Halloween Costume ideas 2015

हाऊडी मोदी

भारताच्या मूळ समस्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न

अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत प्रचंड नौटंकी केली. तेथे उपस्थित सुमारे पन्नास हजार लोकांनी दोन्ही नेत्यांचा जयजयकार केला. दोघांनीही   एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले आणि दोघांनीही ’इस्लामिक टेररिझम’ आणि पाकिस्तानला फटकारले. हे खरे आहे की पश्चिम आणि दक्षिण आशियामध्ये दहशतवादाने त्याचे क्रूर पंजे  पसरवले आहेत. ’इस्लामिक टेररिझम’ च्या नावाने हा उन्माद भडकावला जात आहे. पण ते हे विसरले की इस्लामिक दहशतवादाची बीजे अमेरिकेने पेरली होती. अमेरिकेने मुस्लिम  तरुणांच्या मनात विष भरण्याचा एक पाठ्यक्रम बनविला आहे. इस्लामची प्रतिगामी आवृत्ती पाकिस्तानमध्ये स्थापित मदरशांच्या माध्यमातून प्रसारित केली गेली. पाकिस्तानने  अफगानिस्तानला ताब्यात घेतलेल्या सोवियत सैन्यांशी लढा देण्यासाठी मुजाहिदीनींना तयार केले. अमेरिकेने धार्मिक मुजाहिदीनची फौज तयार करण्यासाठी 800 दशलक्ष डॉलर्स खर्च  केले. या मुजाहिदीनीना सात हजार टन शस्त्रे आणि दारूगोळा उपलब्ध करुन देण्यात आला. या दहशतवाद्यांचा अमेरिकेने स्वत: च्या फायद्यासाठी उपयोग केला आणि आता ते  नेहमीच दहशतवादाच्या विरोधात असल्याचे सांगत आहे. हिलरी क्लिंटन यांच्या शब्दांत अमेरिकन सरकारचे असे मत होते, की ते (मुजाहिद्दीन) सौदी अरेबिया आणि इतर देशांमधून   येऊ द्या, त्यांना वहाबी इस्लाम आयात करू द्या जेणेकरुन आम्ही सोव्हिएत संघाचा पराभव करू शकू.
अमेरिकेत झालेल्या जबरदस्त
मिरवणुकीच्या बरोबरीने बऱ्याच घटना घडल्या आहेत. मोदींच्या कार्यक्रमात भारतीयांच्या मोठ्या उपस्थितीबद्दल मीडिया बरेच काही सांगत आहे परंतु त्याशी संबंधित इतर बऱ्याच घटनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उदाहरणार्थ, मोदींच्या धोरणांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांची चर्चा नाही. अमेरिकेत वास्तव्य करणारे भारतीयांचे एक मोठे प्रमाण हिंदू राष्ट्रवाद आणि  मोदींचे समर्थक आहेत. परंतु तेथील बऱ्याच भारतीयांनाही भारतातील मानवाधिकारांची खालावत चाललेली परिस्थिती आणि लोकशाही हक्कांशी होत असलेली पायमल्ली याची चिंता  वाटते. डेमोक्रॅट नेते बर्नी सेंडर्स यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प भारतात धर्म स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांवर होत असलेल्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करून मोदींचे समर्थन  करत आहेत. ते म्हणाले, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प धार्मिक छळ, दडपशाही आणि निर्दयतेवर मौन बाळगतात, तेव्हा जगभरातील निरंकुश नेत्यांना हा संदेश जातो की, आपण जे काही करत  आहोत त्यामुळे आपले काहीही नुकसान होणार नाही. मोदींनी आपल्या प्रदीर्घ भाषणात जे काही सांगितले त्यातील सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे ’भारतात सर्व काही ठीक आहे.’
मोदी असे म्हणत आहेत जेव्हा संपूर्ण काश्मीरसह भारतातील अनेक भागात राहणाऱ्या भारतीयांना त्यांचे मूलभूत नागरी हक्क नाकारले जात आहेत. शेवटच्या ओळीत उभा असलेला तो  शेवटचा माणूस ज्यांच्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी अत्यंत प्रेम करायचे त्या माणसाशी मोदींना काहीच देनेघेणे असल्याचे वाटत नाही. बहुतेक प्रेक्षकांनी विचार न करता मोदींचे भाषण  गिळंकृत केले असले तरी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने निदर्शकांनी मोदींच्या कारकीर्दीत देशाच्या वास्तविक स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
हाऊडी मोदीवेळी विरोध प्रदर्शन करणाऱ्या सुनिता विश्वनाथन यांनी केलेली टीका अत्यंत महत्त्चाची होती. सुनीता विश्वनाथन ’हिंदू फॉर ह्यूमन राईट्स’च्या सदस्या आहेत. ही संघटना  अनेक संस्थांच्या गठबंधनाचा भाग आहे. ’अलायन्स फॉर जस्टिस अँड अकाउंटबॅबीलिटी’ असे या गठबंधनाचे नाव आहे. सुनीता म्हणाल्या की,’ वसुधैव कुटुंबकम’चे शिक्षण देणाऱ्या  आमच्या धर्माचे अशा अतिउत्साही राष्ट्रवादींनी अपहरण केले आहे. जे की मुस्लिमांची लिंचिंग करत आहेत. लोकशाहीला तुडवत आहेत. कायदा व्यवस्थेचा खेळ बनवित आहेत आणि  आपल्या विरूद्ध आवाज उठविणाऱ्यांना ताब्यात घेत आहेत. येथपर्यंत की त्यांचाही खून करीत आहेत. आजच्या परिस्थितीत कश्मीरी लोकांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल आम्ही फार संतापलेलो आहोत. देशात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स (एनआरसी)च्या नावावर 19 लाख लोकांना राज्यविहीन केले गेले आहे. आज भारत कोणत्या दिशेने  जात आहे हे समजणे कठीण झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था खड्ड्यात जात असताना आमचे पंतप्रधान अमेरिकेत उत्सव साजरे करतात. कोट्यवधी कामगारांना आपल्या नोकरीवर  पाणी सोडावे लागले. सर्वसामान्य नागरिक सरकारच्या धोरणांनी त्रस्त आहेत. सरकारला त्यांची काही काळजी वाटत नाही. तिहेरी तालक, कलम 370 आणि एनआरसी सारखे मुद्दे  सरकारसाठी अधिक महत्त्वाचे आहेत. एनआरसी आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड संपूर्ण देशात लागू होईल अशी चर्चा आहे.
गेल्या काही वर्षांत सरकारच्या प्राधान्यक्रमात आणि ध्येय धोरणात मोठा बदल झाला आहे. आमच्या प्रजासत्ताकाच्या प्रारंभीच्या काळात आम्ही उद्योग, विद्यापीठे आणि मोठे धरणे  बांधून देशाचा पाया रचला. यामागचा विचार हा होता की नागरिकांचे जगणे सर्वात महत्वाचे आहे. त्या धोरणांच्या अंमलबजावणीत त्रुटी असू शकतात, परंतु त्यांची दिशा योग्य होती.  त्या धोरणांमुळे देशातील औद्योगिक व कृषी उत्पादन वाढले, साक्षरतेचे प्रमाण सुधारले, आरोग्य निर्देशांक सुधारले आणि आर्थिक प्रगती झाली. त्यावेळी ओळखीसंबंधित काही मुद्यांना  बाजूला ठेवले गेले. त्याचा देशाच्या धोरणांच्या दिशानिर्देशावर परिणाम होऊ दिला नाही. त्यावेळी केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आज भारत ही जागतिक आर्थिक शक्ती  बनली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून देशाची दिशा बदलली आहे. आता सरकार जनतेची पालक राहिली नाही. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत की नाहीत यासंबंधी  सरकारला काही देणेघेणे उरलेले नाही. तसेच ज्या क्षेत्रापासून जनतेच्या गरजा पूर्ण होण्यास महत्वाची भूमिका बजावली जाऊ शकते त्यापासून सरकार बाजूला सरकत आहे.
राममंदिराच्या आंदोलनाला शिडी बनवून सत्तेत पोहोचलेल्या भाजपाचा दावा आहे की ती ’मतभेद असणारा पक्ष (पार्टी विथ डिफ्रन्स) ’ आहे. आणि आता प्रत्येकाचा असा विश्वास आहे  की ती खरोखर एक वेगळ्या प्रकारची पार्टी आहे. हिंदू राष्ट्रवाद ही त्याची धोरण निर्माता व मार्गदर्शक आहे. अशा पद्धतीचा राष्ट्रवाद धार्मिक अस्मिता आणि अल्पसंख्यांकांबद्दलचा द्वेष  या भावनेवर टिकून आहे. हे ध्रुवीकरण जगभरातील राष्ट्रवादी पक्षांना निवडणुकांमध्ये मदत करते. हाऊडी मोदी सारख्या कार्यक्रमांच्या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर, सामान्य भारतीयांच्या  प्रश्नांकडे आपण देशाचे लक्ष कसे आकर्षित करतो, हा आपल्यासमोर आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. (इंग्रजी ते हिंदी रूपांतरण अमरीश हरदेनिया) (लेखक आयआयटी, मुंबई येथे  शिकवित होते आणि 2007 च्या राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्काराने सन्मानित आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget