मुंबई-
इंग्लंडस्थित केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाला भारतीय शास्रज्ञ डॉ. युसूफ हमीद यांचे नाव देण्यात आले आहे. सिप्ला या औषधनिर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.हमीद यांच्या नावाने हा विभाग २०५० पर्यंत ओळखला जाईल. यासंबंधीची घोषणा केम्ब्रिज विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी केली.
वयाचे ८४ वर्ष पूर्ण करणारे डॉ. हमीद ख्राईस्ट कॉलेजचे विद्यार्थी होते.
केम्ब्रिजशी त्यांचा मागील ६६ वर्षांपासून संबंध असल्याचे विद्यापीठाने
म्हटले आहे. तसेच जगातील सर्वात जुन्या रसायनशास्रातील अध्यासनांपैकी एक
असलेल्या अध्यासनाला आता युसूफ हमीद १७०२ चेअर म्हणून ओळखले जाईल.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. स्टीफन जे टोपे म्हणाले,"युसूफ हॅमिद यांनी केंब्रिजमध्ये असतानापासून जीवनातील सकारात्मक बदलांसाठी एक निर्विवाद वचनबद्धता दर्शविली आहे. विभागातील त्यांच्या योगदानाचा विद्यार्थ्यांना आणि संशोधनाला मोठा फायदा होणार आहे.'
डॉ. हमीद यांचे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेशी (आयसर) विशेष संबंध होते. जागतिक स्तरावरील पदवी आणि विज्ञान प्रसार (आउटरिच प्रोग्रॅम) साठी पंधरा कोटी दिल्याचे, आयसरचे ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी सांगितले.
केंब्रिजने मला रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा पाया दिला, मला कसे जगायचे ते शिकवले आणि समाजात कसे योगदान द्यावे हे मला सांगितले. मी एक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी होतो. म्हणून भविष्यातील विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना मदत करण्यास मला आनंद होत आहे. - डॉ. युसूफ हमीद.
Post a Comment