मराठी- हिंदी साहित्यातले अनुभवी लेखक, कवी, पत्रकार इकबाल शर्फ मुकादम यांचा काव्यसंग्रह
मराठी- हिंदी साहित्यातले अनुभवी लेखक, कवी, पत्रकार इकबाल शर्फ मुकादम यांनी लेखनाची 50 वर्षे पूर्ण केली असून त्यांच्या अविरत लेखनास साजेसा मराठी काव्यसंग्रह 'धागा' मान्यवरांच्या उपस्थितीत वाशी येथे दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला.
कोकणातील दाभीळ (दापोली) येथील प्राध्यापक विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे सेवानिवृत्त भाषा विभाग प्रमुख अब्दुसत्तार दळवी हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
रउफ खतीब (कोमसाप-कार्यकारिणी, खेड) सुधीर कदम- समाज सेवक, राजेंद्र घरत- उपसंपादक- नवे शहर (वाशी), लियाकत खलफे (समाज सेवक), भिकू बारस्कर (कल्याण वाचनालय) आदि मान्यवर ‘बना विचार मंचावर‘ आसनस्थ झाले होते.
चित्रकार गणेश म्हात्रे हे रायगड जिल्यातील नामवंत कलाकार असून त्यांनी सदर काव्य संग्रहातातील प्रत्येक कवितेला साजेसे रेखाचित्र काढून कवितेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यांत आला. या क्षणी साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी इकबाल मुकादम यांच्या लेखणीस पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यामुळे आपली उपस्थिती लावली व मनस्वी शुभेच्छा दिल्या. थेट खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड येथूनही बरेच मराठी काव्यप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते.
नवी मुंबई येथील हा साहित्यिक सोहळा निशात मुकादम या त्यांच्या सुविद्य मुलीने घडवून आणला. कोलथरे, पंचनदी येथील कोकणी समाजाची विशेष उपस्थिती जाणवली. तळोजा येथील ऑलिव्ह सोसायटीचे जाणकार पदाधिकारी यांनी इकबाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . सदरच्या कार्यक्रमात उपस्थितांना पुष्प देण्याऐवजी प्रत्येकास एक- एक पेन देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे येथील लेखिका आणि कोमसाप कार्यकारीणी सदस्य डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. उपस्थितांचे निशात मुकादम यांनी आभार प्रकट केले व त्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment