Halloween Costume ideas 2015

गुणवत्ता पूर्ण शिक्षण मोहिम ‘या नविन क्षितीजाकडे’

मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअरचा पुढाकार : देशातील 75 टक्के मुलांचा शिक्षणाचा दर्जा घसरला


लातूर 

शिक्षणामुळे प्रगतीची दारे उघडतात. स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती साधायची असेल तर शिक्षण घेणे अनिवार्य आहे. जे कुटुंब शिक्षणप्रिय असते त्या कुटुंबात नवचैतन्य निर्माण होते. सत्य-असत्य, बरे-वाईट यातील फरक समजतो. यामुळे ते यशस्वी होवून आपला उद्देश प्राप्त करतात. आयुष्यात प्रगती करणे व यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची गरज असल्याचे मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस वेलफेअर संघटनेला वाटते. यासाठी संघटनेने ’या नवीन क्षितीजाकडे’ ही मोहीम सुरू केली आहे. 

शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात खुप महत्वाची भुमिका पार पाडते. एकंदरीत शिक्षणाची तीन भागात विभागणी केली जाते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण शिक्षण. या प्रत्येक भागाचे आपले महत्व आहे व त्याचे फायदेपण आहेत. प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. जे आयुष्य जगताना सहकार्य करते. माध्यमिक शिक्षण अतिरिक्त अभ्यासाचा मार्ग तयार करते आणि उच्च शिक्षण भविष्य व पूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतात. आमचे चांगले व वाईट शिक्षण असे निर्णय घेणे की आम्ही भविष्यात कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनावे.

शिक्षणाचा घसरत असलेला स्तर हा एक प्रश्नच....सरकारी सर्वे नॅशनल अचिव्हर्स सर्व्हे आणि जागतिक बँके नुसार भारतात 75 टक्के मुलांना वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत आपल्या मातृभाषेतील साधा मजकूर वाचण्यास आणि समजण्यास असमर्थत असणे च्या कक्षेत येतात.  याच कारणामुळे 10 वी ते 12 वी पर्यंत शाळेतील गळतीचे प्रमाण वाढत आहे. याच प्रश्नावर काम करण्यासाठी एमपीजेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्देशाने 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सदरील मोहीम सुरू केली आहे.  आपणास माहित आहे की सन 2019 ते 2021 पर्यंत कोरोना महामारी चालू असल्याने राज्यात टाळे बंदी लागू होती. त्यामुळे सर्व शाळा शिक्षण संस्था बंद होत्या. या कारणामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानाची भरपाई करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी एमपीजे संघटने तर्फे या नविन क्षितिजाकडे असे अभियान सुरू केले आहे. (कम टूवर्डस अ न्यू हॉरिझॉन)

पालकांशी विनंती करताना एमपीजेने म्हटले आहे की, 

1. आपल्या पाल्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांशी संवाद साधावा 2. दररोज आपल्या निरिक्षणात मुलांचा अभ्यास करून घ्यावा. 3. मुलांचे वेळापत्रक बनवावे (खेळ,घरकाम, अभ्यास)

4. मुलांमध्ये वाईट सवयी येऊ देऊ नये. 5. शाळा व्यवस्थापन समिती मार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करावी. 

समाजाकडे विनंती करताना एमपीजेने अपेक्षा केली की, 

1. घरात ग्रंथालय, रिडींग रूम बनवावी. 

2.धार्मिक स्थळावरुन मार्गदर्शन करुन या विषयावर जागरुकता आणावी 

3. आपल्या परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणा संदर्भात पालकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. 

4. शाळेच्या व्यवस्थापण समितीला कृतीशील ठेवावे.

शिक्षकवर्गाला विनंती करताना एमपीजेने म्हटले आहे की,

1. शिक्षकांनी आपली जबाबदारीला गांभीर्याने समजून अध्यापनाचे कार्य पार पाडावे. 

2. आपल्या ज्ञान, कौशल्यात वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. 

3. आपल्या शिक्षणास आकर्षक बनवावे. 

4. शैक्षणिक वर्षाच्या आखेर पर्यंत आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी संपूर्ण संकल्पना योग्य प्रकारे समजून घेईल याचे नियोजन करावे. 

5. आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा, 

असे आवाहन लातूर जिल्हाध्यक्ष हाशमी वसी, रजाउल्लाह खान, शिवानंद सुर्यवंशी,शेख परविन सुल्ताना,गायकवाड प्रभावती कुंदन, फतेह अली खान, शेख शादुल्लाह, शेख महेताब,मुजीब मल्लेवाले,रविंद्र साबणे, शेख अब्दुल्लाह, अमीर हमजा, शेख सलीम, सय्यद मोहसीन, डॉ.शफीखुर्रहमान, शेख अब्दुल गफुर, पटेल वसीम, जम्मु ईरफान, डॉ.अतीक, सय्यद नजीब, मुंडकर महेताब आदींनी केले आहे. या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget