Halloween Costume ideas 2015

जामिया विद्यापीठातील पोलिसांची कारवाई की सूड

Jamia Attack
15 डिसेंबरच्या रात्री जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वाराला तोडून दिल्ली पोलिसांनी विद्यापीठ परिसरात प्रवेश करून विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला. विशेष म्हणजे उपकुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठामध्ये गणवेशातील पोलिसांनी हत्यारांसह प्रवेश करून ही कारवाई करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये, त्यातही ग्रंथालयामध्ये पोलिसांनी प्रवेश करून विद्यार्थ्यांना बदडून काढले. विद्यापीठ परिसरातील मस्जिदमध्ये घुसून नासधूस केली. पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले की, विद्यापीठ परिसरातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली म्हणून पोलिसांना नाईलाजाने विद्यापीठात घुसून कारवाई करावी लागली.
पोलिसांचा हा युक्तीवाद अतिशय तकलादू स्वरूपाची असून, दगडफेकीचा आरोप जरी चुकीचा नसला तरी बदल्यात केली गेलेली कारवाई इतकी मोठी आणि क्रूर होती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ही कारवाई जालियनवाला बाग सारखी कारवाई होती, यात शंका नाही. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री प्रणिती चोप्रा हीने तर या कारवाईची तीव्रता पाहून असे म्हटलेले आहे की, आता देशाला लोकशाही प्रधान देश म्हणणे चुकीचे आहे. प्रणिती चोप्राशिवाय अनुराग कश्यप यांनी म्हटले आहे की, ’हे प्रकरण फार पुढे गेलेले असून, आता मी गप्प बसू शकत नाही. मला म्हणावेसे वाटते की हे सरकार फॅसिस्ट सरकार आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने म्हटले आहे की, जामियामधील पोलीसी कारवाईचे व्हिडीओ व्यथित करणारे आहेत.तिने ट्विटरवर  म्हटलेले आहे की, ’आश्‍चर्य है के ये एक शुरूवात है या अंत है. चाहे जो भी हो निश्‍चित तौर पर इससे कानून के नए नियम लिखे जा रहे हैं. जो इसमें फिट नहीं है वो बहोत अच्छे से इसका परिणाम देख सकता है. इन व्हिडीओ ने सबका दिल और उम्मीद एक साथ तोडी है. अपरिवर्तनीय क्षती और सिर्फ जीवन और संपत्ती के बारे मैं बात नहीं कर रही हूं.’ चित्रपट निर्माता कोंकणासेन शर्मा यांनी सांगितले की, आम्ही जामियाच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. दिल्ली पोलिसांना लाज वाटायला पाहिजे. याशिवाय, चित्रपट निर्देशक सुधाकर मिश्रा, अभिनेता राजकुमार राव, अली फजल, मनोज वाजपेयी, आयुष्यमान खुराणा, भूमी पेंडनेकर, लेखक चेतन भगत, अभिनेत्री सायनी गुप्ता, सिद्धार्थ, मोहम्मद झिशान अय्युब, रिचा चड्डा, विक्रांत मेस्सी, निर्देशक अनुभव सिन्हा, रिमा कागती, वरूण ग्रोहर एवढेच नव्हे तर हॉलीवुडचे अभिनेता जान क्युसेक यांनीही दिल्ली पोलिसांच्या या भयानक कारवाईचा निषेध केलेला आहे. एवढेच नव्हे तर अनेक आयआयटी आणि देशातील अनेक विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी जामियाचा विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ मोर्चे काढले आहेत.
    ”हिंसा करनेवालों के पोशाख से ही अंदाजा आ जाता है की हिंसा कौन कर रहे थे?” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून अंदाज येतो की, दिल्ली पोलिसांना जामिया विद्यापीठामध्ये कारवाई करण्याचे बळ केंद्र सरकारकडूनच मिळाले असावे. केवळ जामिया मिलीयाच नव्हे तर अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरही पोलिसांनी दडपशाही केली. तेथे तर विद्यार्थ्यांच्या दुचाकी पोलिसांनी  लाठ्यांनी फोडून टाकल्याचे व्हिडीओ वायरल झालेले आहेत. दुर्भाग्य म्हणजे एवढी दडपशाही होवूनही सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्वतःहून दखल घेण्यास नकार दिला आहे.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget