Halloween Costume ideas 2015

महिलांवरील अत्याचार थांबविणे काळाची गरज

जेआयएच महिला विंगच्या राष्ट्रीय सचिव रहमतुन्निसा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली 

महिलांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबविणे काळाची गरज बनली आहे. घर, बाजार, सार्वजनिक ठिकाणे आणि धर्मस्थळे आदी ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे पदोपदी जाणवत आहे. महिलांनी यावर बोलले पाहिजे. समाजातून यावर मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जमाअते इस्लामी हिंद महिला विभागाच्या राष्ट्रीय सचिव रहमतुन्निसा यांनी केले आहे. 

31 ऑक्टोबर रोजी जमाअते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे ’महिला पर हिंसा और उनके शोषण का रूझान’ या विषयावर एक वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहमतुन्निसा बोलत होत्या. यावेळी दी विमेन एज्यूेशन अँड एम्पावरमेंट ट्रस्टचे जनरल सचिव शाइस्ता रफत, अधिवक्ता वैशाली डोलास, समर अली, ऑपरेशन पीस मेकर एवं माई च्वाइस फाउंडेशन कार्यक्रमाच्या प्रमुख डॉक्टर फरज़ाना खान, वंचित समाज आघाडीच्या सदस्या जयश्री शरके यांचा समावेश होता. यावेळी फरजाना शेख म्हणाल्या. समाजामध्ये महिलांप्रती दिसून येत असलेला रोख बदलणे गरजेचे आहे. 

कायदे महिलांना न्याय देणारे असले तरी त्याची कडक अमलबजावणी झाली पाहिजे. वैशाली डोलास म्हणाल्या, माध्यमांद्वारे प्रसारित केली जाणारी नग्नता थांबविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. बिलकीस बानोशी झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे. समर अली म्हणाल्या, हिजाब परिधान करणे असो की स्कार्फ. ते परिधान करणाऱ्यावर अवलंबून आहे. हे परिधान करणाऱ्यांवर टिका करणे चुकीचे आहे. महिला ही काही वस्तू नाही. महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. पुरूषप्रधान संस्कृतीचे गारूड समाजावर आहे. त्यामध्ये परिवर्तन आणणे गरजेचे आहे. हे परिवर्तन प्रबोधनातून आणि सामंजस्यातूनच येऊ शकते. त्यासाठी गावोगावी महिलांच्या न्याय, हक्कासाठी जनजागृती झाली पाहिजे. हुंडा, लग्नात अमाप खर्च या माध्यमातून महिलांचे शोषण केले जाते. त्यामुळे महिलांनीच महिलांचे अधिकार देण्यास सुरूवात केली तर महिलांचे जीवनही सुखकर बनेल आणि पुरूषांच्या टोमण्यातून महिलांची सुटका होण्यास सुरूवात होईल.  

जयश्री शरके म्हणाल्या, स्त्री भोगविलासाचे साहित्य नाही. महिलांनी आपल्या हक्काची लढाई स्वतः लढली पाहिजे आणि पीडित महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला पॉलिटे्निनकि कॉलेज गूंटरमधील एचओडी रमा सुंदरी म्हणाल्या, विश्वसुंदरी स्पर्धेचे कल्चर सामान्य झाल्यानंतर स्त्री विकणारी वस्तू बनली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यांनी कोरोना आणि सीएए, एनआरसीमध्ये मुस्लिम महिलांच्या योगदानाचे कौतुक केले. प्रोफेसर डॉ. उमा सिंह यांनी महिलांचे शोषण सामान्य झाले आहे. मग ते घर असो की ऑफिस. त्यांनी महिलांना आवाहन केले की, आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे. मात्र अन्याय सहण करणे आणि शांत बसणे याची शिक्षा देऊ नये. महिलांचे देशात जडणघडणीत मोठे योगदान असल्याचेही त्या म्हणाल्या. वेबिनारचे संचलन सना शेख यांनी केले. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget