Halloween Costume ideas 2015

फतवा

’फतवा’ म्हणजे इस्लामी शरीअतचा एक धर्मशास्त्रीय दृष्टीकोन. परंतु काहीजण याला धार्मिक न्यायालयाचा आदेश समजतात. याचे कारण हे आहे की काही हास्यास्पद फतव्यांचा प्रचार केला जातो. ज्यामुळे जनसामान्यात ही धारणा निर्माण झाली की अधिकांश मुसलमान अशा प्रकारचे फतवे मान्य करतात आणि त्यांचे पालनही करतात. वास्तविक सामान्य मुसलमानांपैकी खूप कमी असे आहेत जे मुफ्तीजवळ एखाद्या प्रकरणासंबंधी कायद्याचा सल्ला घेण्यासाठी जातात.
    एखादा फतवा विचित्र आणि न्यायमूल्यांशी विसंगत वाटला तरीसुद्धा. तथापि त्यात असा विवाद निर्माण व्हायला नको, ज्या प्रकारचा विवाद आज दिसून येत आहे. मीडिया (प्रसारमाध्यमे) विलक्षण आणि मुर्खतापूर्ण गोष्टींच्या शोधात असतो आणि याद्वारे तो इस्लामी धार्मिक संस्थांच्या प्रतिमेला गालबोट लावू इच्छितो, म्हणूनच तो अशा प्रकारच्या दस्तावेजांवर तुटून पडतो आणि त्यासंबंधी आरडा ओरड करतो. देशात सहस्त्रावधी मदरसे आहेत आणि या मदरशांमध्ये विवाद मिटविणार्‍या कमेट्यादेखील आहेत, तेव्हा त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खटल्या संदर्भात अनेक प्रकारचे धार्मिक दृष्टीकोन येऊ शकतात. विचित्र बाब ही की मीडिया काही फतव्यांनी उराशी कवटाळून त्याला निर्णायक रूप देतो आणि मग त्याला रूढिवादाचा नमूना म्हणून सादर करतो. याहून क्लेशदायक बाब ही की लोकांच्या मते अधिकांश मुसलमान अशा धार्मिक सल्ला-मसलतींशी अत्याधिक ओढ राखतात. ही गोष्ट योग्य पार्श्‍वभूमीत समजून घेण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की फतवा म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निकाल नव्हे. हा केवळ धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आहे. इंग्रजीचा एक विश्‍वकोष ’ए शॉर्टर इन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम’ फतव्याची व्याख्या अशा प्रकार करतो;(अनुवाद) ”हा मुफ्तीद्वारे दिलेला एक औपचारिक कायदेशीर दृष्टीकोन आहे, जो एखाद्या न्यायाधीशाने किंवा एखाद्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून आहे.”फतवे केवळ दृष्टीकोनाचे स्थान राखतात आणि हे कुणावर बंधनकारक नसतात. यांना मान्यही केले जाऊ शकते आणि अस्विकृतही केले जाऊ शकते. ज्या लोकांकडे या दृष्टिकोनाची विचारणा केली जाते. तेदेखील फतवा मानण्यावर किंवा त्याचे पालन करण्यावर आग्रह धरत नाही. ते स्वतः म्हणतात की तुम्ही वाटेल तसे याला मान्यही करू शकतात आणि अमान्यही करू शकतात. जे लोक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देतात, ते धार्मिक संस्थांकडून धर्मशास्त्रांसबंधीचे मार्गदर्शन घेतात आणि जेव्हा ते यांना स्वभावतः परस्पर विरोधी असल्याचे पाहतात तेव्हा त्यांना नवल वाटत नाही.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget