Halloween Costume ideas 2015

मनातील, विचारातील अंधार कोणता व काय?


‘तिमिरातुनी तेजाकडे‘ कवी कुसुमाग्रज लिखित वरील कविता शालेय जीवनापासून ऐकत व म्हणत आलो आहे. आज मला ही कविता आठवली याचे कारण म्हणजे मी अंधार या शब्दाचे अर्थ शोधत होतो. कळाले की अंधार म्हणजे अज्ञान,अनाचार,दुराचार, व्याभिचार ,भ्रष्टाचार, अहंकार,द्वेष,घृणा,तिरस्कार,पाप, या अर्थांची एक लांबलचक यादीच बनत गेली विचार केले,काय खरेच  हा अंधार अस्तित्वात आहे? सदसद् विवेकबुद्धीने उत्तर दिले हो.

आज आमच्या मनातील विचारातील व समग्र जीवनातील अंधार दूर करणे आवश्यक आहे. मग आता प्रश्‍न निर्माण होतो मनातील, विचारातील अंधार कोणता व काय?

मानवी स्वभावातील घृणा, तिरस्कार, नैराश्य, द्वेष, भेदभाव, दुराचार, अनाचार, घृणा, अत्याचार, या भावना मानवी स्वभातील अंधकार दर्शवणारे प्रतीक आहेत. मनातील अंधकार मानवावर व समाज जीवनावर प्रभाव टाकतो. मनातील रंग हे चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसू लागतात. कधी कधी हे स्पष्ट होत नाही बाहेरून अतिउत्साह दर्शवणारी व्यक्ती आतून नैराश्य व उदासीनतेमुळे अल्लाहने दिलेल्या अनमोल जीवनाचा स्वतः घात करते. हे आम्ही आज पाहतो. र्लेींळव-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा आज समस्त विश्‍वात जो बदल घडला ते सर्वश्रुत आहे. वैयक्तिक जीवनापासून तर वैश्‍विक जीवनात याबाबत फार मोठा बदल घडला यात अनेक व्यक्ती या नैराश्य उदासीनतेच्या आहारी गेली तर याउलट काही व्यक्ती या संकटाशी समर्थपणे लढत राहिली. हा मनातील अंधार दूर करण्यासाठी अल्लाहने अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांना साडे चौदाशे वर्षांपूर्वी पाठवले.त्यांनी ईश्‍वरीय अंतिम ग्रंथ पवित्र कुराण चा संदेश मानव जगताला दिला. समस्त जगतासाठी अवतरीत झालेला दिव्य कुराण संदेश मानवी जीवनातील अंधार दूर करण्यासाठी अवतरीत झालेला प्रकाशमय संदेश आहे. कुरआनमध्ये अल्लाहने मानवाला जीवन कसे जगावे याबाबत 6238 आयाती च्या (श्‍लोक) माध्यमातून स्पष्ट विवेचन व मार्गदर्शन दिले. या संदेशातील अतीमहत्त्वाच्या तीन मूलभूत श्रद्धा

1. एकेश्‍वरवाद

 2. प्रेषित्व  

3.मरणोत्तर जीवन

जी व्यक्ती आपल्या जीवनात या श्रद्धा बाळगते ती जीवनात कधीही अंधाराच्या गर्तेत जात नाही. कारण त्याची ही श्रद्धा इतकी गाढ असते की समस्त विश्‍वाचा पालनकर्ता, रचिता, निर्माता हा एक आणि एक फक्त एकच अल्लाह आहे. अल्लाहची भक्ती करत व त्याने दिलेल्या अनमोल संदेशावर तो आपले जीवन व्यतीत करत असतो. स्वतः सत्कर्म करीत इतरांनाही सत्कर्मात सामिल करतो. ईश्‍वरावर श्रद्धा ठेवणार्‍या व्यक्ती नेहमी ईशभय बाळगणार्‍या असतात. अशा व्यक्तींच्या मनात नेहमी प्रकाशाची ज्योत तेवत राहते. ही प्रकाश ज्योत त्याला अंधकार जीवनातून यशाचा  प्रकाशित मार्ग दाखवत असते. आज जगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर खूप प्रगती झाली. प्रकाश चोहिकडे पसरला गावापासून शहरापर्यंत  विकास झाला. जीवनशैली बदलली, राहणीमान बदलले पण दुर्दैव! मानवाच्या मनात अंधार पसरला. कुटुंबापासून समाजापर्यंत सर्व नाते विखुरली गेली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनमोल मार्गदर्शनातून अंधकारमय समाजजीवन जगणार्‍या अरब भूमीवर प्रकाशाची ज्योत प्रज्वलित केली. प्रकाशमय जीवनशैलीचा परिचय करून दिला. कालांतराने हा प्रकाश हळूहळू समस्त विश्‍वात पसरत गेला. भौतिक व चंगळवादी जीवनाची आवड निर्माण झालेला समाज मूळ जीवन उद्देश विसरून गेला आहे. त्यामुळे समाजात वाईट प्रवृत्ती उदयास आल्या. जीवनाचा मूळ उद्देश जाणनारी व्यक्ती नेहमी सुखी-समाधानी दिसते. कारण हे जीवन मर्यादित जीवन आहे. मरणोत्तर जीवनात आम्हास आमच्या निर्मात्याकडे या जीवनातील कर्माचा जाब द्यावा लागेल, अशी धारणा बाळगणारी व्यक्ती सदैव सत्कर्म करीत असते. कारण सृष्टीचा निर्माता ईश्‍वर, अल्लाहने मानवाला जीवन कसे जगावे याचे परिपूर्ण मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन असावे महणजेच आपणास योग्य तो मोबदला मिळेल. नाहीतर आपणांस त्याच्या शिक्षेसाठी पात्र ठरावे लागेल. लक्षात ठेवा ही शिक्षा नक्कीच होणार. तर मग आता आपण ठरवू शकतो की आपण आपले बाहेरून दिसणारे प्रकाशमय जीवन आतून किती अंधकारमय आहे. हा अंधार दूर करण्यासाठी आपले पहिले पाऊल आपण प्रकाशाकडे टाकलेच पाहिजे. आजही हा प्रकाश पवित्र कुराण व पैगंबर वचनाच्या स्वरूपात पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत समस्त मानव जाती करिता एकमेव मार्गदर्शक आहे आपण याचा अभ्यास करावा व आपल्या जीवनाला प्रकाशित करावे.


- आय.जी. शेख


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget