Halloween Costume ideas 2015

लोकशाहीचं अपहरण होतंय

मुंबई-गुन्हेगारांना न्यायालयांसमोर सुनावणी करून शिक्षा देण्याएवजी त्यांना क्लीन चिट देण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. हे प्रकार देशव्यापी झाले असून न्यायव्यवस्थेची भयानक थट्टाच सुरू आहे, असं सांगतानाच, नोटाबंदीचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी रिझर्व्ह बँकेपेक्षा सरकारच्या तंत्राने चालताना दिसत असून हा प्रकार म्हणजे लोकशाहीचं अपहरणच आहे,’ असा संताप बुद्धिजीवींनी व्यक्त केला आहे.
    ज्येष्ठ कवियत्री प्रज्ञा पवार, तुषार गांधी, विजय दिवाण, किशोर बेडकीहाळ, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. राम पुनियानी, राजन अन्वर, सुरेश भुसारी, राज कुलकर्णी, डॉ. विवेक कोरडे, आशुतोष शिर्के, भारती शर्मा, लोकेश शेवडे, सुनील वालावलकर, डॉ. दिलीप खताळे आणि डॉ. मंदार काळे आदी बुद्धिजीवींनी एक पत्रक काढून नोटाबंदीपासून ते कठुआ-उन्नावच्या बलात्काराच्या घटनेवर भाष्य करत संताप व्यक्त केला आहे.
    उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि काश्मीरमधील कठुआतील बलात्काराच्या घटना या देशासाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया या बुद्धिजीवींनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बलात्काराचे आणि खूनाचे गुन्हे असून ते स्वत:ला क्लीन चिट देत आहेत. तसेच माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांनाही बलात्कार प्रकरणातून क्लीन चिट देण्यात येत असून सध्या देशात बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे शासकीय धोरण राबवले जात आहे काय?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.
    अर्थव्यवस्थेची वाट लावणारं, देशाचं वाटोळं करणारं, स्त्रीया, दलित आणि कामगारांचं संरक्षण न करू शकणारं आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविणारं हे सरकार गेलंच पाहिजे, त्यासाठी लोकशाहीनिष्ठ आणि संविधानावर विश्‍वास असणाऱ्या नागरिकांनी एकत्र यायला हवं, अशी हाकही या पत्रकातून देण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीला जगवण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची ही कटिबद्धता सिद्ध करण्याचाच आमचा हा प्रयत्न असल्याचंही या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आलं आहे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget