आर्थिक परिभाषित आणि शास्त्रीय बाबी वेगळे करुन सरळ सरळ पद्धतीने पाहिले तर मानवाची आर्थिक समस्या आम्हाला ही दृष्टीस येते की, सभ्यतेच्या विकासाचा वेग कायम ठेवत. कशाप्रकारे सर्वच लोकापर्यंत जीवनाच्या आवश्यक वस्तू पोहोचविण्याचा प्रबंध व्हावा आणि कशाप्रकारे समाजात प्रत्येक व्यक्तीला आपले सामर्थ्य आणि योग्यतेनुसार प्रगती करणे, आपल्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करणे आणि आपल्या पूर्णतेला प्राप्त होईपर्यंतचा कालावधी उपलब्ध राहावा. प्राचीन काळात मनुष्याची आर्थिक समस्या जवळजवळ तितकीच सोपी होती, जितकी की जनावरांसाठी सोपी आहे. अल्लाहच्या या धर्तीवर जीवनाच्या अगणित वस्तू पसरलेल्या आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी जीविकेची जितकी गरज आहे ती सुद्धा पूरक प्रमाणात अस्तित्वात आहे. प्रत्येक जण आपली जिविका शोधण्यासाठी निघतो आणि तिला जिविकेच्या खजिन्यामधून प्राप्त करून घेतो. कुणाला ना त्याची किंमत चुकवावी लागते आणि त्याची रोजी कोणा दुसऱ्या प्राण्याच्या ताब्यात आहे. जवळ जवळ हीच व्यवस्था मानवाची सुद्धा होती. प्राकृतिक जीविका ती जरी फळाच्या रूपात असो अथवा शिकारीच्या प्राण्याच्या रूपात, प्राप्त करून घेतले जात होते. प्राकृतिक उत्पादनातून अंग झाकण्याचा प्रबंध करून घेतला आणि जमिनीत जिथे ही अवकाश पाहिला डोके लपवायला आणि पडून राहण्यास जागा बनवून घेतली. परंतु ईश्वराने मानवाला यासाठी निर्माण केले नव्हते की, तो अधिक काळापर्यंत याच स्थितीत राहावा. त्याने मानवामध्ये अशी प्राकृतिक प्रेरणा ठेवली होती की तो एकाकी जीवन सोडून सामूहिक जीवनाचा स्विकार करू लागला आणि आपल्या कामगिरीने आपल्यासाठी त्या साधना पेक्षा चांगले साधन निर्माण करावे जे प्रकृतीने उपलब्ध केले होते. स्त्री आणि पुरुषांमध्ये सततसंबंधाची स्वभाविक इच्छा, मानवी अपत्यांचे अधिक वेळेपर्यंत आई-वडिलांच्या पालन-पोषणाचे गरजवंत राहाणे, आपल्या वंशासंबंधी मानवाची खोलवर आवड आणि रक्तातील नात्यांशी प्रेम, या वस्तू आहेत ज्या मानवाला सामाजिकजीवन अंगी कारण्यास विवश करण्यासाठी स्वंय प्रकृतीनेच त्याच्यात ठेवून दिल्या होत्या. अशाप्रकारे मनुष्याचे आपोआप उपजनाच्या उत्पादनावर न थांबणे आणि शेती वाढीने आपल्यासाठी धान्य निर्माण करणे, पानांनी शरीर झाकणावर न थांबता, आपल्यासाठी वस्त्र तयार करणे, आपल्या गरजांसाठी यंत्राचा आविष्कार करणे, गुहा आणि भट्ट्यामध्ये राहण्यास राजी न होणे आणि आपल्यासाठी स्वतः घर बनविणे इत्यादी या सर्वांची प्रेरणा प्रकृतीनेच त्याच्या ठेवली होती. याचा सुद्धा अनिवार्य परिणाम हाच होता की हळूहळू तो सभ्य व्हावा. अंततः मनुष्य सभ्य आणि सुसंस्कृत झाला त्याच्या प्रकृतीची हीच मागणी आणि सृष्टीची हीच इच्छा होती.
अशा प्रकारे विभिन्न व्यवसायांचे निर्माण होणे, क्रय-विक्रय, वस्तूंच्या मूल्यांचे निर्धारण, मूल्यांच्या मापदंडाच्या स्वरूपावरून रुपयांचे चलन, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि आयात निर्यातीपर्यंत बाब पोहोचणे, उत्पादनाची नवीन साधने आणि यंत्रांचे वापरात येणे, मिळकतीचे अधिकार आणि वारसा हक अस्तित्व येणे हे सर्व स्वभाविक रूपाने झाले.मग नागरिकता आणि सभ्यतेच्या विकासासोबत हे आवश्यक होते की विभिन्न मनुष्यांच्या शक्तींचे आणि योग्यतेच्याआत जे अंतर प्रकृतीने ठेवले आहे, त्याच कारणामुळे काही लोकांना आपल्या मुळ गरजेपेक्षा अधिक कमावण्याची संधी मिळावी, काहींना आपल्या गरजेपुरते आणि काहींनी त्यापेक्षा कमी कमवावे.
काही लोकांना वारसाहक्कद्वारे जीवनाची सुरुवात करायला चांगली संसाधने उपलब्ध व्हावीत. काही कमी साधना सोबत आणि काहींनी विना साधनांच्या साह्याने जीवन क्षेत्रात पाय ठेवावा. प्राकृतिक कारणाने प्रत्येक लोकवस्तीत असे लोक अस्तित्वात राहावे जे अर्थार्जनाच्या कामात भाग घेण्याची आणि विनिमय कार्यात सहभागी होण्यास पूर्णपणे असमर्थ असावेत. जसे मुले, वृद्ध, आजारी आणि अपंग इत्यादी. काही लोक सेवा घेणारे आणि काही लोक सेवा करणारे असावेत आणि अशा प्रकारे मुक्त कला कौशल्य, व्यापार, कृषी आणि नोकरी तसेच मजुरीची अवस्था सुद्धा निर्माण व्हावी.
हे सर्व सुद्धा स्वंय मानवी समतेचे स्वाभाविक प्रतीक आणि प्राकृतिक भाग आहेत. या बाबींची निर्मिती होणे देखील आपल्या जागी काही गुन्हा किंवा वाईट नाही की यांच्या ऊन्मुलनाची चिंता केली जावी. सभ्यतेच्या बिघाडाच्या दुसऱ्या कारणाने जे बिघाड निर्माण करतात, त्यांच्या मौलिक कारणांना न जाणता खूप लोक घाबरून उठतात. ते कधी वैयक्तिक मिळकतीला, कधी पैशांना, कधी मशीनला, कधी मनुष्याच्या स्वभाविक समानतेला आणि कधी स्वंय सभ्यतेलाच दोष देऊ लागतात. परंतु वास्तवात रोगाचे हे निर्धारण आणि हा इलाजच चुकीचा आहे. मानव स्वभावाच्या फळ स्वरुप जो विकास होतो आणि यामुळे स्वभाविकरुपाने ज्या परिस्थिती निर्माण होतात. त्यांना थांबविण्याचा प्रत्येक प्रयत्न नादानी आहे. त्याचा परिणाम सुधारा ऐवजी सर्वनाशाची संभावना अधिक आहे. मनुष्याची वास्तविक आर्थिक समस्या हि नाही कि सभ्यतेच्या विकासाला कशाप्रकारे रोखले जावे आणि तिच्या स्वभाविक प्रतीकांना कशाप्रकारे बदलविले जावे. वास्तविक समस्या ही आहे की सभ्यतेच्या विकासाच्या स्वाभाविक गती कायम ठेवत सामाजिक अत्याचार व अन्यायाला कशाप्रकारे थांबवावे आणि निसर्गाचा हा उद्देश आहे की, प्रत्येक प्राण्याला त्याची जीविका पोहोचावी आणि त्या अडचणींना कशाप्रकारे दूर केले जावे. ज्यांच्यामुळे कित्येक लोकांची शक्ती आणि योग्यता संसाधनाचा अभाव असल्या कारणामुळे नष्ट होते.
अर्थव्यवस्थेच्या बिघाडाची कारणे
आता आपणास पाहायला हवे की आर्थिक बिघाडाची मूळ कारणे कोणती आहेत आणि कोणत्या प्रकार चे आहेत. अर्थव्यवस्थेच्या बिघडण्याचा प्रारंभ आहे अमर्याद स्वार्थी वृत्ती मग दुसरा प्रकार वैयक्तिक र्हास आणि विकृत व्यवस्थेच्या सहयोगाने ही गोष्ट वाढते आणि पसरते. इथपर्यंत की संपूर्ण अर्थव्यवस्थेला बिघडवून जीवनाच्या उर्वरित भागांमध्ये ही आपले विष पसरवून टाकते. व्यक्तिगत मिळकत आणि काही लोकांचे काही लोकांपेक्षा उत्तम आर्थिक स्थितीत असणे या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत, आणि त्यांच्यात आपल्या जागी कोणती खराबी नाही. जर मनुष्याच्या सर्व नैतिक गुणांना संतुलित रुपात संधी मिळाली असता आणि बाह्य रूपानेहि असे सरकार अस्तित्वात असते ज्याने आपल्या शक्ती ते न्यायाची स्थापना केली असती तर त्यामुळे कोणतीही खराबी निर्माण झाली नसती.परंतु ज्या कारणांनी या बिघडाना जन्म दिला, ते म्हणजे स्वभावतः ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, ते स्वार्थपरता, संकीर्णता, अदूरदर्शिता, लोभ, कंजुषी, बेइमानी आणि आपल्या इच्छांच्या पुजेत मग्न राहिले.
सैतानाने त्यांची समजूत घातली की तुमच्या वास्तविक आवश्यकतेपेक्षा अधिक जीवनाचे संसाधन जे तुम्हाला मिळतात आणि जे तुमच्या मिळकतीत आहेत, त्यांचे योग्य आणि उचित उपयोग फक्त दोनच आहेत. एक हे की यांना आपल्या सुख सुविधा, मनोरंजन आणि ऐशोआरामा मध्ये लावा आणि दुसरे हे की यांच्या आणखी अधिक संसाधनावर कब्जा करण्यासाठी उपयोग करा आणि झालेच तर त्यांच्याच मदतीने मानवांचे देव, भगवान बनवून बसा.
पहिल्या शैतानी मार्गदर्शनाचा परिणाम हा झाला की भांडवलदारांनी समाजाच्या त्या लोकांचा अधिकार मानण्यास विरोध केला जे संपत्तीच्या वाटपात हिस्सा मिळण्यापासून वंचित राहतात किंवा आपल्या मूलभूत आवश्यकता पेक्षा कमी हिस्सा मिळवतात. त्यांनी याला वैध समजले की त्या लोकांना उपासमार आणि दयनीय अवस्थेत सोडून दिले जावे. ते आपल्या संकीर्ण दृष्टीच्या कारणामुळे हे पाहू शकले नाहीत. या वागणुकीने समाजाचे बरेचसे लोक अपराधाच्या मार्गावर चालू लागतात, अज्ञान आणि नैतिक पतनाची शिकार होतात. शारीरिक अशक्तपणा आणि रोगामध्ये ग्रस्त होतात. त्यांची शारीरिक शक्ती न विकसित होऊ शकते न मानव सभ्यतेच्या विकासात आपले योगदान देऊ शकतात. त्यामुळे समस्त समाजाला सामूहिक हानी पोहोचते.
ज्याचे भांडवलदार सुद्धा एक अंग आहेत. यावरच फक्त नाही तर या संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवा मध्ये लावले जाऊ शकले असते. भांडवलदारांनी आपल्या वास्तविक आवश्यकता पेक्षा पुढे जाऊन अगणित आवश्यकताची अभिवृद्धी केली. जेंव्हा की त्या मानवांच्या योग्यतांना, सभ्यतांना आणि संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवांमध्ये लावले जाऊ शकले असते. आपल्या स्वतःच्या वाढलेल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी मानवाने वापर करण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासाठी व्याभीचार एक आवश्यकता बनली. त्यांच्यासाठी व्यभिचारिणी स्त्रिया आणि निर्लज्ज व्यक्तींचे एक सैन्य तयार झाले, त्यांच्यासाठी संगीताचीही आवश्यकता भासू लागली, यासाठी गायकांचा, नर्तक नर्तिकांचा, नृत्यांगनाचा, वादक आणि वाद्ययंत्र तयार करणार्यांचा एक गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी नाना प्रकारच्या मनोरंजनाची सुद्धा आवश्यकता होती. ज्यांच्यासाठी कथनकरांचा, चित्रकारांचा, विदूषककांचा, सोंगाड्याचा, अभिनेत्यांचा, अभिनेत्रींचा तसेच अनेक फाजील धंदेवाईकाचा आणखी एक खूप मोठा गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी शिकार सुद्धा आवश्यक होती, ज्यांच्या साठी अनेक लोकांना चांगल्या कामावर लावण्याऐवजी त्यांना जंगलांमध्ये जनावरांना हाकण्यात लावून दिले. त्यांच्यासाठी आनंदरस आणि आत्मविस्मृतीही एक गरज होती. यासाठी अनेक माणसे, दारू, कोकेन, अफिम आणि दुसरे मादक पदार्थ निर्माण करण्यावर लावले गेले, सारांश हा की सैतानाच्या या बांधवांनी एवढ्यावरच दया केली नाही तर निर्दयतेने समाजाच्या एका मोठ्या भागाला नैतिक, शारीरिक आणि अध्यात्मिक भ्रष्टतेत ग्रस्त होण्यासाठी सोडून दिले.
(क्रमशः)
(भाग - १)
-अब्दुल मजीद खान
नांदेड, Mob. 9403004232
Post a Comment