(२४) ...मग जेव्हा त्या विवाहबंधनात सुरक्षित होतील आणि त्या एखादे अश्लील कर्म करतील तर त्यांना त्या शिक्षेच्या तुलनेत अर्धी शिक्षा आहे जी मर्यादाशील स्त्रियांकरिता (मुहसनात) ठेवलेली आहे.४६ ही सवलत४७ तुम्हांपैकी त्या लोकांकरिता आहे ज्यांना विवाह न केल्यामुळे संयममर्यादा भंग पावण्याचे भय वाटत असेल, परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि अल्लाह क्षमा करणारा व परम कृपाळू आहे.
(२६) अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी त्याने त्या पद्धती स्पष्ट कराव्यात आणि त्याच पद्धतीवर तुम्हास चालवावे ज्यांचे अनुसरण तुमच्यापूर्वी होऊन गेलेले सदाचारी लोक करीत होते. तो आपल्या कृपेसह तुमच्याकडे लक्ष देऊ इच्छितो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमानदेखील आहे.४८
(२७) होय, अल्लाह तर तुमच्यावर कृपेसह लक्ष देऊ इच्छितो परंतु जे लोक स्वत: आपल्या मनोवासनांचे अनुसरण करीत आहेत ते इच्छितात की तुम्ही सरळमार्गापासून भरकटून दूर जावे.४९
(२६) अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी त्याने त्या पद्धती स्पष्ट कराव्यात आणि त्याच पद्धतीवर तुम्हास चालवावे ज्यांचे अनुसरण तुमच्यापूर्वी होऊन गेलेले सदाचारी लोक करीत होते. तो आपल्या कृपेसह तुमच्याकडे लक्ष देऊ इच्छितो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमानदेखील आहे.४८
(२७) होय, अल्लाह तर तुमच्यावर कृपेसह लक्ष देऊ इच्छितो परंतु जे लोक स्वत: आपल्या मनोवासनांचे अनुसरण करीत आहेत ते इच्छितात की तुम्ही सरळमार्गापासून भरकटून दूर जावे.४९
४६) वरकरणी येथे संदिग्धता निर्माण होते. यामुळे इतरांनी या स्थितीचा लाभ उठवला आहे जे रजम (दगडांनी ठेचून ठेचून मारणे) च्या विरोधी आहेत. ते म्हणतात, ``जर आजाद लग्न झालेली स्त्रिला शरीयतनुसार व्यभिचाराची शिक्षा `रजम' आहे तर लौंडीला (दासी) त्याची निम्मी शिक्षा काय होईल? म्हणून ही आयत याचे स्पष्ट प्रमाण आहे की इस्लाममध्ये `रजम' ची शिक्षाच नाही'' परंतु या लोकांनी कुरआनच्या शब्दरचनेवर विचारच केलेला नाही. या रूकूअमध्ये शब्द `मुहसनात' (सुरक्षित स्त्रिया) दोन अर्थाने आले आहे. एक `लग्न झालेल्या स्त्रिया' ज्यांना पतीची सुरक्षा प्राप्त् आहे. दुसरा अर्थ `खानदानी स्त्रिया' ज्यांना खानदानची सुरक्षा प्राप्त् आहे जरी त्या वैवाहिक नसल्या. या विचाराधीन आयतमध्ये `मुहसनात' हा शब्द दासी (लौंडी) विरोधी खानदानी स्त्रीसाठी दुसऱ्या अर्थाने आला आहे, पहिल्या अर्थाने नाही. हे आयतच्या विषयानुकूल अगदी स्पष्ट आहे. याविरुद्ध दासींसाठी `मुहासनात' हा शब्द पहिल्या अर्थाने प्रयोग झाला आहे आणि स्पष्टोक्ती केली आहे की जेव्हा त्याना वैवाहिक जीवनाची सुरक्षा प्राप्त् होते (फइजामुहसिनन) तेव्हा त्याना व्यभिचाराची (ज़िना) ती शिक्षा आहे जिचा उल्लेख वर झाला आहे. आता गंभीर विचार केला तर हे अगदी स्पष्ट होते की खानदानी स्त्रीला दोन प्रकारची सुरक्षा प्राप्त् होते. एक खानदानची सुरक्षा ज्यामुळे ती अवैवाहिक असूनसुद्धा सुरक्षित आहे आणि दुसरी पतीची सुरक्षा म्हणजे तिला दोन प्रकारच्या सुरक्षा प्राप्त् होतात. परंतु दासी जोपर्यंत दासी (लौंडी) आहे `मुहसना' सुरक्षित नाही कारण तिला कोणत्याच खानदानची सुरक्षा प्राप्त् नाही. परंतु लग्न झाल्यावर तिला केवळ पतिची सुरक्षा प्राप्त् होते आणि तीसुद्धा अपूर्ण, कारण पतीच्या सुरक्षेत आल्यानंतरसुद्धा ती आपल्या स्वामीच्या सेवेतून मुक्त होऊ शकत नाही. अशाप्रकारे तिला एका कुलीन स्त्रीचे पद कधीच प्राप्त् होत नाही. म्हणून तिची शिक्षा अविवाहित आजाद स्त्रीपेक्षा अर्धी असेल परंतु विवाहित खानदानी स्त्रीच्या शिक्षेपेक्षा अर्धी मुळीच नव्हे. कुरआन २४ : २ प्रमाणे व्यभिचाराची (ज़िना) ज्या शिक्षेचा उल्लेख आहे तो फक्त अविवाहित खानदानी स्त्रियांसाठी आहे ज्यांच्याविरोधात येथे विवाहित दासींची शिक्षा अर्धी सांगितली गेली आहे. आता विवाहित खानदानी स्त्रिया तर अविवाहित `मुहसनात' पेक्षा जास्त कडक शिक्षेस पात्र आहेत कारण त्या दुहेरी सुरक्षेचे कडे तोडून व्यभिचार करतात. जरी कुरआन यांच्यासाठी `रजम' च्या शिक्षेला स्पष्ट करीत नाही परंतु अति सुंदरतापूर्ण शैलीने त्याकडे संकेत करतो. मंद बुद्धीच्या लोकांकडून हे लपले जाऊ शकते परंतु हे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विवेकापासून लपले जाणे अशक्य होते.
४७) म्हणजेच खानदानी स्त्रीशी लग्न करण्याची क्षमता नसेल तर एखाद्या दाशींशी तिच्या मालकाची परवानगी घेऊन लग्न करण्याची सवलत.
४८) अध्यायाच्या सुरवातीपासून येथपर्यंत जे आदेश देण्यात आले आहेत तसेच हा सूरह अवतरित होण्यापूर्वी अल्बकरामध्ये संस्कृती आणि जीवनमानासंबंधीचे व्यवहार आणि समस्यां विषयी जे आदेश देण्यात आले होते; एकूण त्या सर्वांकडे संकेत केला आहे. तसेच सांगितले जात आहे की जीवनमान, नैतिकता, संस्कृती विषयीचे हे कायदे व नियम ज्यांच्याप्रमाणे प्राचीन काळापासून प्रत्येक पैगंबर आणि त्याचे सच्च्े अनुयायी चालत आले आहेत. ही तर अल्लाहचीच कृपा आणि दया आहे की तो तुम्हाला अज्ञानतेच्या स्थितीतून बाहेर काढून सदाचारींच्या जीवनपद्धतीकडे (इस्लामकडे) तुमचे मार्गदर्शन करीत आहे.
४९) हा कपटाचारी, दांभिक व रूढीवादी अज्ञानी लोकांकडे तसेच मदीना लगत वसलेल्या यहुदी लोकांकडे इशारा आहे. यांना हे जीवनसुधार अत्यंत असह्य होत होते. समाजात आणि संस्कृतीमध्ये शतकानुशतके घट्ट बसलेल्या कुप्रथा आणि रूढी परंपराविरुद्ध हा सुधार केला जात होता. वारसा हक्कात मुलींचा वाटा, विधवाचे सासरच्या बंधनातून मुक्त होणे व इद्दतनंतर तिने कोणत्याही व्यक्तीबरोबर लग्न करण्यास स्वतंत्र होणे, सावत्र आईशी लग्न करणे हराम ठरणे, दोन बहिणींना एकत्रित आपल्या लग्न बंधनात घेणे अवैध ठरविणे, दत्तकाला वारसाहक्क न मिळणे, दत्तकपुत्राच्या विधवा व तलाक पीडित पत्नीशी मानलेल्या वडिलांनी लग्न करणे योग्य ठरविणे अशाप्रकारच्या दुसऱ्या सुधारणांमुळे बुजुर्ग मंडळी, आई-वडील, अनुयायी यांनी मोठी आरडाओरड केली. बराच काळ या ईशआदेशांवर चर्चा (सार्वजनिक) होत होती. दुष्ट लोक या आदेशांना आणि पैगंबर मुहम्मद (स.) तसेच त्यांच्या समाजसुधारक संदेशच्या विरुद्ध लोकांना भडकवित होते. उदाहरणार्थ, जी व्यक्ती अशा निकाहने जन्माला आली होती ज्यास आता या शरीयतने अवैध ठरविले आहे, त्या लोकांना खूप भडकविले जात होते की पहा आजतर या नव्या आदेशाने तुमच्या आईवडिलांच्या संबंधांना हराम ठरविले गेले आहे. अशाप्रकारे हे अज्ञानी लोक या समाज सुधारकार्यात अडथळे निर्माण करीत होते. हे समाज सुधारकार्य तर अल्लाहच्या आदेशानेच कार्यरत होते. दुसरीकडे यहुदी लोक होते त्यांनी तर कीस काढण्याच्या आपल्या जुन्या वृत्तीमुळे अल्लाहच्या शरीयतवर भारी भक्कम पडदा टाकला होता. अगणित अटी आणि क्लेश होते ज्यांना यहुदी लोकांनी शरीयतमध्ये घुसडले होते. अधिकांश वैध (हलाल) वस्तूंना त्यांनी हराम (अवैध) ठरविले होते. अनेक अंधविश्वासांना त्यांनी ईशकानून मध्ये सामील करून घेतले होते. आता हे त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनोवृत्ती आणि स्वभावाच्या विरुद्ध होते की त्यानी या साध्या सोप्या शरीयतचे महत्त्व जाणावे ज्याला कुरआन नमूद करीत आहे. ते कुरआन आदेशांना ऐकून बेचैन होत असत. ते एका गोष्टीवर शंभरदा आक्षेप घेत असत. त्यांची ही मागणी होती की त्यांच्या अंधविश्वासांना, रुढी-परंपरांना आणि भ्रामक विश्वासांना कुरआनने अल्लाहची शरीयत म्हणून मान्य करावे, अन्यथा हा अल्लाहचा ग्रंथ आहे असे आम्ही मुळीच मानणार नाही. उदा. यहुदींची कुप्रथा होती की मासिकपाळी काळात स्त्रीला अस्पृश्य समजले जाई. तिच्या हाताचे खाणेपिणे वज्र्य असे. तिला त्या काळात `घृणित' समजले जाई. हीच प्रथा यहुदींच्या प्रभावामुळे मदीनेतील अन्सारमध्ये प्रचलित झाली होती. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आले तेव्हा याविषयी त्यांच्याशी प्रश्न विचारले गेले. उत्तरात सूरह २, आयत २२२ अवतरित झाली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतच्या प्रकाशात आदेश दिला की मासिकपाळीच्या काळात फक्त संभोग अयोग्य आहे. सर्व संबंध स्त्रीयांशी तसेच ठेवले जावे जसे दुसऱ्या दिवसात राहतात. यावर यहुदी लोकांत हंगामा सुरु झाला. ते म्हणू लागले की हा मनुष्य तर शपथ घेऊन बसला आहे की जे काही आमच्या येथे हराम आहे त्यांना हलाल (वैध) करून सोडेल आणि ज्यांना आम्ही अपवित्र समजतो त्यांना हा पवित्र ठरवित आहे.
Post a Comment