नवी दिल्ली
सरळ भाषेच्या उपयोगाच्या नावाखाली उर्दू आणि फारसी भाषेचा बहिष्कार करण्याचा दिल्ली पोलिसांनी जणू चंगच बांधलेला आहे. दिल्ली पोलिसांना 20 नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त कायदा विभाग यांनी सर्व पोलीस अधिकार्यांना एक पत्र देऊन सोप्या भाषेचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या. दिल्ली पोलिसांनी उर्दू आणि फारसीच्या 383 शब्दांना चिन्हीत केले आहे आणि यांचा उपयोग पोलीस स्टेशनच्या कामकाजामध्ये विशेषत: एफआयरमध्ये न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टअनुसार राजीनामा, तहेरीर, अदमतामील, मुजरिम, गुफ्तगू, संगीन अपराध, जेरे तपतीश, इस्तगासा यासारखे उर्दू आणि फारसी मिश्रित 300 शब्द आहेत ज्यांचा उपयोग केला जातो. त्यांचा आता यापुढे उपयोग करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या शब्दांचे पर्यायी हिंदी शब्दही पोलिसांनी दिलेले आहेत. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल झालेली असून त्या याचिकेची सुनावणी करतांना 100 एफआयआरच्या प्रती कोर्टाने मागवून त्यांची छाननी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यायोगे हे पाहिले जाईल की, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या निर्देशनाचे पालन होत आहे की नाही.
यापूर्वी ऑगस्ट मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश न्या. डी.एन. पटेल आणि न्या. सी.हरिशंकर यांच्या खंडपीठाने पोलिसांना एफआयआर दाखल करताना अलंकृत भाषेचा वापर करण्याची आवश्यकता नाही असे निर्देश दिलेले होते. कारण की एफआयआर सर्वसाधारण माणसं देतात. त्यांची भाषा जर अलंकृत असेल तर आपण काय तक्रार देतोय, याबद्दल त्यांना कळणार नाही. सरकारी वकील विशालाक्सी गोयल यांनी कोर्टाचे निर्देश दिल्ली पोलिसांना कळविलेले होते. त्यानुसार आता हे शब्द लवकरच दिल्ली पोलीस आणि कोर्टांच्या कामकाजातून वगळले जातील.

Post a Comment