Halloween Costume ideas 2015

आचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय असन (रजि.) यांनी सांगितले, ‘‘ज्ञान दोन प्रकारचे असते. एक जे ज्ञान जिभेवाटे हृदयात जागा बनवितो. हेच ज्ञान अंतिम निवाड्याच्या दिवशी कामी येईल. दुसरे जे ज्ञान फक्त जिभेवरच राहते, हृदयापर्यंत पोहोचत नाही. हे ज्ञान महिमावान व सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या न्यायालयात पुरावा व प्रमाण बनेल.’’ (हदीस : दारमी)

स्पष्टीकरण :
अशा माणसाला अल्लाह असे म्हणून शिक्षा देईल की तुला तर सर्वकाही माहीत होते, तरीही तुझी कामी येणारे अंमलबजावणीचे गाठोडे स्वत:बरोबर का आणले नाही. ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्यावर अल्लाह कृपा करू इच्छितो त्याला आपल्या ‘दीन’चे ज्ञान व समज देतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
‘दीन’चे ज्ञान व समज अनेक कृपांचा दााोत आहे, हे उघड आहे. ज्याला ही गोष्ट लाभली त्याला ‘दीन’ व जगाचे भाग्य लाभले. तो त्याद्वारे आपले जीवन उत्तमप्रकारे  व्यतीत करील आणि अल्लाहच्या दुसऱ्या दासांच्या जीवनातदेखील सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न करील.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दीनचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवास करणाऱ्या मनुष्यासाठी अल्लाह स्वर्गाचा मार्ग प्रशस्त करील. जे लोक अल्लाहच्या घरांपैकी एखाद्या घरात (मस्जिदमध्ये) एकत्र जमा होऊन अल्लाहच्या ग्रंथाचे पठण करतात आणि त्यावर चर्चा करतात त्यांच्यावर अल्लाहकडून श्रद्धात्मक समाधान उतरते, कृपा त्यांना झाकून घेते, देवतूत त्यांना घेरतात आणि अल्लाह आपल्या देवदूतांच्या सभेत त्यांचा उल्लेख करतो. जो त्यापासून दुरावला गेला त्याचा वंश त्याला पुढे जाऊ देत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
या हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकीकडे ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करणाऱ्यांसाठी शुभवार्ता दिली आहे आणि दुसरीकडे त्यांना या धोक्यापासून सावध केले आहे की  ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करण्याचा उद्देश त्यावर अंमलबजावणी करणे आहे. जर कोणी अंमलबजावणी केली नाही तर आपला सर्व ज्ञानाचा खजिना असूनसुद्धा मागे राहील. हे ज्ञान त्याला पुढे  जाऊ देणार नाही की त्याच्या घराण्याचा प्रामाणिकपणाही कामी येणार नाही. प्रोत्साहन देणारी गोष्ट फक्त अंमलबजावणी आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन आस (रजि.) यांच्या कथनानुसार, एकेदिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या मस्जिद-ए-नबवीमध्ये आले. दोन समूह तेथे बसले होते. (एक समूह  अल्लाहचे नामस्मरणात व स्तुतिगान करण्यात मग्न होता आणि दुसऱ्या समूहाचे लोक ‘दीन’चे अध्ययन व अध्यापनात मग्न होते.) पैगंबर म्हणाले, ‘‘दोन्ही समूह सत्कर्मांत मग्न  आहेत. परंतु त्यांच्यापैकी एक समूह दुसऱ्या समूहापेक्षा वरचढ आहे. हे लोक अल्लाहचे नामस्मरण, प्रार्थना करणे व अल्लाहकडे क्षमायाचना करण्यात मग्न आहेत. अल्लाहने इच्छिले  तर त्यांना देईल अथवा देणार नाही. तसेच दुसऱ्या समूहाचे लोक ‘दीन’चे अध्ययन व अध्यापन करण्यात मग्न आहेत आणि मला ‘शिकविणारा’ बनवूनच पाठविण्यात आले आहे.’’ असे  म्हणून पैगंबर त्याच समूहात सामील झाले. (हदीस : मिश्कात)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget