माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणी ‘इमामत’ (नमाजचे नेतृत्व) करील तेव्हा (परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि नमाजींचा विचार करून) नमाज आटोपती घ्यावी कारण तुमच्या मागे दुर्बलही असतील, आजारी आणि वृद्ध लोकदेखील. परंतु जेव्हा तुमच्यापैकी एखादा एकट्याने आपली नमाज अदा करीतअसेल तर तो नमाजकरिता हवा तेवढा अवधी अधिक देऊ शकतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू मसऊद अन्सारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘अमुक इमाम फङ्काची नमाज दीर्घकाळ पढवितो त्यामुळे सकाळच्या सामुदायिक नमाजमध्ये मी उशिरा पोहचतो.’’ (अबू मसऊद म्हणतात,) मी यापूर्वी एखाद्या प्रवचनात अथवा भाषणात पैगंबर मुहम्मद (स.) यांना एवढा राग आलेला पाहिला नाही जेवढा त्या दिवशीच्या भाषणात पाहिला. पैगंबर म्हणाले, ‘‘हे लोकहो! तुमच्यापैकी काही नमाजचे नेतृत्व करणारे अल्लाहच्या भक्तांना अल्लाहची उपासना करण्यापासून भटकवितात. (खबरदार!) तुमच्यापैकी जो कोणी नमाजचे नेतृत्व करतील त्यांनी नमाज संक्षिप्त करावी, कारण त्यांच्या मागे वृद्धही असतील, मुलेही असतील आणि कामधंद्यासाठी निघणारे गरजवंतदेखील.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैह)
स्पष्टीकरण
‘नमाज संक्षिप्त करावी’ म्हणजे उलटसुलट, घाईघाईत नमाज अदा करणे अथवा पढविणे आणि चार रकअत नमाज दीड मिनिटांत पूर्ण करणे ही इस्लामची नमाज नाही. निश्चितच नमाजींचा आणि काळ व स्थितीचा अवश्य मर्यादित आदर केला गेला पाहिजे.
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मुआज बिन जबल (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर (‘मस्जिद-एनबवी’मध्ये ‘नफ्ल’ (अनिवार्य नसलेली– ऐच्छिक) नमाज अदा करीत आणि मग आपल्या समुदायाची इमामत करीत असत. त्यांनी एके रात्री इशाची नमाज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासह अदा केली आणि मग आपल्या समुदायाची इमामत केली आणि ‘सूरह बकरा’चे पठण सुरू केले तेव्हा एका मनुष्याने नमाज समाप्त केली आणि वेगळी आपली नमाज अदा करून घरी गेला. दुसऱ्या नमाजींनी (नमाज अदा केल्यानंतर) त्याला म्हटले, ‘‘तू विद्रोहाचे काम केले.’’ तो म्हणाला, ‘‘नाही. मी धर्मद्रोहाचे काम केलेले नाही. अल्लाहची शपथ! मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे जाईन. (आणि मुआज यांच्या दीर्घ नमाजची गोष्ट सांगेन.)’’ मग तो पैगंबरांकडे येऊन म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही उंटांद्वारे शेताला पाणी देण्याचे काम करतो (मजुरीवर लोकांच्या बागा आणि शेतीच्या सिंचनाचे काम करतो). दिवसभर आमच्या कामात व्यस्त असतो आणि मुआज यांची स्थिती अशी आहे की इशाची नमाज पैगंबरांसमवेत अदा करून गेले आणि सूरह बकराचे पठण सुरू केले (आम्ही दिवसभर कंटाळलेलो असल्याकारणाने इतका वेळ कसे उभे राहू शकतो)?’’ हे सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ऐकल्यानंतर मुआजकडे वळले आणि म्हणाले, ‘‘हे मुआज! तुम्ही लोकांमध्ये भांडणे लावू इच्छिता काय? ‘वश्शमसि व जुहाहा’चे पठण करा, ‘वल्ललि इ़जा य़गशा’चे पठण करा, ‘सब्बिहिस्मा रब्बिकल अअला’चे पठण करा.’’
हदीस : बुखारी व मुस्लिम

Post a Comment