(२६) सांगा, ‘‘हे अल्लाह समस्त राज्याच्या स्वामी! तू हवे त्याला राज्य देतोस व हवे त्याकडून हिरावून घेतोस. हवे त्याला प्रतिष्ठा प्रदान करतोस व हवे त्याला अपमानित करतोस. कल्याण तुझ्याच अखत्यारित आहे. नि:संशय, तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस.
(२७) तू रात्रीला दिवसात ओवीत आणतोस आणि दिवसाला रात्रीत, निर्जिवातून सजीवास बाहेर काढतोस व सजीवातून निर्जिवास आणि ज्याला इच्छितोस त्याला उदंड उपजीविका देतोस.२४
(२८) श्रद्धावानांनी, श्रद्धावानांना सोडून अश्रद्धावानांना आपला मित्र-सोबती व साहाय्यक मुळीच बनवू नये. जो असे करील त्याचा अल्लाहशी काही संबंध नाही. होय, त्यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी सकृतदर्शनी जर तुम्ही अशी कार्यपद्धती अवलंबिली तर ती क्षम्य आहे.२५ परंतु अल्लाह तुम्हाला आपले स्वत:चे भय दाखवितो आणि तुम्हाला त्याच्याकडेच परत जावयाचे आहे.२६
(२९) हे नबी! लोकांना माहिती करून द्या की, तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा प्रत्येक स्थितीत अल्लाह ते जाणतो, पृथ्वी व आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे.
(३०) तो दिवस उगवणार आहे, जेव्हा प्रत्येक सजीवाला आपल्या कृतीचे फळ उपलब्ध असल्याचे आढळेल मग त्याने पुण्य केले असो अथवा पाप. त्या दिवशी मनुष्य अशी कामना करील की, किती छान झाले असते, जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार दूर असता! अल्लाह तुम्हाला आपल्या स्वत:चे भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे.२७
२४) जेव्हा मनुष्य एकीकडे अवज्ञाकारी आणि नकार देणाऱ्यांकडे पाहतो आणि त्यांच्या या जगातील भरभराटीकडे पाहतो; तसेच दुसरीकडे ईमानवंतांच्या आज्ञापालनाकडे पाहतो आणि त्यांचे या जगातील हालअपेष्टा, दारिद्र्य, निर्धनता आणि अनेक दु:ख आणि अडचणींना पाहतो. ज्यात आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.), सहाबा (रजि.), हि. सन ०३ आणि निकटच्या काळात ईमानवंत लोक ग्रस्त होते. ही स्थिती पाहून स्वाभाविकच त्यांच्या मनात न्यूनगंडाने अनेक प्रश्न घोळू लागतात. म्हणून अल्लाहने येथे मनुष्याला उत्तर दिले आहे आणि तेसुद्धा अत्यंत सूक्ष्म शैलीत ज्याच्या सूक्ष्मतेपेक्षा अधिक सूक्ष्मतेचा विचारच केला जाऊ शकत नाही.
२५) म्हणजेच एखादा ईमानवंत एखाद्या इस्लामविरोधी गटात फसला आणि त्याला त्यांच्या अन्याय व अत्याचाराची भीती असेल तर त्याला आपल्या ईमानला लपविण्याची परवानगी आहे. विरोधी लोकांत अशाप्रकारे तो राहू शकतो जसा त्यांच्यापैकीच एक तो आहे. तो मुस्लिम असल्याचे उघड झाले तर आपल्या प्राण रक्षणासाठी अनेकेश्वरवादीशी मैत्रीपूर्ण नीतिप्रदर्शन करू शकतो. अत्यंत बिकट स्थितीत मुस्लिमाला (सहनशक्ती तितकी नसेल तर) धर्मविरोधात बोलण्याचीसुद्धा परवानगी आहे.
२६) म्हणजे माणसांची भीती तुमच्या मनात एवढे घर करून बसू नये की अल्लाहचे भय मनातून नष्ट व्हावे. माणसं जास्तीतजास्त तुमचे ऐहिक जीवन बिघडवू शकतात, परंतु अल्लाह तुम्हाला शाश्वत कोपग्रस्त करू शकतो. म्हणून आपल्या बचावासाठी मजबुरीच्या स्थितीत विरोधकांशी वाटाघाटी कराव्या लागल्या तर तेसुद्धा इस्लामी चळवळ आणि इस्लामी हित तसेच मुस्लिमांच्या वित्त व जीवाचे रक्षण करून तुम्ही आपल्या वित्त व जीवाचे रक्षण करू शकता. परंतु खबरदार! इस्लामविरोधी आणि धर्मविरोधकांची अशी कोणतीच सेवा तुमच्या हातून घडू नये, ज्यामुळे इस्लाम विरोधात वृद्धी होईल आणि मुस्लिमांवर विरोधक प्रभावी होतील. जाणून असा की आपण स्वत:ला वाचविण्यासाठी तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्म) ला, अथवा मुस्लिमांना, िंकवा एका मुस्लिमालाही नुकसान पोचविले अथवा अल्लाहच्या विद्रोहींची खरी सेवा केली तर अल्लाहच्या पकडीतून तुम्ही वाचू शकणार नाहीत. तुम्हाला सरतेशेवटी त्याच्याचकडे रुजू व्हायचे आहे.
२७) म्हणजे तो तुमचा महान हितैषी आहे की तुम्हाला वेळेपूर्वी त्या कर्मापासून सावध करीत आहे जे तुमच्या दुष्परिणामास कारणीभूत ठरू शकतात.

Post a Comment