औरंगाबाद :
एकमेकांना भेटणे आणि समजून घेणे, शांती आणि प्रगतीसाठी वैविध्याने नटलेल्या समाजासाठी अत्यावश्यक पाऊल आहे. हे पाऊल उचलणे आज काळाची गरज आहे, तेेव्हा-जेव्हा की देशात सामाजिक धुव्रीकरण हे एक राजकारणाचे उपकरण बनलेले आहे. याशिवाय, कोविड 19 च्या महामारीने जगातल्या 7 अब्ज लोकांमध्ये अध्यात्मिक ओढ निर्माण केलेली आहे. जगात लालसा आणि अनैतिकता मोठ्या प्रमाणात वाढली होती. आधुनिकतेच्या खोटे कारण देऊन मनुष्याला ईश्वरीय मार्गदर्शनापासून विचलित करण्यात आले होते आणि नैसर्गिक नियमांच्या विरूद्ध ईशद्रोह केला गेला होता. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात दुःख आणि विनाशामध्ये बुडाले होते.
हे राज्यव्यापी अभियान आपल्या समाजाला अज्ञानता, घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. सर्वांपर्यंत ज्ञान, समजूतदारपणा आणि अध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रने 2021 ची सुरूवात अंधारातून प्रकाशाकडे या संदेशाने सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष माननीय रिजवान उर रहेमान खान यांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे की, ”कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहेत. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैलीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आणि या गोष्टीची जाणीव वाढली आहे की, जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही केवळ भौतिक उद्देशांच्या परीपूर्तीचे नाव नाही. शेवटी विवेक आणि करूणेशिवाय, कुठलेही सुख नाही.”
औरंगाबाद येथे या अभियानाच्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमाचे एक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित असलेले प्रसिद्ध वारकरी उपदेशक निवृत्ती महाराज यांनी म्हटले आहे की, ”कोरोना महामारीच्या काळात अनेक नास्तिकांनी नास्तिकतेचा फैलाव करण्याचा प्रयत्न केला आहे. जमाअत ए इस्लामी हिंदचे हे अभियान याप्रकारच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी करेल.”
शेतकर्यांच्या विरोधाचे समर्थक आणि VOM (अमेरिका) वृत्तवाहिनीचे मालक मेघराजसिंह खालसा यांनी म्हटले की, ”या प्रकारचे अभियान केवळ जमाअत ए इस्लामी हिंदसारख्या सक्षम आणि जीवंत संस्थेद्वारेच यशस्वी केले जाऊ शकते.”
या दहा दिवसीय अभियानाचे संयोजक माननीय मुहम्मद समी ’अंधारातून प्रकाशाकडे’ या अभियानाबाबत म्हणाले की, ”आम्ही या दहा दिवसात महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडिया आणि व्यक्तीगत संपर्काद्वारे आम्ही हे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
या अभियानाचे सहसंयोजक माननीय इम्तियाज शेख यांनी याप्रसंगी सांगितले की, ”आम्ही सामाजिक आणि राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद आणि अन्य जिल्ह्यांमधून या अभियानाचा प्रांरभ करू. हा संदेश पोहोचविण्यासाठी हँडबिल, फोल्डर, व्हिडीओ क्लिप इत्यादींचा उपयोग करण्यात येईल. शिवाय, मस्जिद परिचय आणि कुरआन प्रवचनाचेही आयोजन केले जाईल. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुरआनाच्या प्रती लोकांमध्ये मोफत वितरित करण्याचाही मानस आहे. विशेष करून इस्लाम संबंधी ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांचे यथाशक्ती उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व काम शांततामय वातावरणात केले जाईल.”
याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध मराठा विचारक डॉ. अशोक राणा म्हणाले की, ”काही लोक आपल्या देशातील सौहार्दपूर्ण महान संस्कृतीला प्रदुषित करण्यासाठी अज्ञानता आणि जातीयवादाचा अंधार पसरवत आहेत. जमाअत ए इस्लामी हिंदचा प्रकाशाचा हा संदेश निश्चितरूपाने या वातावरणात उपयोगी होईल.”
फेसबुक लाईव्ह वरून केल्या गेलेल्या आपल्या भाषणात पुरोगामी विचारवंत माननीय बाबुराव गुरव यांनी म्हटले की, ” जमाअत ए इस्लामी हिंद आपल्या राज्यव्यापी अभियानाच्या माध्यमातून प्रेषितांचे मौलिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या सर्वांना शक्य होईल तेवढे यासंबंधी अध्ययन, विश्लेषण आणि स्वीकार करायला हवे.”
Post a Comment