(८) ते अल्लाहजवळ प्रार्थना करीत असतात की, ‘‘हे पालनकर्त्या! जेव्हा तू आम्हास सरळमार्गावर आणले आहेस तर आमची मने वक्रतेत गुंतवू नकोस. आम्हाला तुझ्या औदार्याच्या भांडारातून कृपा प्रदान कर, कारण तूच खऱ्या अर्थाने उदार आहेस.
(९) हे पालनकत्र्या, नि:संशय तू एके दिवशी सर्व लोकांना एकत्रित करणार आहेस, ज्या दिवसाच्या आगमनाबद्दल कसलीही शंका नाही, तू आपल्या वचनापासून मुळीच ढळणारा नाहीस.’’
(१०) ज्या लोकांनी द्रोहाचा मार्ग अवलंबिला आहे,८ त्यांना अल्लाहपासून वाचविण्यासाठी त्यांची धनसंपत्ती उपयोगी पडणार नाही किंवा त्यांची संततीदेखील. ते नरकाग्नी चे इंधन बनून राहतील.
(११) त्यांचा शेवट तसाच होईल, जसा फिरऔनचे सोबती व त्यांच्या पूर्वी अवज्ञा करणाऱ्यांचा झाला आहे. कारण त्यांनी अल्लाहच्या संकेतांना (निशाण्या) खोटे ठरविले. परिणामस्वरूप अल्लाहने त्यांच्या अपराधांसाठी त्यांना पकडले आणि सत्य असे आहे की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.
(१२) म्हणून हे पैगंबर (स.)! ज्या लोकांनी तुमचे आवाहन मान्य करण्यास नकार दिला आहे, त्यांना सांगून टाका की, ती वेळ जवळच आहे जेव्हा तुम्ही पराभूत व्हाल, व नरकाकडे तुम्हांस हाकून नेले जाईल, व नरक (जहन्नम) फारच वाईट स्थान आहे.

(१३) त्या दोन्ही गटांमध्ये तुमच्यासाठी बोधचिन्ह होते, जे (बदरच्या युद्धात) एक दुसऱ्याशी भिडले. एक गट अल्लाहच्या मार्गात लढत होता आणि दुसरा गट द्रोह करणारा होता. पाहणारे उघड्या डोळ्यांनी पाहात होते की, द्रोह करणाऱ्यांचा गट ईमानधारकांच्या गटापेक्षा दुप्पट आहे.९ पण (परिणामाने सिद्ध करून दाखविले की) अल्लाह आपल्या विजयाने व साहाय्याने हवे त्याला मदत देतो.डोळसपणा बाळगणाऱ्यांसाठी त्यामध्ये उत्तम बोध दडलेला आहे.१०
(१४) लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी,– स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी– अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे.
८) तपशीलासाठी पाहा, अध्याय २ रा टीप क्रं. १६१.
९) जरी वास्तविक फरक तिप्पट होता तरी पाहणाऱ्याला वाटत होते की शत्रूंचे सैन्यदल मुस्लिमांपेक्षा दुप्पट आहे.
१०) बदर युद्धाची घटना त्या वेळी घडली जेव्हा नुकतेच मदीना येथे इस्लामी शासन प्रणाली सुनिश्चित होऊ लागली होती. तो इस्लामी शासनप्रणालीचा प्रारंभकाळ होता. म्हणून त्याच्या प्रत्येक घटनांचा आणि परिणामांचा स्पष्ट उल्लेख करून लोकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या युद्धांत तीन गोष्टी अगदी प्रकर्षाने समोर आल्या. एक म्हणजे मुस्लिम आणि विरोधक व (एकेश्वरवादी आणि अनेकेश्वरवादी) ज्या पद्धतीने एकमेकांपुढे उभे ठाकले होते; त्याने दोघांमधील नैतिक फरक अगदी स्पष्ट जाणवत होता. एकीकडे विरोधकांच्या बाजूला मद्यपान, नर्तिकासह नाचगाणे आणि खूप मौजमजा चालली होती तर दुसरीकडे मुस्लिमांच्या लष्करात ईशभय व सदाचार, अत्युच्च दर्जाची नैतिकता, नमाजचे अनुपालन, रमजानच्या रोज्यांचे अनुपालन करुन अल्लाहसमोर तळमळीने प्रार्थना केली जात होती. दोन्ही सैन्यदलांना पाहून स्पष्ट जाणवत होते की दोघांपैकी कोण अल्लाहच्या मार्गात लढत आहे. दुसरे म्हणजे मुस्लिम लोकांनी आपल्या अल्पसंख्य आणि युद्धसामग्रीच्या अभाव असूनसुद्धा सुसज्ज आणि अधिक सैन्यदल बाळगणाऱ्या विरोधकांना पराजयाची धूळ चारली, ती याचमुळे की अल्लाहची मदत त्यांना प्राप्त् होती. तिसरी गोष्ट म्हणजे अल्लाहच्या प्रभावशाली शक्तीपासून बेपर्वा जे लोक आपल्या सुसज्ज आणि अधिक संख्या बळावर पुâलून गेलेले होते त्यांच्यासाठी ही घटना एक चेतावणी होती की अल्लाह कशाप्रकारे काही गरीब, निर्वासित व मदीनेतील मूठभर शेतकऱ्यांद्वारे अरबस्थानातील कुरैशसारख्या सशक्त शिरजोर कबिल्याला पराजित करू शकतो जो सर्व अरबांचा सरदार कबिला होता.

Post a Comment