Halloween Costume ideas 2015

साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांचे भावीविश्वही समृद्ध बनते – हिंगोणेकर

शिरूर : साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांचे भावीविश्वही समृद्ध बनते असे प्रतिपादन पहिल्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे विभागीय सचिव शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. शिरूरकासार सारख्या गावात एकता विचार मंचने संमेलनाचे यशस्वीरीत्या आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे. या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीच्या माध्यमाने संमेलनाध्यक्ष प्रा. सय्यद अलाउद्दीन यांच्या हस्ते झाली. या वेळी नगराध्यक्ष रोहीदास पाटील, रा. काँ. च्या ज्येष्ठ नेत्या चंपावती काकी पानसंबळ, जि. प. सदस्य शिवाजी पवार, पं. स. सभापती प्रतिनिधी निवृत्ती बेदरे, सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे, पत्रकार विजयकुमार गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    एकता विचार मंचचे अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड यांच्या 'अंदमानचा प्रवास' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्वच्छतादूत कु.योगीता गवळी हीला एकता विचार मंचच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना अनंत कराड यांनी केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.सविताई गोल्हार यांनी गावोगावी अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
    प्रा. डॉ. भास्कर बडे, राजेंद्र धोंडे, रामदास बडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश टाक, युवाकवी युवराज वायभासे यांची समायोजित भाषणे झाली. संमेलनाध्यक्ष प्रा. सय्यद अलाउद्दीन यांच्या उत्साहपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
    संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेला 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यानंतर नागेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन कवी अनंत कराड यांनी केले.
    संमेलनाच्या यशस्वीतेसाठी हरीप्रसाद गाडेकर, शिवलिंग परळकर, बाळासाहेब बोराडे, काशिनाथ शिंदे, राजेश बीडकर, लखुळ मुळे, अ‍ॅड. भाग्यश्री ढाकणे, मनोज कुलकर्णी, सिद्धार्थ सोनवणे, महेश नागरे, ज्ञानेश परदेशी, नितीन कैतके, उद्धव परदेशी, रामेश्वर गोसावी, अस्मिता जावळे, अशोक भांडेकर, बबनराव देशमुख, युवराज सोनवणे, चंद्रकांत राजहंस, मल्हारी आघाव, अनिलसिंह तिवारी, दत्ता शिंदे, संतोष गायके यांनी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget