Halloween Costume ideas 2015

देशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती - डॉ. प्रतिभाताई पाटील

पुणे –
    अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. समाजात राहात असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गाNहाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र संपादक परिषद आयोजित पत्रकारिता साहित्यगौरव पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारार्थींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
    महाराष्ट्र संपादक परिषद ही कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत असणारी संघटना आहे. राज्य व केंद्र सरकारदरबारी पत्रकार तसेच वृत्तपत्रे यांचे प्रश्न मांडण्यासोबतच पत्रकारांसाठी परिषदेतर्फे विविध उपक्रमही राबविण्यात येतात. आदर्श पत्रकारिता व साहित्य गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा दरवर्षी परिषदेतर्फे सन्मान करण्यात येतो.
    प्रतिभाताई पाटील पुढे म्हणाल्या, समाजातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी वृत्तपत्रांना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे लोकशाहीत वृत्तपत्रांच्या जबाबदाऱ्यांना अधिक महत्त्व आहे.
    महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब कोयटे (संपादक, व्रेâडिट न्यूज) कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होत़े संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे (ज्येष्ठ संपादक, दै. देशोन्नती), अध्यक्ष संजय मलमे (संपादक, दै. पुण्यनगरी), कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
    ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच न्यूज १८ लोकमतचे दिनेश केळुस्कर, रत्नागिरी (स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार), अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार), नीला खोत, ज्येष्ठ पत्रकार, जालना (लोकमान्य टिळ्क स्मृती पुरस्कार), नवनाथ दिघे, ज्येष्ठ पत्रकार, दिव्य मराठी, शिर्डी (विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्कार), राजेश जगताप, शोध पत्रकार, दै. पुढारी, ठाणे (आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार), शौकतअली मिरसाहेब, ज्येष्ठ पत्रकार, अकोला (प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार), संदीप आचार्य, वरिष्ठ सहसंपादक, लोकसत्ता, मुंबई (गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार), देवेंद्र पळणीटकर, संपादक, दै. ऐक्य, सातारा (भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्कार) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
    प्रकाश पोहरे म्हणाले, ‘आपल्यामधला पत्रकार कधीही मरू न देणे, ही काळजी संपादकाला घ्यावी लागत़े संपादकपद सांभाळणे आव्हानात्मक असून नवीन पिढीने या क्षेत्रात येताना पुरेशी तयारी करणे गरजेचे आह़े’
    सर्व पुरस्कारविजेत्या पत्रकार, संपादकांना शुभेच्छा देऊन विजय बाविस्कर यांनी पत्रकारितेचा गाभा आणि गाभारा शाबूत ठेवण्याचे आवाहन केल़े
    पुरस्कारविजेत्यांच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केल़े  प्रा. हेमंत सामंत यांनी सूत्रसंचालन केले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget