Halloween Costume ideas 2015

इस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय?

पाश्‍चिमात्य देशांच्या लोकांमध्ये आज जे मोठमोठे गैरसमज पसरले आहेत, त्यापैकी एक गैरसमज असा की मुस्लिम देश म्हणजे अशी ठिकाणे, जिथे वैयक्तिक आणि शासकीय पातळीवर इस्लामी कायदाच लागू आहे. अशा मुस्लिम देशांमध्ये जे काही चालले आहे, लोक त्याची तुलना इस्लाम धर्माशी करू लागतात, ही अशी गोष्ट आहे जी अधिकांश बाबींमध्ये सत्यापासून दूर म्हटले जाऊ शकत नाही.
    मुस्लिम देशांना स्वातंत्र्य लाभताच संपूर्ण जगात इस्लामी आंदोलन आपापल्या देशांमध्ये इस्लामी राज्य स्थापित करण्यासाठी कार्यरत राहिलेत. इस्लामी राज्याशी अभिप्रेत एक असे शासन जिथे शरीअत किंवा इस्लामी कायदा लागू असेल आणि धार्मिक विद्वान किंवा राष्ट्रीय इस्लामी आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोक एकतर शासन सत्तेत काही प्रभाव राखत असतील किंवा राजकीय सत्ताधिकारावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल.
    गेल्या काही दिवसात, अनेक मुस्लिम देशांनी, स्वतःला इस्लामी राज्य म्हणून घोषित केले आणि वरकरणी शरीअतचा कायदाही लागू केला. ते मोजके असे काही पारंपरिक न्यायिक आदेश आहेत, ज्यांचा संबंध शिक्षा, स्त्रियांचा सन्मान आणि इस्लामी धर्मशास्त्राचे इतर विशेष पारंपरिक पैलू आहेत. अशा प्रकारे इस्लामी विधि-नियम किंवा कायदे आणि कोडे मारण्याची शिक्षा व हात कलम करण्याची शिक्षा वगैरे ना मोठ्या प्रमाणात प्रचारात आणले गेले. या खरे पाहता कायद्याच्या ’बाह्य सीमा’ आहेत ज्यांना केवळ अशा परिस्थितीमध्ये लागू केले गेले पाहिजे, जेव्हा सामाजिक न्याय, संपत्तीची विभागणी, नागरिकांसाठी राज्याची कर्तव्ये, दया व सहानुभूतीसारख्या मौलिक कर्तव्यांची पूर्तता केली गेली असेल. ही कर्तव्ये पूर्ण केल्याविना, जेव्हा इस्लामी कायदे अंमलात आणले जातात, तेव्हा आम्ही एका अशा कठोर राज्याची निर्मिती करतो, ते रूढिवादी आणि कट्टर स्वरूपाच्या कायद्यांच्या आधारावर काम करते आणि ज्याचे पूर्णतः कुरआनातील शिकवणी आणि इस्लामच्या भावनांविरूद्ध असते. यात इस्लामच्या नावाने दडपशाही व जुलूम जबरदस्तीला उपयुक्त घोषित केले जाते. अशा प्रकारे स्वयंघोषित इस्लामी राज्ये आणखी काही नाही, तर अशी वक्रभावी उपकरणे बनतात, जे विशिष्ट वर्ग, परिवार किवां सैन्याच्या सत्तेला न्यायपूर्ण असल्याचे दर्शवितात. अनेक लोक, या मुस्लिम देशांमध्ये जे काही होत आहे, त्याची तुलना इस्लामच्या आचार-विचारांशी करतात. वास्तविक, बहुतेक मामल्यांमध्ये त्यांची ही धारणा सत्यापासून बरीच दूर आहे. यामुळे अनेक पाश्‍चिमात्य देशांमध्ये नागरिकत्व प्राप्त करण्याची लालसा का बाळगतात, वस्तुतः त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये इस्लाम धर्म अस्तित्वात आहे? याचे उत्तर या तथ्यात लपले आहे की अधिकांश मुस्लिम आदेशांमध्ये मुसलमान केवळ लोकसंख्येनुसारच जास्त आहेत, तिथे इस्लाम, देशाचा मुलभूत कायदा नाही.
    खरे पाहता, अधिकांश मुस्लिम देशांवर अतिशय क्रूर जुलमी दडपशाही करणार्‍या निरंकुश राज्यकर्त्यांची राजवट आहे आणि बहुतेकबाबतीत यांचे सरकार, इराकच्या सद्दाम हुसैनच्या शासनापेक्षाही अधिक वाईट आहे. इजिप्त, अल्जेरिया, सीरिया, जॉर्डन आणि पाकिस्तान, यासारख्या देशांच्या पॉलिसी आणि वर्तनावर एक ओझरता दृष्टिक्षेप टाकल्यास हे माहित पडेल की या देशांमध्ये मानवाधिकारांना पायदळी तुडविले जात आहे आणि नागरिक स्वातंत्र्यावर निर्बंध घातले जात आहेत या देशांचे हुकूमशाहा सतत निवडणुकांमध्ये धांदली करवितात. त्यांच्या परिवारजनांना अटक करतात आणि कोणत्याही न्यायालयीन कारवाईविना खटला चालवून दीर्घकाळ त्यांना तुरूंगात डांबून ठेवतात. तुरूंगवास भोगणार्‍या कैद्यांना इतर गंभीर स्वरूपाचे अन्याय आणि मानवाधिकारांच्या उल्लंघना सोबतच मानसिक आणि शारीरिक यातनाही दिल्या जातात. परंतु, हा चुकीचा विचार मनात आणू नका की हे लोक ज्या परिस्थितीमध्ये आपला देश सोडण्यास विवश झाले, त्या परिस्थितीचा इस्लामशी काही संबंध आहे. इस्लामी कायद्याच्या मुलभूत आकलनाने माहीत पडेल की या देशांमध्ये जे काही होत आहे, इस्लाम त्याचा विरोधक आहे आणि यासाठी तुम्हाला त्या देशातले लोक, आपला मायदेश सोडून जाताना दिसणार नाहीत जिथे कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपल्या शासनांमध्ये इस्लाम धर्म अंमलात आणला जातो. 

- सय्यद हामीद मोहसीन
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget