Halloween Costume ideas 2015

सूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(७६) तेव्हा यूसुफ (अ.) ने आपल्या भावाच्या अगोदर त्यांच्या थैल्यांची झडती घ्यावयास सुरूवात केली, मग आपल्या भावाच्या थैलीतून हरवलेली वस्तू बाहेर काढली - अशाप्रकारे आम्ही यूसुफ (अ.) चे समर्थन आमच्या युक्तीने केले.५९ त्याचे हे काम नव्हते की बादशाहच्या धर्मात (मिस्रच्या शाही कायद्यात) आपल्या भावाला पकडावे, याशिवाय की अल्लाहनेच अशी इच्छा करावी.६० आम्ही ज्याचे इच्छितो त्याचे दर्जे उंचावतो, आणि एक ज्ञानी असा आहे जो प्रत्येक ज्ञानीपेक्षा उच्चतर आहे.’’५९) येथे पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या सहाय्यतेला प्रत्यक्ष अल्लाहचा उपाय म्हटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पद्धतीविरुद्ध स्वत: संदिग्ध आरोपींना चोरीची शिक्षा काय आहे विचारले. त्यांनी इब्राहीमी शरियतची शिक्षा चोराला द्यावी असे सांगितले. नंतरची आयत स्पष्ट सांगत आहे की अल्लाहच्या उपायाने तात्पर्य हेच आहे.

६०) म्हणजे हे पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या पैगंबरत्वाला साजेशे नव्हते की त्यांनी आपल्या वैयक्तिक मामल्यामध्ये इजिप्त्च्या बादशाहच्या कायद्याप्रमाणे निर्णय घ्यावा. आपल्या भावाला रोखून ठेवण्यासाठी स्वत: त्यांनी जो उपाय केला होता त्यात ही एक कमतरता होती. ती म्हणजे इजिप्त्च्या बादशाहच्या दंडविधानाने काम करावे लागले असते. हे पैगंबराच्या प्रतिष्ठेविरुद्ध होते ज्याने शासनाधिकार आपल्या हातात घेतला होता. त्याने मुळात इस्लामेतर कायद्याऐवजी इस्लामी कायदे (शरियत)  त्या  जागी  लागू  करण्यासाठीच   शासनाधिकार   आपल्या   हातात   घेतला   होता.   अल्लाहने  इच्छिले  असते  तर  आपल्या पैगंबराच्या हातून ती चूक होऊ दिली असती. परंतु हा दाग पैगंबरावर लागावा, हे अल्लाहला मंजूर नव्हते, म्हणून अल्लाहने स्वत:चा उपाय योजून सरळमार्ग काढला. संयोगाने यूसुफ (अ.) यांच्या भावांना चोरीची शिक्षा काय असते हे विचारले गेले आणि त्यांनी त्यासाठी इब्राहीमी शरियतचा कायदा सांगितला. यालाच अल्लाहने नंतरच्या आयतीमध्ये आपला उपकार आणि ज्ञानपरक श्रेष्ठता दाखविली आहे. येथे आणखीन स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे, हे खालीलप्रमाणे आहे,

१) सामान्यत: या आयतचा अनुवाद असा केला जातो की यूसुफ बादशाहच्या कायद्यानुसार आपल्या भावांना पकडू शकत नव्हता. भाष्यकारांनी त्याचे हे काम नव्हते की पकडावे. याला `असमर्थ'च्या अर्थाने घेतला आहे. हे योग्य आणि उचित नाही'' अशा अर्थाने घेणे योग्य नाही. परंतु हा अनुवाद आणि भाष्य अरबी मुहावरे आणि कुरआनी प्रयोग या दोन्ही दृष्टीने योग्य नाही, कारण अरबीमध्ये सामान्यत: ``माका-नलहू'' चा अर्थ त्याला नकोय िंकवा त्याच्यासाठी योग्य नाही' या अर्थाने येतो. कुरआनमध्येसुद्धा याच अर्थाने आला आहे. दुसरे म्हणजे या अनुवादाने संवाद निरर्थक बनतो. बादशाहच्या कायद्यात चोराला न पकडण्याचे कारण काय असू शकते? काय जगात असा कोणता देश आहे ज्याचा कायदा चोराला पकडू नये असे सांगतो?

२) अल्लाहने `शाही कायदा'ऐवजी बादशाहचा कायदा असा शब्दप्रयोग करुन त्या अर्थाकडे संकेत केला आहे. म्हणजे `त्याचे हे काम नव्हते'पासून घेतले गेले पाहिजे. स्पष्ट आहे की अल्लाहचा पैगंबर पृथ्वीवर अल्लाहचा कायदा लागू करण्यासाठी पाठविला गेला होता, बादशाहचा कायदा लागू करण्यासाठी नव्हे. परिस्थितीमुळे त्याच्या राज्यात पूर्णत: अल्लाहचा कायदा बादशाहच्या कायद्याऐवजी लागू नव्हता तरीही पैगंबरांचे हे काम नव्हते की आपल्या वैयक्तिक मामल्यात बादशाहच्या कायद्यावर चालावे. म्हणून पैगंबर यूसुफ (अ.) यांना बादशाहच्या कायद्यानुसार आपल्या भावांना न पकडणे यामुळे नव्हते की बादशाहच्या कायद्याच्या कक्षेत येत नव्हते. परंतु त्याचे कारण केवळ हेच होते की पैगंबर म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनात अल्लाहच्या विधीविधानानुसार जीवनाचरण करावे, हे त्यांचे कर्तव्य होते. बादशाहचा कायदा लागू करणे त्यांच्यासाठी अनुचित होते.  ३) देशाच्या विधीविधानाला `दीन' (जीवनधर्म) संबोधून अल्लाहने `दीन' (जीवनधर्म) ची व्यापकता पूर्णपणे स्पष्ट केली आहे. त्या लोकांच्या `दीन'विषयीच्या धारणेची संकल्पना समूळ नष्ट होते. ज्यानुसार काही लोक पैगंबर आवाहनाला केवळ सामान्य धार्मिक अर्थाने तसेच अल्लाहची पूजाअर्चा करणे आणि काही धार्मिक कर्मकांड आणि विश्वासाचे पालन करण्यापुरते सीमित ठेवतात. मानव संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, न्यायालय इ. जीवनव्यवहारांचा संबंध `दीन' शी नाही; जरी असला तरी ऐच्छीक स्वरुपाचा आहे. आचरणात आले तरी ठीक अन्यथा मानवनिर्मित कायदेकानू अंमलात आणले गेले पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. परंतु येथे अल्लाह स्पष्ट सांगत आहे की ज्याप्रकारे नमाज, रोजा, हज हे सर्व `दीन' (धर्म) आहे त्याचप्रमाणे तो कायदासुद्धा `दीन' (धर्म) आहे ज्याच्यानुसार देश व प्रशासन व्यवस्था चालविली जाते.  ४) (हे सत्य आहे की) त्यावेळी इजिप्त्च्या प्रशासनात `बादशाहचा कायदा' लागू होता आणि पैगंबर  यूसुफ (अ.) स्वत: आपल्या हाताने त्यास लागू करीत होते. (परंतु याचा अर्थ असा होत नाही की यूसुफ (अ.) त्यास कायम ठेवू इच्छित होते) खरेतर पैगंबर  यूसुफ (अ.) अल्लाहचा कायदा कायम करण्यासाठीच नियुक्त  केले गेले होते. हेच ध्येय त्यांच्या शासनाचे होते आणि पैगंबर उद्देशसुद्धा हाच होता. परंतु एका देशाची व्यवस्था व्यावहारिक रुपाने एका दिवसात बदलली जाऊ शकत नाही. स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) यांनासुद्धा अरब जीवनव्यवस्थेत पूर्ण क्रांती आणण्यासाठी नऊ-दहा वर्ष लागले होते. या दरम्यान पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शासनकाळात काही वर्ष दारूबंदी नव्हती, तसेच व्याज दिले आणि घेतले जात होते, अज्ञानताकाळातील वारसाहक्क कायदा चालूच होता, विवाह व तलाकचे जुने कायदे चालू होते आणि फौजदारी आणि दिवानी कायदे प्रथम दिनापासून पूर्णपणे लागू झालेले नव्हते. पैगंबर  यूसुफ (अ.) शानसकाळात सुरुवातीचे आठ-नऊ वर्ष इजिप्त्च्या बादशाहचे कायदे अंमलात होते तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. जेव्हा देशात बादशाहचा कायदा लागू होता तेव्हा  यूसुफ (अ.)  यांना आपल्या खाजगी जीवनातसुद्धा त्याचप्रमाणे लागू करणे उचित का नव्हते? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) यांची पद्धत पाहून त्वरित सापडते. पैगंबर (स.) यांच्या शासनकाळातील सुरुवातीच्या काळात जेव्हा इस्लामी कायदे अंमलात येत होते तेव्हा लोक जुन्या पद्धतीप्रमाणे दारु सेवन करीत होते. परंतु काय पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तसे केले? लोक व्याज देत घेत होते, काय पैगंबर मुहम्मद (स.) यांनीसुद्धा तसे केले? यावरून ज्ञात होते की इस्लामी जीवनपद्धतीचे आवाहन करणारा व्यावहारिक विवशतेमुळे इस्लामी कायद्याला क्रमाने लागू करतो. चरणबद्ध पद्धतीने आचरण करताना जी सवलत प्राप्त् होते ती लोकांना प्राप्त् होते आवाहकाला मुळीच नव्हे. तो तर त्या अज्ञानतापूर्ण पद्धतींना नष्ट करण्यासाठी आला आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget