वाईट चालीरिती तेथूनच आयात झालेल्या आहेत. त्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशीपची सुरूवात एका सामाजिक गरजेतून झाली होती. त्याचे असे झाले की, जेव्हा तेथे फ्री सेक्सचे वारे जोरात वाहू लागले आणि मुक्त लैंगिक संबंधांना सामाजिक मान्यता मिळाली तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम तेथील कुटुंब व्यवस्थेवर झाला. ती डळमळीत झाली व मोठ्या प्रमाणात घटस्फोट देण्याचे प्रकार सुरू झाले. घटस्फोट देतांना पतीला-पत्नीला किंवा पत्नीने पतीला (ज्याने घटस्फोट मागितला असेल त्याला) मोठी रक्कम द्यावी लागत होती. याचे ताजे उदाहरण बिल गेटस् आणि मिलिंडा गेटस् यांच्या घटस्फोटाचे आहे. बिलने घटस्फोट देतांना मिलिंडाला दोन हजार कोटी डॉलर्स अर्थात 1.60 लाख कोटी रूपये दिले होते. अशा प्रकारचे वित्तीय नुकसान टाळावे मात्र लैंगिक सुख मिळावे, यासाठी या चालाख लोकांनी लिव्ह इन रिलेशनशीप हा खुश्कीचा मार्ग पत्करला. पण भारतात लिव्ह इन रिलेशनशीपचा चुकीचा अर्थ काढला गेला. अशा संबंधांचा विपर्यास करण्यात आला. अगदी विद्यापीठात शिकणारे तरूण-तरूणी ज्यांची अर्थव्यवस्था दोघांच्या आई-वडिलांनी पाठविलेल्या पैशावर चालते, ते सुद्धा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. सर्व काही हवे पण जबाबदारी नको. या तत्वावर लिव्ह इन रिलेशनशीप आधारित असते. परंतु यात अंतिम नुकसान स्त्रीचेच होते, हे स्त्रियांच्या कसे लक्षात येत नाही याचेच आश्चर्य वाटते. कारण अशा संबंधांना विधिवत विवाह सारखे नैतिक बंधन नसल्यामुळे दाम्पत्यापैकी कोणीही या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतांना गंभीर नसतात. म्हणून या बिनबुडाच्या नातेसंबंधात असतानासुद्धा ते दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात व त्यांच्याशीही लैंगिक संबंध स्थापित करू शकतात. अशा प्रकारे लिव्ह इन रिलेशनशीपचे रूपांतर मल्टिरिलेशनशीपमध्ये होत असते. हाच प्रकार आफताब आणि श्रद्धाच्या बाबतीत झाला. आफताब मल्टिरिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत व त्या खऱ्या असण्याचीच शक्यता जास्त आहे. लिव्ह इन रिलेशनशीपचे संबंध परस्पर सामंजस्यावर आधारलेले असतात. दूसरा कुठलाही ठोस आधार नसतो आणि परस्पर सामंजस्य कधी समाप्त होईल हे कोणालाच निश्चितपणे सांगता येत नाही. या संबंधी सर्वात मोठी हास्यास्पद बाब अशी आहे की, आपले एकमेकांशी जुळेल की नाही हे पडताळून पाहण्यासाठी सुद्धा काही तरूण-तरूणी लिव्ह इन मध्ये राहतात. यापेक्षा मोठा मूर्खपणा कुठला असू शकतो? हे स्वतःची फसवणूक स्वतः करून घेण्यासारखे आहे.
महिलां ह्या कुठल्याही जाती धर्माच्या असो एकमात्र खरे की त्यांच्या नशीबी अत्याचार सहन करणे लिहिलेले आहे की काय? एवढी शंका यावी इतपत महिला अत्याचाराचे गुन्हे आपल्या देशात घडत आहेत. तीन वर्षापूर्वीच लोकमतमध्ये एक बातमी आली होती ज्यात म्हटले होते की, गेल्या 46 वर्षात महिलांवर अत्याचार एक हजार पटीने वाढलेले आहेत. ही बातमी आजही लोकमतच्या वेबसाईटवर आहे. एनसीआरबीच्या 2019 च्या आकडेवारीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, एकट्या मुंबईत महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात 2018 च्या तुलनेत 560 ने वाढ झालेली आहे. 2018 मध्ये महिलांचे विनयभंग, अपहरण, बलात्कार असे एकूण 5 हजार 978 गुन्हे दाखल होते. तर 2019 मध्ये त्यांची संख्या 6 हजार 438 एवढी होती.
महिलांना आईच्या गर्भाशयापासूनच अत्याचार सहन करावे लागतात. कन्याभ्रुण हत्या हा शब्द जरी सहज उच्चारला जात असला तरी कन्याभ्रुण हत्येची प्रक्रिया आणि आफताबने श्रद्धाचे केलेले 35 तुकडे या दोहोंमध्ये गुणात्मकरित्या काहीच फरक नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या देशात अनेक मुली जन्माला येऊच शकत नाहीत. ज्या जन्माला येतात त्यांना बालपणापासूनच अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागते. पूर्वीच्या काळी महिला सतीच्या रूपांत जीवंत जाळल्या जात. आज कधी त्यांचे तुकडे केले जातात तर कधी तंदूरमध्ये भाजल्या जातात आणि हे सर्व कृत्य त्यांचे स्वतःचे बाप, भाऊ, प्रेमी, पती या अवतारातील सर्व पुरूष मंडळी करताना पहावयास मिळतात. आठवा आरूषी तलवार हत्याकांड. श्रद्धा वायकरच्या हत्येप्रकरणी आफताब हे अर्धवट नाव घेऊन गरळ ओकून मुस्लिमांबद्दल घृणा पसरवून काही हाशील होणार नाही. आफताब हे नाव पार्शी भाषेतील असून, अनेक समुदायामध्ये हे नाव ठेवण्याची पद्धत आपल्या देशात रूढ आहे. तो मुस्लिम आहे, पार्शी आहे, का बोहरा आहे? यावर मंथन करून काहीच हाशील होणार नाही. तो एक माथेफिरू अपराधीवृत्तीचा तरूण आहे हेच खरे. आणि त्याच दृष्टिकोणातून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे. जलदगतीने कायद्याची प्रक्रिया राबवून त्याला फासावर लटकवले पाहिजे.
भारत एक बहुधर्मीय देश असून, यात हिंदू मुलगी-मुस्लिम मुलगा किंवा मुस्लिम मुलगी-हिंदू मुलगा अशी प्रेम प्रकरणे, लग्न, अवैध संबंध हे होतच राहणार ! त्याला कोणीच थांबवू शकणार नाही. म्हणून गुन्हेगाराच्या नावावर चर्चा न करता गुन्ह्याच्या घटनेवर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणे उचित ठरेल. या घटनेनिमित्त किमान लिव्ह इन रिलेशनशीपवर साधक - बाधक चर्चा झाली तर यातून भविष्यात तरूणांना किमान मार्गदर्शन तरी मिळेल. प्रतिगामी समाज असो का पुरोगामी. दोन्हींमध्ये महिलांवर अत्याचार होतातच. या अत्याचारांना रोखण्याचे मेकॅनिझम केवळ इस्लामकडे आहे, ही बाब नमूद करतांना मला कुठलाही संकोच वाटत नाही.
मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ‘‘यौन आकर्षण को अमल के बिखराव से रोखकर एक विधान में लाने का तरीका विवाह है. और विवाह के बिना संस्कृती की संरचनाही नहीं की जा सकती. अगर ऐसा हो भी जाए तो उसके टूटने, बिखरने और इन्सान को जबरदस्त अख्लाकी और मानसिक गिरावट से बचाने की कोई दूसरी श्नल संभव नहीं. इसी गरज से इस्लाम ने औरत और मर्द के तआल्लुकात को बहोत सी हदों का पाबंद करके विवाह में समेट दिया है. (संदर्भ : पर्दा, पान क्र. 182).
विवाहाची आवश्यकता
लिव्ह इन रिलेशनशीप जी एकीकडे परस्पर सामंजस्यासारख्या तकलादू पायावर उभी असते तर दूसरीकडे विवाहाला नैतिक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त असते. जो की एक मजबूत पाया आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ आणि त्या स्त्रियादेखील तुमच्याकरिता निषिद्ध आहेत ज्या इतर कोणाच्या विवाहबंधनांत असतील (मुहसनात) परंतु अशा स्त्रियांशी (विवाह करण्यामध्ये) त्या स्त्रिया अपवाद आहेत ज्या (युद्धामध्ये) तुमच्या हाती लागलेल्या असतील. हा अल्लाहचा कायदा आहे ज्याचे पालन तुमच्यावर बंधनकारक आहे. यांच्याखेरीज इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपल्या संपत्तीद्वारे प्राप्त करणे तुमच्यासाठी वैध करण्यात आले आहे, परंतु अट अशी की त्यांना विवाहाबंधनात सुरक्षित करा, असे नव्हे की तुम्ही स्वच्छंद कामतृप्ती करू लागाल. मग ज्या दांपत्यजीवनाचा आनंद तुम्ही त्यांच्यापासून घ्याल त्याच्या मोबदल्यात त्यांचे महर (स्त्रीधन) कर्तव्य समजून अदा करा. परंतु महरचा ठराव केल्यानंतर परस्परांच्या राजी-खुषीने तुमच्यामध्ये जर काही तडजोड निघाली तर त्याला काही हरकत नाही. अल्लाह सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. (सुरे निसा क्र. 4: आयत क्र.24)’’
एका ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’’तुम्ही विवाह करावा, कारण विवाह तुम्हाला परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्यापासून रोखतो आणि गुप्तांगांची सुरक्षा करण्याचा विवाह हा उत्कृष्ट उपाय आहे आणि ज्याच्यात विवाह करण्याचे सामर्थ्य नसेल त्यांनी उपवास करावेत. उपवास पुरूषाच्या वासनेला कमी करतात.’’ (हदीस : बुखारी, तिर्मिजी)
दुसऱ्या ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले की, ’’जेव्हा तुमच्यापैकी कोणी पुरूषाने एखाद्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर तिच्याबद्दल मनात आकर्षणाची भावना निर्माण झाली तर त्याने तात्काळ आपल्या पत्नीकडे जावे कारण तिच्याकडेही तेच आहे जे त्या महिलेकडे आहे.’’ (संदर्भ : तिर्मिजी)
स्त्री-पुरूषाच्या संतुलित लैंगिक संबंधांबद्दल मौलाना अबुल आला मौदूदी लिहितात, ‘‘ स्त्री -पुरूष संबंधों को लेकर कुरआन के तमाम हुक्मों और हिदायतों से शरीअत का मंशा ये है के यौनविकार के तमाम दरवाज़े बन्द कर दिए जाएं, दाम्पत्य सम्बन्धों को विवाह के दायरे में सीमित कर दिया जाए. इस दायरे के बाहर जिस हद तक संभव हो, किसी क़िस्म का यौनाचार न हो और जो यौन-प्रेरणा ख़ुद तबीयत के तक़ाज़े या किसी आकस्मिक घटना से पैदा हो उनकी तृप्ति के लिए एक केन्द्र बना दिया औरत के लिए उसका शौहर और मर्द के लिए उसकी बीवी ता के इंसान तमाम अप्राकृतिक और स्वनिर्मित उत्प्रेरकों तथा विघटन कार्यों से बचकर अपनी संचित शक्ति (उेपीर्शीींरींशव एपशीसू) के साथ सामाजिक एवं सांस्कृतिक व्यवस्था की सेवा करे और वो यौन प्रेम और यौनाकर्षण का तत्त्व, जो अल्लाह ने इस कारख़ाने को चलाने के लिए हर मर्द व औरत में पैदा किया है, पूरे का पूरा एक ख़ानदान के निर्माण करने और उसे सुदृढ़ करने में लगे. दाम्पत्य सम्बन्ध हर हैसियत से पसन्दीदा है, क्यों कि वो इंसानी प्रकृति और हैवानी प्रकृति दोनों के मंशा और ख़ुदा के क़ानून के मक़सद को पूरा करता है; और दाम्पत्य जीवन की अवहेलना हर हैसियत से नापसन्दीदा है, क्यों कि वो दो बुराइयों में से एक बुराई का वाहक अवश्य होगी.या तो इंसान प्रकृति के क़ानून के मंशा को पूरा ही न करेगा और अपनी ताक़तों को प्रकृति से लड़ने में बर्बाद करेगा, या फिर वो तबियत के तक़ाज़ों से मजबूर होकर ग़लत और नाजायज़ तरीक़ों से अपनी ख़ाहिशों को पूरा करेगा. (संदर्भ: परदा पेज नं 185) पुरूष हे पॉलिगामस प्रवृत्तीचे असतात. म्हणून इस्लामने त्यांना विवाहबंधनात राहून वेगवेगळ्या परिस्थितीत एक-दोन-तीन प्रसंगी चार विवाह करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु विवाहशिवाय कुठलेही स्त्री-पुरूष संबंध इस्लामला मान्य नाहीत. थोडक्यात लिव्ह इन रिलेशनशिप ही विवाहाला पर्याय होऊच शकत नाही.
- एम. आय. शेख
Post a Comment