Halloween Costume ideas 2015

राजर्षी शाहू, कर्मवीरांचे विचार प्रभावीपणे पुढे यावेत

– एम. बी. शेख
कोल्हापूर

    राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार साहित्यातून प्रभावीपणे पुढे यावेत, या विचारांचा शासनावर दबाव निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक एम. बी. शेख यांनी येथे केले.
    येथील संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेतर्फे आयोजित ग्रंथपुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या कार्यक्रमास उद्योजक एस. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते.
    उद्योजक शेख म्हणाले, साहित्यातून सर्वसामान्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेने सन्मानित केलेल्या साहित्यिक, लेखकांच्या साहित्य, लेखनातून त्याचे दर्शन घडते. अध्यासनाने अविरतपणे साहित्यसेवा सुरू ठेवावी.
    उद्योजक पाटील म्हणाले, प्लास्टिकमुक्तीचे आपण सर्वांनी समर्थन करावे. साहित्यिकांनी आपल्या लेखनातून प्लास्टिकचे दुष्परिणाम मांडावेत.
    या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत ग्रंथ पुरस्कार, पुस्तक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
    या वेळी परीक्षक श्याम कुरळे, डॉ. जी. पी. माळी, डॉ. अ. आ. दिवाण, आदींनी मनोगत व्यक्त केले.
    सुनीलकुमार सरनाईक, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. सु़जय पाटील, गजानन रेळेकर, मनोहर दिवाण यांना संत ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा पाटील, प्रतीक पाटील, नवनाथ गोरे, अरुणकुमार यादव, आ. क. कुरुंदवाडे, कल्लप्पा पाटील, जयश्री वानवे, अनिल चव्हाण यांना कर्मवीर साहित्य परिषदेच्या पुस्तक पुरस्काराने गौरविण्यात आले.
    कार्यक्रमास सुधाताई पाटील, मुरलीधर देसाई, युवराज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. टी. आर. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. एम. डी. देसाई यांनी आभार मानले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget