Halloween Costume ideas 2015

व्यापार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू कतादा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (व्यापाऱ्यांना सावधान करताना) सांगितले, ‘‘आपल्या मालाची विक्री करताना अधिक शपथा घेऊ नका, ही गोष्ट  व्यवसायात (तात्पुरती) वाढ करते, परंतु शेवटी समृद्धी नष्ट करते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
व्यापाऱ्याने गिऱ्हाईकाला किंमत वगैरेच्या बाबतीत शपथेद्वारे पटवून सांगणे की त्याची किंमत अमूक आहे आणि हा माल खूप चांगला आहे, तेव्हा तात्पुरते कस्रfचत काही गिऱ्हाईक  धोक्याने मान्यही करतील आणि तो माल खरेदी करतील, परंतु जेव्हा त्यांना सत्य लक्षात येईल तेव्हा ते पुन्हा कधी त्याच्या दुकानात येणार नाहीत आणि अशाप्रकारे या व्यापाऱ्याचा  व्यवसाय डबघाईला येईल.

माननीय अबू ज़र ग़फ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक असे आहेत की ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी  बोलणार नाही, त्यांच्याकडे पाहणार नाही आणि त्यांना पवित्र करून नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल न करता त्यांना शिक्षा देईल.’’
माननीय अबू ज्ज़र ग़फ्फारी (रजि.) यांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हे अपयशी आणि दुर्दैवी लोक कोण आहेत?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘एक घमेंड आणि अहंकारामुळे आपली  विजार (किंवा लुंगी) पायाच्या घोट्याच्या खाली लटकविणारा मनुष्य, दुसरा उपकाराची जाणीव करून देणारा मनुष्य आणि तिसरा खोटी शपथ घेऊन आपल्या व्यवसायात वृद्धी करणारा  मनुष्य.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
न बोलणे आणि न पाहण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह त्याच्यावर निराश (क्रोधित) होईल, त्याच्याशी प्रेम व दया करणार नाही. तुम्हीदेखील एखाद्यावर नाराज होता तेव्हा त्याच्याकडे पाहात नाही की त्याच्याशी बोलत नाही. विजार किंवा लुंगी पायाच्या घोट्याच्या खाली लटकविण्याची ही ताकीद त्या मनुष्यासाठी आहे जो घमेंड आणि अहंकारामुळे असे  करतो. पायाच्या घोट्याखाली विजार किंवा लुंगी परिधान करतो परंतु त्याला मोठेपणाचा गर्व नाही, अशा मनुष्याचे हे कामदेखील गुन्हा ठरतो कारण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  ईमानधारकांना (कमरेखालील वस्त्र) घोट्याच्या खाली परिधान करण्यास मनाई केली आहे. म्हणून तो मनुष्यदेखील गुन्हेगार ठरतो. खरे तर ईमानधारक कोणत्याही अपराधाला क्षुल्लक  समजत नाही. प्रामाणिक गुलामासाठी मालकाची क्षुल्लक नाराजीदेखील कयामतपेक्षा कमी नसते.

माननीय कैस (रजि.) अबू ग़रजा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात आम्हा व्यापाऱ्यांना ‘समासिरा’ म्हटले जात होते. पैगंबर जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा  त्यांनी त्या नावापेक्षा उत्तम नाव दिले. पैगंबर म्हणाले, ‘‘हे व्यापाऱ्यांच्या समूहा! माल विकताना वाईट गोष्ट बोलण्याचे आणि खोटी शपथ घेण्याचे अतिशय भय असते, तेव्हा तुम्ही  आपल्या व्यवसायात ‘सदका’चा समावेश करा.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की व्यवसायात अधिकांश असे घडत असते की मनुष्य नकळतदेखील चुकीचे काम करतो आणि खोटी शपथ घेतो; म्हणून  व्यापाऱ्यांनी विशेषत: अल्लाहच्या मार्गात दानधर्म (सदका) द्यावा जेणेकरून या सत्कर्मामुळे त्यांच्या चुका आणि त्रुटींचे प्रायश्चित्त होईल.

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोजमाप करणाऱ्या व्यापाऱ्यांना उद्देशून सांगितले, ‘‘तुम्हाला दोन अशा कामांबाबत जबाबदार धरले जाईल  ज्यांच्यामुळे तुमच्या पूर्वी होऊन गेलेले जनसमुदाय नष्ट व विनाश पावले.’’ (हदीस : तिर्मिजी)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget