डॉ. नजातुल्ला सिद्दीकी यांचे नुकतेच अमेरिकेत देहावसान झाले. ते इस्लामिक अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. इस्लामिक अर्थव्यवस्था आज जागतिक स्तरावर चार ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तिला इथपर्यंत पोहोचविण्यामध्ये डॉ. सिद्दीकी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा जन्म 1931 साली घाटकोपर मुंबई येथे झाला. मृत्यूसमयी ते आपल्या मुलांबरोबर अमेरिकेमध्ये राहत होते. त्यांनी इस्लामी अर्थशास्त्र हा विषय अलिगढ मुस्लिम विद्यापीठासह किंग अब्दुल अजीज विद्यापीठ जद्दाह मध्येही प्रदीर्घ काळापर्यत शिकविला होता. ते इस्लामिक डेव्हलपमेंट बँक जद्दाहशीही संबंधित होते. त्यांचे या विषयावर उर्दू आणि इंग्लिश भाषेमध्ये 63 पुस्तके 177 प्रकाशकांकडून प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भाषांतर पार्शियन, तुर्कीश, इंडोनेशियन, मलेशियन -(उर्वरित पान 7 वर)
आणि थाई भाषेमध्ये झाले आहे. त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक ’बँकिंग विदाऊट इंट्रेस्ट’ हे असून त्या पुस्तकाच्या 27 आवृत्त्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी अनेक डझन पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे गाईड म्हणून भारत, सऊदी अरब आणि नायजेरियन विद्यापीठांमध्ये काम केलेले आहे. त्यांना त्यांच्या या अत्युल्य सेवेबद्दल शाह फैसल अॅवार्डही भेटला होता. त्यांचा संबंध जमाअते इस्लामी हिंदशी होता. ते जमाअते इस्लामी हिंदच्या केंद्रीय सल्लागार समिती व केंद्रीय प्रतिनिधी सभेचे सदस्य होते. त्यांची खालील पुस्तकं सुद्धा बेस्ट सेलर श्रेणितील आहेत. 1. इस्लाम्स व्यूव्ह ऑन प्रॉपर्टी (1969) 2. प्रॉफिट : ए क्रिटिकल ए्नझामिनेशन (1971), 3. इकॉनॉमिक एंटरप्राईज इन इस्लाम (1972), 4. मुस्लिम इकॉनॉमिक थिंकींग (1981) 5. इश्युज इन इस्लामिक बँकिंग : सिले्नटेड पेपर्स (1983), 6. पार्टनरशिप अँड प्रॉफिट शेअरिंग इन इस्लामिक लॉ (1985), 7. इन्शुरन्स इन अॅन इस्लामिक इकॉनॉमी (1985), 8. डायलॉग इन इस्लामिक इकॉनॉमी (2002).
Post a Comment