Halloween Costume ideas 2015

सत्यमेव जयते

राजकारण : महाराष्ट्र विकास आघाडी समोरील आव्हान

बशीर शेख
भारतीय जनता पार्टीच्या ’फोडा आणि राज्य करा’ च्या नितीला महाराष्ट्रात शह देण्यात महाराष्ट्र विकास आघाडीला यश मिळाले आहे. साम, दाम, दंड, भेद या चारी तत्वांचा वापर करून सत्तेची सुत्रे हातात घेऊन म्हणेल तसे, म्हणेल तेव्हा वाकविण्यात भाजपाला देशात यश मिळत असल्यामुळे हेच सुत्र भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणात वापरले. मात्र ते अंगलट आले आणि सरळ हातात येत असलेली सत्ता निसटून शरद पवार या राजकारणातील चाणक्याच्या हातात गेली.
    गोवा, मणिपूर सारख्या छोट्या राज्यांमध्ये जो पॅटर्न भाजपाने चालविला तोच पॅटर्न पुरोगामी महाराष्ट्रात चालविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संवैधानिक मुल्यांना धाब्यावर बसविल्यामुळे राज्यातील वातावरण तापले. खरे तर महाराष्ट्रात घराणेशाहीच्या छत्रछायेत राजकारण अधिक चालते. शरद पवार यांच्या योजनेमध्ये भाजपा अडकत गेली आणि 30 वर्षे सोबत राहिलेली युती तुटली.
    भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी बनवून सत्यमेव जयतेचा नारा दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपली लढाई सत्तामेव जयतेसाठी नाही तर सत्यमेव जयतेसाठी आहे’,. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांना उद्देशून त्यांनी असे सांगितले. सर्व पक्ष एकत्र आल्याने आपली ताकद वाढलीय. हे कोणत्याही कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बसणारं चित्र नाही. ’आम्ही -162’ या टॅग लाईनखाली महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार एका छताखाली एकवटलो आहे. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये 162 आमदारांची परेड करत महाविकास आघाडीनं शक्तिप्रदर्शन केलं आणि सत्तास्थापनेचा दावा केला. खरं तर यात न्यायालयाची भूमिकाही महत्वपूर्ण ठरली. त्यामुळेच भाजपा-अजित पवार सरकार कोलमडलं. बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी महिनाभरापासून रखडलेला विजयी उमेदवारांचा शपथविधी झाला अन् त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या जीवात जीव आला. राष्ट्रपती     - (उर्वरित लेख पान 2 वर)
राजवट लागल्यामुळे सगळेच उमेदवार चिंतीत होते. नवीन आमदारांना तर शपथविधी होतो की नाही, अशी चिंता होती. परंतु, शरद पवार यांनी त्यांना धीर दिला. त्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारला आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्‍वास ठेवला. 

सरकार बनलं आता शेतकरी, जनतेचं बनेल का?
महाराष्ट्राच्या डोक्यावर 4.5 लाख कोटी कर्जाचा डोंगर युतीशासनाच्या काळात झाला. हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. ओल्या आणि वाळल्या दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळत आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाला कशी गती देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. कारण त्यांनी सत्यमेव जयते म्हणत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सत्यमेव जयतेला ठाकरे सरकार जागेल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नैतिकतेवर सरकार भर देईल का?
    खरे तर कुठलेही घर, गाव, शहर, राज्य आणि देश तेथील लोकांच्या नैतिकतेवर टिकून राहते. मात्र आज नैतिकता लोप पावत आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहे. भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी बोकाळला आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी ठाकरे सरकार महाराष्ट्रातील जनतेला कुठल्या मार्गाचे शिक्षण देईल, याकडे लक्ष आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget