Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२३) तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता, कन्या,३५ बहिणी,३६ आत्या, मावश्या, पुतण्या, भाच्या३७ आणि तुमच्या त्या माता ज्यांनी तुम्हाला दूध पाजलेले आहे.  आणि तुमच्या दूध बहिणी३८ व तुमच्या पत्नीच्या माता, आणि तुमच्या पत्नींच्या मुली३९ ज्यांचे पालनपोषण तुमच्या पालकत्वाखाली झाले आहे.४० - ज्या पत्नींशी तुमचे शरीरसंबंध  झाले असेल त्यांच्या मुली, परंतु एरव्ही जर (केवळ विवाह झाला असेल आणि) त्या पत्नींशी समागम झाला नसेल तर (त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात)  तुमच्यावर कोणताही गुन्हा नाही. आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्नीदेखील (निषिद्ध आहेत) (जी मुले) तुमच्या वीर्यापासून जन्मली आहेत.४१ आणि हेदेखील तुमच्यासाठी निषिद्ध केले  गेले आहे की तुम्ही दोन बहिणींना विवाह बंधनात एकत्र आणावे,४२ परंतु पूर्वी जे काही घडले ते घडले, अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे.४३
(२४) आणि त्या स्त्रीयादेखील तुमच्याकरिता निषिद्ध आहेत ज्या इतर कोणाच्या विवाहबंधनांत असतील (मुहसनात) परंतु अशा स्त्रीयांशी (विवाह करण्यामध्ये) त्या स्त्रीया अपवाद आहेत  ज्या (युद्धामध्ये) तुमच्या हाती लागलेल्या असतील.४४ हा अल्लाहचा कायदा आहे ज्याचे पालन तुमच्यावर बंधनकारक आहे.३५) कन्येच्या आदेशात पोती आणि नवासी (नाती) यांचा समावेश आहे. परंतु अवैध संबंधातून जी मुलगी झाली ती हराम आहे की नाही याविषयी फिकाहशास्त्रींमध्ये मतभेद आहेत.
३६) सख्खी बहिण आणि आईकडून बहीण आणि वडिलाकडून बहीण तिन्ही या आदेशात समान आहेत.
३७) या सर्व नात्यांमध्ये सख्खे आणि सावत्र यात काहीच फरक नाही.
३८) याविषयी मुस्लिम समुदायाचे एकमत आहे की एका मुलाने अथवा मुलीने ज्या स्त्रीचे दूध प्याले असेल तर ती स्त्री त्यांची आई आणि त्या स्त्रीचा पती वडिलाच्या आदेशात आहे. ते  सर्व संबंधित नाते जे सख्खे आई व वडिलांच्या संदर्भात हराम होतात ते सर्व दूध पाजणारी आई व वडिलांच्या नात्यांनासुद्धा लागू होतात. या मुलांसाठी दूध पाजणारी आईचे केवळ तेच  मूल हराम नाही ज्याच्याबरोबर त्याने दूध प्याले असेल तर त्यांची सर्व मुलं त्याच्या सख्या भाऊ-बहिणीसमान आहेत आणि त्यांची मूलेसुद्धा सख्या भाच्या आणि पुतण्यासमान आहेत.  या आदेशाचा स्त्रोत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ``स्तनपानाने तो हराम होतो जो वंशाने हराम होतो'' या विषयी मात्र धर्मशास्त्रींमध्ये मतभेद आहेत की किती दूध प्याल्याने  हरामचा नियम लागू होतो.
३९) या विषयी मतभेद आहेत की ज्या स्त्रीशी फक्त लग्न लागले त्याची आई हराम आहे की नाही. इमाम अबू हनीफा, मालिक, अहमद आणि शाफई (रह.) यास हराम मानतात.  माननीय अली (रजि.) यांचे मत आहे की जोपर्यंत एखाद्या स्त्रीशी यौवन संबंध स्थापित होत नाही तिची आई हराम होत नाही.
४०) अशा मुलीचे हराम होण्यासाठी ही अट नाही की ती सावत्र बापाच्या घरात लहानची मोठी झाली. हे शब्द अल्लाहने केवळ त्या संबंधाची कोमलता स्पष्ट करण्यासाठी उपयोगात  आणले आहेत. मुस्लिम समुदायाचे फिकाहशास्त्री यावर बहुतांशीने एकमत आहेत की सावत्र मुलगी सावत्र बापावर हराम आहे. मग तिचे संगोपण सावत्र बापाच्या घरात झाले असेल  किंवा नाही.
४१) ही अट यासाठी वाढविण्यात आली आहे की ज्याला मनुष्याने मुलगा मानले त्याची विधवा अथवा तलाक दिलेली पत्नी त्या मनुष्यासाठी हराम नाही. हराम केवळ त्या मुलाची पत्नी  आहे जो मनुष्याच्या स्वत:च्या वीर्यापासून आहे; तसेच मुलाप्रमाणे नातू आणि पोता यांची पत्नीसुद्धा नाना, दादा यांच्यावर हराम आहे.
४२) पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ``मावशी, भाची, आत्या, पुतणी यांच्याशी विवाह करणे हराम आहे. याविषयी हे समजून घेतले पाहिजे की अशा दोन स्त्रीयांना त्यांच्याशी  लग्न करून जमा करणे हराम आहे ज्यांच्यापैकी एक पुरुष असती तर तिचे लग्न दुसरीशी हराम असते.
४३) म्हणजे अज्ञानताकाळात जो अत्याचार तुम्ही करत होता की दोन बहिणींशी एकाच वेळी तुम्ही लग्न करत होता. यावर पकड होणार नाही परंतु आता मात्र या कुप्रथेला बंद करा  (पाहा टीप ३२) याच आधारावर हा आदेश आहे की ज्या मनुष्याने अज्ञानताकाळात दोन बहिणींशी लग्न केले होते, त्याने इस्लाम स्वीकारल्यानंतर एकीला सोडून दिले पाहिजे.
४४) म्हणजे ज्या स्त्रीया युद्धकैदी झाल्या आणि त्यांचे काफीर पती दारूल हरब (तो देश ज्याच्याशी युद्ध होत आहे) मध्ये उपस्थित आहे, ते हराम नाहीत. कारण दारूल हर्ब (ज्या देशाशी  युद्ध सुरु आहे) पासून दारूल इस्लाम (इस्लामी देश) आल्यानंतर त्यांचे विवाह तुटतात. अशा स्त्रीयांशी निकाह केला जाऊ शकतो. आणि ज्यांच्या ताब्यात ते आहेत, ते त्यांच्याशी संबंध  ठेवू शकतात. फिकाहशास्त्रींमध्ये या बाबतीत मतभेद आहेत की पती-पत्नी दोन्ही एकाच वेळी युद्धकैदी बनले तर त्याविषयी काय आदेश आहे. इमाम अबू हनीफा (रह.) आणि त्यांचे  शिष्यगण म्हणतात की त्यांचा निकाह बाकी राहील. इमाम मलिक आणि इमाम शाफई (रह.) यांच्या मतानुसार त्यांचे विवाहसंबंध तुटले जातील. दासी (लौडींशी) संबंध ठेवण्याविषयी  अनेक भ्रम लोकांच्या मनात आहेत. म्हणून खालील बाबींना चांगले समजून घेणे आवश्यक आहे.
१)ज्या स्त्रीया युद्धात नजर बंद (कैद) झाल्या त्यांना पकडताक्षणी प्रत्येक सैनिक त्यांच्याशी संभोग करू शकत नाही. इस्लामी कायदा आहे की अशा स्त्रीया शासनाच्या स्वाधीन केल्या  जाव्यात. प्रशासनाला हा अधिकार आहे की वाटेल त्यांना स्वतंत्र करावे किंवा त्यांच्यापासून दंड वसूल करावा. किंवा त्या स्त्रीयांची अदला बदल त्या मुस्लिम कैद्यांशी करावी जे शत्रूच्या  ताब्यात आहेत किंवा या स्त्रीयांना सैनिकात वाटून टाकावेत. एक सैनिक फक्त त्याच स्त्रीशी संभोग करू शकतो जी प्रशासनाने विधीवत त्याला दिली असेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget