Halloween Costume ideas 2015

पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) : एक तेजपुंज प्रकाश

Quran

इस्लामपूर्व काळाला इस्लामी परिभाषेत ‘अज्ञानकाळ’ संबोधले जाते. या अज्ञानकाळातील रानटीपणा, पाश्‍वीपणा, अत्याचार, अन्याय अशा सर्व प्रकारच्या असंस्कृत विचारवर्तनांचे व अराजकतेचे तसेच सर्व दुर्गुणांचे प्रतिनिधित्व जणू अरबस्तानच्या वाट्याला आलेले होते. अशा या भयानक काळोखात अल्लाहने प्रेषितत्वाच्या शृंखलेतील अंतिम प्रेषित म्हणून आदरणीय मुहम्मद (स.) यांना पाठवले. ज्यामुळे अरब महाद्विपकल्पच नव्हे तर संपूर्ण जग इस्लामच्या महान शिकवणीने उजळून निघाले. याविषयी पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फर्मान आहे,“तुमच्यासाठी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ (कुरआन) आला आहे ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दर्शवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो. (सूरह अल् माइदा- 9-16)

आज निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की या जगात इस्लामव्यतिरिक्त कुणाकडेही एक न्यायोचित जीवनधारा नाही, ना असा सत्यदर्शी ग्रंथ आहे जो त्यांच्या आयुष्यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणील, ना शांती-सुरक्षिततेच्या प्रभावी व प्रबळ पद्धती आहेत ज्यामुळे ते इहलोक व परलोकात अभय प्राप्त करू शकतील, ना काळोखात खितपत पडलेल्या लाखो माणसांसाठी आशेचा असा एक प्रकाश किरण आहे की जेणेकरून त्यांचे जीवन सार्थकी लागावे. आज इस्लाम सर्व जीवनपद्धतींना पुरून उरला आहे. या संदर्भात अल्लाह म्हणतो, म्हणून जे लोक या प्रेषितावर (स.) ईमान राखतात आणि त्याचे समर्थन करतात आणि त्याला मदत करतात आणि त्या नूर (प्रकाश अर्थात कुरआन) चे अनुसरण करतात जो त्याच्यासमवेत पाठविण्यात आला आहे, असेच लोक परिपूर्ण साफल्य प्राप्त करणारे आहेत. (सूरह अल् आराफ - 157)

या आयतीच्या अंतिम शब्दांनी स्पष्ट होते की यशस्वी तर तेच लोक आहेत जे महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) वर विश्‍वास ठेवतील आणि त्यांचे अनुसरण करतील. जे लोक प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या प्रेषितत्वाला दुर्लक्ष करतील ते अपयशी लोक आहेत आणि परलोकात सुद्धा लानीच भोगणारे आहेत, मग भलेही त्यांनी या नश्‍वर जगात कितीही भैतिक प्रगती साधलेली का न असो! त्याचप्रमाणे या आयतीत  आणि त्या नूरचे अनुसरण करतात असे शब्द आले आहेत. काही लोकांच्या मते ‘नूर’ने अभिप्रेत प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. परंतु येथे आयतीनेच स्पष्ट होते की ‘नूर’ (प्रकाश) ने अभिप्रेत पवित्र कुरआन आहे, कारण आयतीत पुढे आले आहे की हे नूर त्याच्या (म्हणजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या समवेत पाठविण्यात आले आहे. परंतु ही वेगळी गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अनेक विशेषनामांत एक विशेषण ‘नूर’ सुद्धा आहे, ज्यामुळे ‘कुफ्र’ (इस्लामचा नकार) आणि ‘शिर्क’ (अनेकेश्‍वरवाद) चा अंधकार लोप पावला आणि इस्लामचा प्रकाश विस्तारला. या दृष्टिकोनातून अंति प्रेषितांच्या व्यक्तिमत्त्वात व गुणवैशिष्ट्यांत ‘नूर’चा जो स्वाभाविक गुणधर्म आहे ती एक उपमा आहे, तो प्रेषित मुहम्मद (स.) यांचा शारीरिक गुणधर्म नव्हे, जसे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना पवित्र कुरआनमध्ये ‘सिराजूम्मूनिश’ (तेजस्वी दीपक) अशा उपमेने सुद्धा अलंकृत करण्यात आलेले आहे. 

सरतेशेवटी एका मनुष्याला जर मान-सन्मानाचे, सुख-समाधानाचे आणि चिंतारहीत आयुष्य व्यतीत करावयाचे असेल तर त्याला इस्लामवर ईमान पत्करल्याशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून पवित्र कुरआनची कळकळीची हाक आहे,

तर ईमान राखा अल्लाहवर आणि त्याच्या प्रेषितावर (स.) आणि त्या प्रकाशा (कुरआन) वर जो आम्ही उतरविला आहे. (सूरह अत्तगाबून-8)



- निसार मोमीन पुणे

मो. : 9763810609


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget