Halloween Costume ideas 2015

लैंगिक दहशतवाद

इस्लामी शरीअत कायद्यात बलात्काराला एक वेगळा अपराध गट म्हणून वर्गीकृत केले गेले नाही. ज्यामुळे यावर शिक्षा-संदर्भात काहीसा संदेह निर्माण झाला आहे. काही लोकांनी चुकीने असे समजून घेतले आहे की बलात्काराचे व्यभिचाराच्या शीर्षकान्वये मूल्यांकन करण्याची गरज आहे. वास्तविक बलात्कार दहशतवादी अपराधांच्या श्रेणीत येतो, ज्याला ’हिराबा’ म्हटल जाते. ’हिराबा’ म्हणजे लोकांवर सशस्त्र हल्ला करून किंवा बळाचा वापर करून त्यांना धमकावून भयभीत करणे, हत्या करणे, त्यांच्यावर दहशत बसविणे आणि जोर जबरदस्तीने उघडपणे त्यांची संपत्ती ताब्यात घेणे होय. संपत्तीचा उल्लेख प्रामुख्याने केला गेला आहे, कारण ’हिराबा’ दरोडाशी जुळलेला आहे, परंतु हा आदेश समानरीत्या त्या लोकांना लागू पडतो, जे बलात्काराच्या हेतुने इतरांना आतंकित करतात.
    इस्लाम धर्मात हिराबा मोठमोठ्या अपराधांमध्ये सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचा अपराध आहे आणि कुरआन व पैगंबरीय आचरणशैली (सुन्नत) नुसार याचा कठोरपणे निषेध केला गेला आहे. वस्तुतः अशा अपराधांच्या शिक्षेसंबंधी कुरआनात अल्लाहचे फर्मान खालीलप्रमाणे आहे ः
    ”जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी लढतात आणि जमिनीवर बिघाड निर्माण करण्यासाठी धाव-पळ करतात, त्यांचा मोबदला तर केवळ हाच आहे की त्यांना वाईटरीत्या ठार केले जावे किंवा सूळावर चढविले जावे किंवा त्यांचे हात-पाय परस्पर विरूद्ध दिशेत कापून टाकले जावेत किंवा त्यांना देशाबाहेर घालविले जावे. हा अपमान आणि तिरस्कार त्यांच्यासाठी जगात आहे आणि आखिरतमध्ये त्यांच्यासाठी भयंकर यातना आहे. परंतु जे लोक, या आधी की तुम्हाला त्यांच्यावर अधिकार प्राप्त व्हावा, परत येतील (अर्थात क्षमा-याचना करून सुधारतील) तर अशा स्थितीत तुम्हाला माहीत असले पाहिजे की अल्लाह मोठा क्षमाशील दया करणारा आहे.” (कुरआन - 5 ः33,34).
इस्लामी कायद्यात व्याभिचार व बलात्कारात फरक
    इस्लाम धर्माचे सुरूवातीच्या काळातील विद्वान, विशेषतः अल् दसूकी आणि न्यायाधीश इब्नुल अरबी यांनी हे कारण स्पष्ट केले की बलात्काराला व्यभिचाराच्या उलट ’हिराबा’ (दहशतवादा)च्या अपराधांसमान का समजले गेले पाहिजे. इब्नुल अरबी एक घटना सांगतात, ”जिच्यात एका समुहावर हल्ला चढविला गेला आणि त्या समुहातील एका स्त्रीवर बलात्कार केला गेला.” काही लोकांचा या संदर्भात तर्क असा होता की हा अपराध ’हिराबा’मध्ये समाविष्ट केला जाऊ नये, कारण यात संपत्ती वगैरे लुटली गेली नाही आणि शस्त्रांचाही वापर झाला नाही. या तर्कास उत्तर देताना इब्नुल अरबी म्हणाले, ”लज्जास्थानांवर घातलेला दरोडा, संपत्तीवर टाकलेल्या दरोड्यापेक्षा अधिक वाईट आहे आणि असा कोण आहे जो आपला बलात्कार केल्या जाण्याच्या तुलनेत आपल्यावर दरोडा टाकला जाणे पसंत करील.” हे वर्गीकरण तर्कसंगत आहे कारण यात जी वस्तू घेतली गेली ती पीडित व्यक्तीची संपत्ती होय आणि ही संपत्ती त्या व्यक्तीच्या मान-प्रतिष्ठा आणि सुरक्षेची भावना आहे.
    अशा प्रकारे ’हिराबा’च्या स्वरूपात बलात्कार एक हिंसक अपराध आहे. ज्यात बलात्काराचा वापर एका शस्त्राच्या स्वरूपात केला जातो. अशा प्रकारे हिराबाचा खटला चालविण्यात लक्ष बलात्काराच्या आरोपीवर केंद्रीत होते. विशेषतः त्याचा इरादा आणि शारीरिक कृत्य आणि खटल्याचे लक्ष बलात्काराला बळी पडलेल्या व्यक्तीवर नसते, कारण यात सहमती घेतली गेलेली नसते. हिराबाचा आरोप सिद्ध करण्यासाठी चार साक्षीदारांची गरज भासत नाही जशी सध्याच्या काळातील काही अप्रामाणिक शरीअत कौंसिल चुकीने विश्‍वास ठेवतात. त्याच्याऐवजी यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर वैद्यकीय तपासणी आणि प्रमाणांच्या आधारे खटला चालविला जातो.
    परिणामी, बलात्काराच्या अपराधीला अपराधी म्हणून सिद्ध करणे पूर्णतः नाजूक ठरते कारण इस्लामी न्यायालयात याचा अर्थ गुन्हेगाराच्या जीवन-मृत्यूचे अंतर आहे. यास्तव ही गोष्ट निर्धारित करण्यासाठी एक काळजीपूर्वक मूल्यांकन केले जाते. आरोपी असलेल्या व्यक्तीने काय खरोखर हा अपराध केला आहे? जर ठोस पुराव्यांनी हे सिद्ध झाले की लैंगिक संबंध आपसातील संमतीने झाला आहे आणि बलात्काराच्या आरोपीवर मिथ्यारोप ठेवला जात आहे. तर त्या दोघांवर व्यभिचाराचा आरोप निश्‍चित केला जाईल आणि त्या दोघांना, व्यभिचाराच्या अपराधाचीच शिक्षा मिळेल.
- सय्यद हामीद मोहसीन
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget