Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(५०) (जर हे अल्लाहच्या कायद्यापासून विमुख होत आहेत) तर मग काय हे अज्ञानमूलक८३ निर्णय इच्छितात? वास्तविक पाहता जे लोक अल्लाहवर विश्वास ठेवतात त्यांच्या दृष्टीने  अल्लाहपेक्षा उत्तम न्याय देणारा दुसरा कोण असू शकेल?
(५१) हे श्रद्धावंतांनो, यहुदी व खिस्तींना आपले मित्र व जीवलगसोबती बनवू नका, हे आपापसांतच एकदुसऱ्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र व सोबती  बनवीत असेल तर त्याचीदेखील गणना त्यांच्यातच होईल नि:संशय अल्लाह अत्याचाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो.
(५२) तुम्ही पाहता की ज्यांच्या हृदयाला दांभिकतेचा रोग जडला आहे ते त्याच्यातच धावपळ करीत राहतात. सांगतात, ‘‘आम्हाला भय वाटते की कस्रfचत आम्ही संकटाच्या चक्रात  सापडू.’’८४ परंतु दूर नव्हे की अल्लाह जेव्हा तुम्हाला निर्णायक विजय प्रदान करील अथवा आपल्याकडून इतर एखादी गोष्ट प्रकट करील८५ तेव्हा हे लोक आपल्या या दांभिकपणावर जो  ते आपल्या हृदयात लपवून आहेत, लज्जित होतील.
(५३) आणि त्या वेळी श्रद्धावंत सांगतील, ‘‘काय हे तेच लोक आहेत जे अल्लाहच्या नावावर मोठ्या कठोर शपथा घेऊन खात्री देत होते की आम्ही तुमच्याबरोबर आहोत?’’ त्यांची सर्व  कृत्ये वाया गेली आणि सरतेशेवटी ते अपयशी व निराश होऊन राहिले.८६
(५४) हे श्रद्धावंतांनो! जर तुमच्यापैकी कोणी आपल्या धर्मापासून पराङ्मुख होत असेल (तर खुशाल व्हावे) अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील  आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल, जे सत्जनांसाठी मृदू आणि कुफ्फार (विरोधक, शत्रू) साठी कठोर असतील,८७ जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोणत्याही   निर्भत्सना करणाऱ्यांच्या निर्भत्र्सनेला भिणार नाहीत.८८ ही अल्लाहची कृपा आहे, तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह सर्वव्यापी आहे आणि सर्वकाही जाणतो.
(५५) तुमचे मित्र तर खरे पाहता केवळ अल्लाह आणि अल्लाहचा पैगंबर आणि ते श्रद्धावंत होत जे नमाज प्रस्थापित करतात, जकात देतात व अल्लाहसमोर झुकणारे आहेत.
(५६)  आणि ज्याने अल्लाह आणि त्याचा पैगंबर व श्रद्धावंतांना आपले मित्र बनविले, त्याला माहीत असावे की अल्लाहचाच पक्ष यशस्वी राहणारा आहे.८३) `जाहिलियत'चा शब्द `इस्लाम'च्या विरोधात आला आहे. इस्लामी जीवनपद्धती साक्षात ज्ञान आहे. कारण हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे जो समस्त तथ्यांचे ज्ञान राखतो.  इस्लामशिवाय ती प्रत्येक जीवनपद्धती (धर्म) अज्ञानतापूर्ण आहे. इस्लामपूर्व अरबच्या कालखंडास `अज्ञान युग' (जाहिलियत) याच अर्थाने म्हटले गेले आहे. त्या काळात ज्ञानाविना फक्त  अंधविश्वासावर, अटकलांवर, मनोकामनांवर आधारित जीवनपद्धती लोकांनी निश्चित केल्या होत्या. अशी जीवनशैली मनुष्याने कोणत्याही युगात स्वीकारली तिला अज्ञानतापूर्ण जीवनशैलीच म्हटले जाईल. विश्वविद्यालय आणि महाविद्यालयात जे काही शिकविले जाते ते केवळ एक आंशिक ज्ञान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मानवाच्या मार्गदर्शनासाठी  पर्याप्त् नाही. म्हणून अल्लाहने दिलेल्या ज्ञानाशी बेपर्वा होऊन ज्या जीवनव्यवस्था या आंशिक ज्ञानाच्या आधाराने भ्रम, अंधविश्वास आणि मनोकामनांना एकत्र करून बनविल्या आहेत  त्या सर्व याच अज्ञानतापूर्ण स्थितीत मोडतात ज्याप्रमाणे प्राचीन काळातील अज्ञानतापूर्ण जीवनपद्धती (जाहिलियत) या व्याख्येत मोडतात.
८४) त्या काळापर्यंत अरबमध्ये कुफ्र (विधर्म) आणि इस्लामच्या संघर्षाचा निर्णय झालेला नव्हता. इस्लाम आपल्या अनुयायींच्या समर्पण वृत्तीमुळे एक महान शक्ती बनला होता.  तरीपण विरोधकांची शक्तीसुद्धा जबरदस्त होती. इस्लामच्या बरोबरीने कुफ्रच्या विजयाचीसुद्धा संभावना होती. म्हणून मुस्लिमांमध्ये जे लोक दांभिक होते, ढोंगी होते, ते इस्लामी  समाजात राहून यहुदी आणि खिश्चन लोकांशी मेळमिलाफ करून होते. जर हा संघर्ष इस्लामच्या पराजयात परिवर्तीत झाला तर या दांभिकांसाठी सुरक्षित स्थळ आपोआप मिळणार होते.  तसेच त्या काळात यहुदी आणि खिश्चनांची आर्थिक स्थिती सर्वात उत्तम होती. त्यांच्या हातात सावकारी होती. अरबस्थानातील सुपीक जमीन त्यांच्याच ताब्यात होती. त्यांच्या  व्याजबट्याचे जाळे (नेटवर्क) चहुकडे विणले गेले होते. म्हणून हे दांभिक लोक आर्थिक कारणांनीसुद्धा त्यांच्याशी (यहुदी, खिश्चनाशी) आपले जुने संबंध आबाधित ठेवून होते. त्यांना वाटत होते की या संघर्षात आम्ही पडलो तर यांच्याशी आपले संबंध तुटले जातील आणि राजनैतिक आणि आर्थिक या दोन्ही स्थितीसाठी हे त्यांना खतरनाक वाटत होते.
८५) म्हणजे निर्णायक विजयाने निम्नस्तरातील अशी स्थिती ज्यात सामान्यत: लोकांचा विश्वास बसावा की हार जीतचा अंतिम निर्णय इस्लामच्या बाजुने होईल.
८६) म्हणजे जे काही त्यांनी इस्लामच्या अनुकरणासाठी केले अर्थात नमाज अदा केली, उपवास ठेवले, जकात दिली, जिहादमध्ये भाग घेतला आणि इस्लामच्या कायद्यांना मान्य केले.  सर्व या कारणाने धुळीस मिळाले कारण त्यांच्या मनात इस्लामविषयी निष्ठा नव्हती. ते चोहोबाजूंनी निरपेक्ष होऊन अल्लाहचे बनून राहिले नव्हते. त्यांनी तर आपल्या भौतिक  फायद्यासाठी स्वत:ला अल्लाह आणि विद्रोहींच्या मध्ये अर्धे अर्धे वाटून घेतले होते.
८७) ईमानधारकांवर नरम (मृदु) होण्याचा अर्थ आहे की एका मनुष्याने ईमानधारकाच्या मुकाबल्यात आपली ताकद कधीच वापरू नये. त्याची बौद्धिक शक्ती, समझदारी त्याची योग्यता,  त्याचा प्रभाव, त्याची संपत्ती आणि शारीरिक शक्ती अशी कोणतीच वस्तू मुस्लिमांना दाबण्यासाठी, हानी करण्यासाठी आणि सतावण्यासाठी वापरू नये. मुस्लिम आपल्यामध्ये त्याला  नम्रस्वभावी, दयाळू, हितैशी आणि सहनशील मनुष्य म्हणूनच ओळखेल. विद्रोहींवर (कुफ्फार) कठीण म्हणजे एक ईमानधारक आपल्या ईमानची दृढता, धर्मनिष्ठा, मजबूत सिद्धान्त,  चारित्र्यबळ आणि ईमानची प्रतिभा आणि विवेकशीलतेमुळे इस्लामविरोधींच्या समोर पर्वतासमान अढळ असतो जेणेकरून आपल्या स्थानावरून हटविला जाऊ नये. मुस्लिम कधीच  मेणाप्रमाणे मऊ नाही की मऊ चारा नाही. त्यांना जेव्हा कधी यांच्याशी सामोरे जावे लागते तेव्हा त्यांना कळून चुकते की हा अल्लाहचा दास जीव देईल परंतु कोणत्याही स्थितीत  विकला जाऊ शकत नाही आणि कोणत्याच दबावाखाली दबू शकत नाही.
८८) अल्लाहच्या धर्मानुसार आचरणात, त्याच्या आदेशांचे पालन करण्यात आणि या धर्मानुसार जे सत्य आहे त्याला सत्य आणि जे असत्य आहे, त्याला असत्य ठरविण्यास त्यांना  कुठलेही भय नाही. कोणाचा विरोध, किंवा टीका, कोणाची आपत्तीची पर्वा केली जात नाही. जर सर्वसामान्यांचा विचार इस्लाम विरोधी असेल, आणि इस्लामी जीवनपद्धतीनुसार   चालण्याचा अर्थ जगात स्वत:ला धोक्यात टाकणे आहे. तरी ते सत्य मार्गावर इस्लामी जीवनपद्धतीनुसारच जगात वावरतील. ज्यास ते मनापासून सत्य मानतात.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget