Halloween Costume ideas 2015

क्रांतीकारी इस्लामी विचारवंत मौ.डॉ. युसूफ अल-करज़ावी यांचं निधन


आधुनिक युगाची एकंदर परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन क़ुरआन व प्रेषित-वचन (हदिस) यांची सद्सद्विवेकबुद्धीने चिकित्सा करून त्याचा अन्वयार्थ जनसामान्यांसमोर सोप्या भाषेत मांडणारे जगप्रसिद्ध क्रांतीकारी इस्लामी विचारवंत मौलाना डॉ. युसुफ अल-करज़ावी (96) यांचं 26 सप्टेंबर रोजी निधन झालं. .

इजिप्त येथे जन्मलेले मौलाना डॉ. करज़ावी हे नंतर कतर येथे स्थायिक झाले होते. ’फिकह उल ज़कात’ व ’अल हलाल वल हराम फिल इस्लाम (इस्लाममध्ये वैध - अवैध) या जगप्रसिद्ध पुस्तकासहित त्यांनी जवळपास 120 पुस्तकं लिहिलेली आहेत. कतर येथून प्रसारित होणाऱ्या अल-जज़ीरा चैनलवर’ अल शरिया वल हयाह’ या जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमासाठीही ते ओळखले जातात. मूळचे महाराष्ट्राच्या औरंगाबादचे मराठी माणुस असलेले मौलाना मौदुदी यांचा त्यांच्यावर खुप प्रभाव होता. दैनंदिनी जीवनातील गोष्टींविषयी इस्लामची नेमकी भुमिका समजून घेण्यासाठी क़ुरआन व हदिसचे त्यांनी केलेल्या निरूपणाचा आधुनिक पीढीला खुप उपयोग होत होता. वयोवृद्ध असूनही त्यांनी इंटरनेट हाताळणे आणि चक्क टिव्ही चैनलचं एंकरींग करण्यासारख्या अत्याधुनिक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. सौदी सरकारतर्फे दिला जाणारा आणि मुस्लिम जगतात नोबेलपेक्षाही जास्त महत्त्व असलेल्या  ’शाह फैसल’ पुरस्कारा’ने त्यांना सम्मानीत केले गेले होते. इजिप्तच्या अल अज़हर विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतले. सन 1973 मध्ये त्यांनी पीएच.डी. केली होती. अल्लाह मौलानांना जन्नतमध्ये उच्च दर्जा प्रदान करो, आमीन ! 

- नौशाद उस्मान, औरंगाबाद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget