Halloween Costume ideas 2015

सूरह इब्रहिम : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२२) ....आता माझी निर्भत्सकरू नका, आपल्या स्वत:चीच निर्भत्सकरा. येथे तर न मी तुमची दाद लावू शकतो व न तुम्ही माझी, यापूर्वी जो तुम्ही मला ईशत्वात भागीदार बनविले होते.३२ मी त्या जबाबदारीतून मुक्त आहे. अशा अत्याचाऱ्यांसाठी तर दु:खदायक शिक्षा निश्चित आहे.’’

(२३) याउलट ज्या लोकांनी जगात श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सदाचरण केले आहे, ते अशा बागेत दाखल केले जातील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. तेथे ते आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने सदैव राहातील, आणि तेथे त्यांचे स्वागत सलामतीच्या अभिनंदनाने होईल.३३


३२) येथे पुन्हा श्रद्धाशीलतेतील (ईमान) अनेकेश्वरत्वाच्या मुकाबल्यात अनेकेश्वरत्वाचा स्थायी प्रकार म्हणजेच व्यवहारिक अनेकेश्वरत्वाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. स्पष्ट आहे की शैतानाला श्रद्धाशीलतेने  कोणीच ईशत्वात सामील करणार नाही आणि त्याची पूजा करणार नाहीत. सर्व त्या शैतानाचा धिक्कारच करतात. परंतु त्याचे आज्ञापालन आणि दासता तसेच त्याचे आंधळे किंवा डोळस अनुसरण अवश्य केले जात आहे आणि यालाच येथे शिर्क (अनेकेश्वरत्व) चे नाव दिले आहे. संभवत: कोणी सांगेल की हे शैतानाचे कथन आहे ज्याला अल्लाहने येथे सांगितले आहे. परंतु आम्ही विनंती करतो की एक तर त्याच्या कथनाला अल्लाहने स्वत: रद्द करून टाकले असते जर ते कथन खोटे असते. कुरआनमध्ये व्यावहारिक अनेकेश्वरत्वाचे प्रमाण अनेक ठिकाणी आलेले आहे. उदाहरणार्थ, यहुदी आणि िख्र्तासी लोकांचा आरोप की ते आपल्या विद्वानांना आणि संताना धरून आहेत. (सूरह ९, आयत ३१) अज्ञानतेच्या पद्धती काढणाऱ्यांविषयी सांगणे की त्यांचे अनुकरण करणाऱ्यांनी त्यांना अल्लाहचा भागीदार बनविले आहे. (सूरह ६, आयत १३७) मनोकामंनाची उपासना करणाऱ्यांविषयी सांगणे की त्यांनी आपल्या मनोकामनांना खुदा (ईश्वर) बनवून टाकले आहे. (सूरह २५, आयत ४३) अवज्ञाकारी दासांविषयी सांगणे की ते शैतानाची भक्ती करतात. (सूरह ३६, आयत ६०) माणसांनी बनविलेल्या कायदेकानूवर चालणाऱ्यांविषयी सांगितले गेले की अल्लाहच्या आदेशाविना ज्यांनी तुमच्यासाठी विधीनियम बनविले ते तुमचे `शरीक' (भागीदार) आहेत. (सूरह ४२, आयत २१) काय हे सर्व त्याच व्यवहारिक अनेकेश्वरत्वाची उदाहरणे नाहीत? या उदाहरणांवरून स्पष्ट माहीत होते की अनेकेश्वरत्वाची फक्त हीच एकमेव पद्धत नाही की एखादा मनुष्य विश्वास आणि धारणेच्या दृष्टीने अल्लाहला सोडून दुसऱ्यालासुद्धा ईशत्वात भागीदार ठरवितो. याचा दुसरा प्रकार म्हणजे ईशत्वाच्या प्रमाणाशिवाय किंवा अल्लाहच्या आदेशांच्या विपरीत त्या भागीदाराचे अनुसरण आणि आज्ञापालन त्याने करीत जावे. असा अनुयायी आणि आज्ञापालक जर आपला नेता किंवा ज्याचे तो आज्ञापालन करीत आहे, त्याचा धिक्कार करतो, तरी तो मनुष्य व्यावहारिकरूपात कुरआननुसार त्याने त्याला ईशत्वात भागीदार बनविले. मग त्याच्या आदेशाचे स्वरुप अनेकेश्वरवादी आदेशासारखे जरी नसले तरी धारणा आणि विचारसरणीचे ते अनेकेश्वरत्व आहे. (तपशीलासाठी पाहा सूरह ६, टीप ८७, १०७, सूरह १८, टीप ५०)

३३) `तहीय:' या अरबी शब्दाचा अर्थ होतो `दीर्घायुष्यासाठीची प्रार्थना' परंतु पारिभाषिकरूपात स्वागतच्या अर्थात हा शब्द वापरला जातो. लोक भेटल्यानंतर एक दुसऱ्याशी म्हणतात की `तहीयतुहुम' म्हणजे यांच्यामध्येही स्वागत करण्याची पद्धत आहे. दुसऱ्या अर्थाने म्हणजे त्यांचे याप्रकारे स्वागत होईल. `सलामुन' मध्ये क्षेमकुशलतेच्या प्रार्थनेचा समावेश होतो आणि क्षेमकुलतेसाठीचे  अभिनंदनसुद्धा.  प्रसंगानुरूप  आम्ही  तो  अर्थ  घेतला  आहे  जो  अनुवादमध्ये लिहीलेला आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget