Halloween Costume ideas 2015

मुलगी वाचवा

हुमा आर. दलवाई
मिरजोळी, चिपळून

अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती मनुष्य आहे आणि सर्वात सुंदर निर्मिती मुलगी आहे. पण आजकाल मुलींसोबत अतिशय दुर्व्यवहार करण्यात येत असल्याचे दिसून येते. देशात ’बेटी बचाव बेटी पढाव’ची घोषणा देण्यात आली. मात्र मुलींवर अक्षरशः अत्याचार सुरू आहेत. बेटी बचाव बेटी पढाव या घोषणेचा काहीच उपयोग होताना दिसून येत नाही. मुलींना शिकविल्या जात आहे, परंतु वाचविल्या जात नाही. समाजात सर्वत्र मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्व दिले जात असल्याचे चित्र आहे. अशात सर्व धर्मांच्या अनुयायांचे विशेषतः मुस्लिम धर्मीयांचे हे कर्तव्य आहे की, मुलींना वाचविण्याची काळजी करावी. मुलींना शारीरिक तर काय मानसिक दृष्ट्यासुद्धा इजा देण्यात येवू नये. ज्या लोकांनी 8 वर्षाच्या मुलीला कठुवा येथे  सोडले नाही, विचार करा असे लोक दुसऱ्या मुलींसोबत कसा व्यवहार करीत असतील.
   मुलींना वाचविण्याचे कर्तव्य फक्त आई-वडिलांचे नाही तर काका-काकू व इतर वडिलधारी माणसे व समाजातील एकूणच सर्व लोकांची ही जबाबदारी आहे. मुली तर घराची रौनक (उज्ज्वला) असतात. अठरा वर्षांपेक्षा मोठ्या मुलींसोबत अनेकवेळा वाईट वर्तणुकीची सुरूवात त्यांच्या घरातून होते. अवास्तव स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सुद्धा अनेक मुली अडचणीत सापडतात.
    मुलींबाबत नकारात्मक परिस्थिती एवढी जास्त आहे की, आजही मोठ्या प्रमाणात लपून-छपून भ्रृणहत्या केल्या जातात. मला तर असे म्हणावे वाटते की, मुली वाचवा म्हणजे देश वाचेल. सरकारकडे माझी मागणी आहे की, कठुआच्या मुलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ कठोरतम शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून इतर कोणालाही लहान मुलींवर अत्याचार करण्याची हिम्मत होणार नाही.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget