भारतात मदरसे त्या लोकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले आहेत, जे राजकीय स्वार्थ राखतात आणि मीडियाच्या एका वर्गाकडूनही, जो पक्षपाती दृष्टीकोन बाळगतो. मदरशांविषयी आपला दृष्टीकोन ते लोक व्यक करतात, ज्यांना मदरसा व्यवस्थेसंबंंंधी आणि तिथे काय शिकविले जाते, त्यासंबंधी फार थोडेच ज्ञान असते. त्यांनी फक्त हे गृहित धरले आहे की ज्याअर्थी या इस्लामी संस्था आहेत, तेव्हा निश्चितच या ठिकाणी जिहाद व लढण्या मारण्याचे शिक्षण दिले जात असेल. येथपर्यंत की एन.डी.ए. सत्तारूढ असताना, त्यातल्या जबाबदार मंत्र्यांनीही अशी वक्तव्ये केली होती. यास्तव उचित माहिती आणि सखोल अभ्यासानंतरच आपला दृष्टिकोन प्रकट केला पाहिजे.
इस्लाम आपल्या आरंभ काळापासूनच भारतात प्रविष्ट झाला होता. काही लोकांची अशी धारणा आहे की, इस्लाम धर्म, पैगंबर (सल्ल.) यांच्या जीवनकाळातच केरळ मार्गे उत्तर भारतात आला. उत्तर आणि दक्षिणेकडच्या शेकडो लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि अशा प्रकारे सुरूवातीपासूनच इथे धर्मज्ञान शिकविण्याची आणि धर्मज्ञानी (उलेमा) तयार करण्यासाठी मदरशांची गरज भासली, यासाठी की त्यांनी इतरांना शिकवावे आणि नमाज पठण करण्यात व इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्यात लोकांना मदत करावी.
मदरश्याशी अभिप्रेत ते स्थान होय जिथे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य चालते. ’मदरसा’ -शाळा, विद्यालय, स्कूल इत्यादी शब्दांचा समानार्थी शब्द आहे. शाळा व विद्यालये प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणस्तरापर्यंत असतात. परंतु, ’मदरसा’शी अभिप्रेत प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था होय. इस्लामी देशांमध्ये उच्च शिक्षणाच्या केंद्रांनाही मदरसा म्हटले जाते. कोलकत्ता येथे एक मदरसा ’मदरसा-ए-आलिया’ अर्थात उच्च शिक्षण-विद्यालय आहे. ज्याला आता प.बंगाल सरकारने विश्वविद्यालयाचा दर्जा बहाल केला आहे, ही माहिती नमूद करण्यायोग्य आहे की हे मदरसे इतर संप्रदायांच्या विद्यार्थ्यांकरिताही खुले आहेत. राजा राम मोहन राय यांनी मदरसा आलिया येथे शिक्षण घेतले होते आणि ते फारसी व अरबीचे त्याच प्रकारे विद्वान होते, ज्या प्रकारे ते संस्कृत व हिंदू धर्माचे विद्वान होते. अनेक बाबतीत हे मदरसे धार्मिक आणि भौतिक अशा दोन्ही गरजा भागवित आणि हे ऐहिक व धार्मिक दोन्ही प्रकारच्या जीवनाकरिता आवश्यक होते. आज सुमारे 20,000 मदरसे दरवर्षी 1.5 दशलक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. सच्चर कमेटीच्या रिपोर्ट (इ.स.2006) नुसार सुमारे 4 टक्के मुस्लिम मुले मदरशात जातात. ही बाब महत्वपूर्ण होय की आजदेखील मदरसा, गरीब, ग्रामीण आणि काही मर्यादेपर्यंत शहरी मुसलमानांकरतिा मोठी महत्वपूर्ण संस्था आहे. भारतात मुसलमानांची एक मोठी संख्या गरीब आणि अशिक्षित आहे. हे गरीब मुसलमान इच्छा असूनही आपल्या मुलांना धर्मनिरपेक्ष शिक्षणंसंस्थांमध्ये पाठविण्याची क्षमता राखत नाहीत.
याव्यतिरिक्त त्यांच्या काही धार्मिक गरजा असतात आणि मदरसे केवळ धार्मिक गरजाच भागवित नाहीत, तर ते विनामूल्य शिक्षण, भोजन आणि निवासाची सुविधा विद्यार्थ्यांना प्रदान करतात आणि याहून विशेष हे अशा ठिकाणी प्रस्थापित असतात, जे मुलांकरिता सुविधाजनक असतात. सर्वच मदरसे सारखेच असतात असे आम्ही गृहित धरू नये. त्यांना वेगवेगळ्या वर्गात विभागून पाहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, प्राथमिक स्वरूपाच्या मदरशांमध्येे, ज्यांना ’मक्तब’ म्हटले जाते. केवळ प्राथमिक स्वरूपाचे धार्मिक शिक्षणच दिले जाते, त्यानंतर माध्यमिक दर्जाचे मदरसे येतात, (उर्वरित आतील पान 7 वर)
ज्यात अरबी भाषा, कुरआन, कुरआनचे भाष्य व अनुवाद आणि हदीस वगैरे शिकविले जातात. यानंतर उच्च श्रेणीचे मदरसे येतात. ज्यांची तुलना पदवी किंवा पदव्युत्तर स्तराच्या शिक्षणाशी केली जाऊ शकते. महाविद्यालयाच्या आरंभासोबतच जामिया किंवा विश्वविद्यालयांचा विकास झाला. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ मोरक्कोच्या फेज नगरमध्ये असलेले कराविईन आहे. ज्याची स्थापना इ.स.859 मध्य झाली होती. मग त्यानंतर लवकरच इजिप्तची राजधानी काहिरा (कैरो)मध्ये अल् अजहर विश्वविद्यालयाची स्थापना इ.सन. 970 मध्ये झाली.
विद्यापीठाचे विद्यार्थी धार्मिक ज्ञानाव्यतिरिक्त तर्कशास्त्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गणित, पदार्थ विज्ञान, खगोल शास्त्र, भाषणशैली आणि औजार निर्मितीचे शिक्षण प्राप्त करीत असत.
मदरशांच्या आधुनिकीकरणाची एक चळवळ चालत आहे आणि अनेक मदरशांनी आपल्या आधुनिकीकरणाचे काम सुरू केले आहे. शासकीय संस्था एन.सी.ई.आर.टी. (राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) ने एक अध्ययन करविले. ज्यावरून हा निष्कर्ष निघाला की अनेक राज्यांच्या, प्रामुख्याने केरळ आणि प. बंगालच्या मदरशांमध्ये शिक्षण सामुग्रीत समतोल निर्माण करण्याची प्रक्रिया जारी आहे. या अध्ययनपूर्ण पाहणीत मदरशाच्या पाठ्यक्रमात कोणतेही राष्ट्रविरोधी तत्व आढळून आले नाही. मुसलमानांद्वारे मदरसा शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये आधुनिक शाळा- विद्यालयांची कमतरता. 2. वेगळ्या मुलींच्या शाळांची कमी आणि सहशिक्षण असणार्या शाळांमध्ये महिला शिक्षिकांची कमतरता. 3. आधुनिक शिक्षणाचे खूप महाग असणे आणि सरकारी शाळांची गुणवत्ता खालच्या दर्जाची असणे. 4. सरकारी शाळांमध्ये अध्ययन- अध्यापनाची वाईट स्थिती. 5. सनातनी मुसलमानांची तक्रार ही आहे की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू भेदभाव अस्तित्वात आहे.
मदरसा आणि मक्तब
अधिकांश मुस्लिम मुले मदरशांमध्ये जातात या गैरसमाजाचे एक कारण हे आहे की लोक ’मदरसा’आणि ’मक्तब’ यातला फरक जाणत नाहीत. वास्तविक ’मदरसा’ नियमित शिक्षण देणारी संस्था असते, तर ’मक्तब’ मोहल्ल्याच्या मस्जिदशी संलग्न असलेली पाठशाळा असते जी इतर शाळा शिकणार्या मुलांना धार्मिक शिक्षण देते. अशा प्रकारे मक्तब औपचारिकरित्या, संस्थांमध्ये शिकणार्या मुलांना धार्मिक शिक्षण देतात. अशा प्रकारे मक्तब मोठ्या मदरशांना पूरक ठरतात.

- सय्यद हामीद मोहसीन.
Post a Comment