खलीफा हारुन रशीद यांनी फ्रान्सचा राजा शर्लिमन (Charlemage) यांना मेकॅनिकलचा उत्कृष्ठ नमुना असलेले स्वयंचलित घड्याळ पाठविले.
पाण्याच्या दाबाने चालविल्या जाणाऱ्या चार मीटर उंचीचे या शुद्ध पितळेच्या घड्याळातून जेव्हा एक तास होतो तेव्हा १ चेंडू बाहेर येत असे आणि दोन तासांत २ चेंडू बाहेर येत असत. अशा प्रकारे १२ तासांनंतर १२ चेंडू बाहेर येत आणि एका मधुर आवाजाने प्रत्येक चेंडूच्या मागे घोडेस्वार फिरत असे आणि परत घड्याळात जात असे.
घड्याळाची ही कृती पाहून फ्रान्सचा राजा फारच अस्वस्थ झाला आणि त्याने पादरींना, ज्योतिषांना बोलावले. प्रत्येकाने हे पाहिले आणि म्हणाले की घड्याळाच्या आत एक भूत आहे.
जेव्हा रात्री भूत झोपला असेल तेव्हा आपण घड्याळ पाहू, असा सर्वांनी सल्ला दिला.
आणि जेव्हा रात्री घड्याळ उघडून पाहिले तेव्हा त्याच्या भागांशिवाय काहीच दिसले नाही, परंतु घड्याळ बिघडले होते...
त्यावेळी संपूर्ण फ्रान्समधील एकाही व्यक्तीला ते घड्याळ दुरुस्त करता आले नाही.
आणि राजा आपल्या लाजिरवाण्या कृतीमुळे खलीफा हारून यांनादेखील मुस्लिम कारागीर पाठवण्यास सांगू शकला नाही...
मानवी इतिहासाच्या या युगात मुस्लिम सभ्यता मेकॅनिकल ऑटोमॅटिक मशिनरी युगाची जनक मानली जाते.
इब्न अल हैथम यांची कादंबरी 'water clock' मधील या उदाहरणाव्यतिरिक्त अल-मुरादी (इस्लामिक स्पेन), अल-जजारी आणि तकी अल दिन (तुर्की), रिजवान अल साती (सीरिया) अशी मोठी सूची आहे.
या कथेवरून असा बोध होतो की आज स्वत:चा द्वेष करणारे मुसलमान जे युरोपियन लोकांच्या देशद्रोही आणि अश्लील परंपरेचे पालन करण्यास उत्क्रांतीवादी प्रवृत्ती समजतात. त्यांना माहीत नाही की जेव्हा आम्हा मुस्लिमांची विज्ञानावर मक्तेदारी होती तेव्हा यूरोपियन लोक विज्ञानाला जादू समजत होते.
तेव्हा मुस्लिमांना ज्ञान आवश्यक वाटत होते. आता फक्त दाढी आणि सजद्यांवर जोर देतात.
-तसनीम नाझीम गा़जी.
Post a Comment