Halloween Costume ideas 2015

‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार लावण्याचे काम अलखैरने केले’

अंबाजोगाई  (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथे गेल्या पंधरा वर्षांपासून चालणार्‍या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने या भागातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना आर्थिक व मानसिक बळ देण्याचे काम केले आहे. अलखैर ही संस्था नसून हे एक कुटुंब आहे. कुटुंबात ज्या पद्धतीने आपल्या माणसांची काळजी घेतली जाते तशी काळजी घेण्याचे काम अलखैरने आजवर केले. म्हणूनच गेल्या पंधरा वर्षात अलखैर ही शून्यातून आज वटवृक्षात रुपांतरित झाली आहे. कामाचा अवाका निश्‍चितच वाढलेला आहे. या भागातील गरीबी हटवून गरीबांना चांगले जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी अल्पशा सेवाशुल्कावर कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अशी अलखैर पतसंस्था ही अंबाजोगाई शहराचे भूषण ठरली असल्याचे बीड जमात-ए-इस्लामी-हिंद चे शहरअध्यक्ष सय्यद शफिक हाश्मी म्हणाले.
    या संस्थेची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  स्व. विलासराव देशमुख न. प. सभागृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलखैरचे अध्यक्ष शेख उमर फारूक हे होते. तर प्रमुख उद्घाटक बीड येथील जमात-ए-इस्लामी हिंद चे अध्यक्ष सय्यद शफीक हाश्मी हे होते. मंचावर अंबाजोगाईतील वसुंधरा नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक सिद्राम कांबळे, प्रसिद्ध व्यापारी हाफेज सलिम चौधरी, आदित्य अ‍ॅटो यामाहा मोटर्स अंबाजोगाईचे वितरक कल्याण गुंजकर व सय्यद इफ़्तेख़ार जिल्हा अध्यक्ष जमात-ए-इस्लामी - हिंद बीड हे होते. यावेळी व्यासपिठावर देशमुख पतसंस्थेचे  बिभीषण देशमुख, शहर अध्यक्ष जे.आय.एच तथा संचालक मुजीब काजी, चेअरमन शेख उमर फारूक, एस.बी. सय्यद, शेख रहीमभाई आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना सय्यद शफीक हाश्मी म्हणाले की, आज सामान्य माणसाला कोणी वाली नाही, सामान्य माणसाला कोठे पत व प्रतिष्ठा नाही. अशा माणसाची समाजामध्ये पत आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम अलखैर नागरी सहकारी पतसंस्था करीत आहे. अल्लाहने फर्माविले आहे की, गरजवंतांच्या मदतीला आपण धावले पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्याला अडचणीतून बाहेर काढले पाहिजे. त्या अल्लाहच्या आदेशाची अंमलबजावणी खर्‍या अर्थाने अलखैर परिवार करीत आहे. समाजामध्ये अनेक संस्था काम करतात. परंतु त्यांच्याकडे केवळ व्यावहारिक दृष्टीकोन असतो. लोकसेवा ही कमी प्रमाणात असते. अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही समाजातल्या छोट्या माणसांना मोठे करीत असल्याचेही ते म्हणाले.  प्रास्ताविक चेअरमन  शेख उमर फारूक यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल सचीव मो.मुजम्मिल यांनी मांडला. त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष शेख तालेब चाऊस, सचिव खतीब मोहम्मद मुजम्मील, संचालक शेख मुजाहेद, मुजीब काझी, शेख रिझवान, शेख मुनिरोद्दीन, पठाण नसिमुन्निसा बेगम, सिद्दिकी अर्शिया तरन्नुम, व्यवस्थापक सय्यद रऊफ आदींसह सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
    नुकतेच दिल्ली येथे झालेल्या बिनव्याजी संस्थांच्या कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अलखैर नागरी सहकारी संस्थेने पटकाविला. या कार्यशाळेत देशभरातील 62 बिनव्याजी संस्थांनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्रातील 12 संस्थांचा सहभाग होता. अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचय या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget