माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) गुरूवारी लोकांना उपदेश करीत असत. त्यावेळी त्यांना एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अबू अब्दुर्रहमान! तुम्ही आम्हाला दररोज उपदेश व मार्गदर्शन करावे, अशी माझी इच्छा आहे.’’ ते म्हणाले, ‘‘दररोज भाषण देण्यापासून जी गोष्ट मला रोखते ती म्हणजे तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही कंटाळलेले मला आवडणार
नाही. मी सुट्टी देऊन उपदेश व मार्गदर्शन करीत असतो, जसे पैगंबर मुहम्मद (स.) आम्हाला सुट्टी देऊन उपदेश करीत होते जेणेकरून आम्हाला कंटाळा येऊ नये.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
नाही. मी सुट्टी देऊन उपदेश व मार्गदर्शन करीत असतो, जसे पैगंबर मुहम्मद (स.) आम्हाला सुट्टी देऊन उपदेश करीत होते जेणेकरून आम्हाला कंटाळा येऊ नये.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण :
पैगंबर मुहम्मद (स.) आणि अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या वर्तणुकीने ही गोष्ट सिद्ध होते की ‘दीन’चा प्रचार करणाऱ्यांनी कोणाच्या पाठी लागून उपदेश व मार्गदर्शन न करता परिस्थितीनुरून वर्तन केले पाहिजे, वेळ, प्रसंग पाहिला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यासारखे राहिले पाहिजे जो प्रत्येक क्षणी पावसाची वाट पाहतो आणि जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा लगेच जमिनीची मशागत करू लागतो. उठसूट कधीही धर्मप्रचार करणे चुकीचे आहे आणि मनुष्य संधीच्या शोधात गाफील राहावा, संधी येत राहावी आणि तो आपल्या मोठेपणाच्या मोजमापात त्या संधी नष्ट करीत राहावा, हेदेखील चुकीचे आहे.
अल्लाहने दारूचा धि:कार केला आहे
माननीय इब्ने उमर (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहने धिक्कार केला आहे दारूचा.’’
(१) तिच्या पिणाऱ्यावर, (२) पाजणाऱ्यावर, (३) विकणाऱ्यावर, (४) खरेदी करणाऱ्यावर, (५) तयार करणाऱ्यावर, (६) दारूला वाहून नेणाऱ्यावर, (७) तयार करून घेणाऱ्यावर, (८) त्या माणसावर ज्याच्यासाठी वाहून नेली जात आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हा नियमसुद्धा सांगितला– ‘‘ज्या गोष्टी अधिक मात्रेमुळे नशा निर्माण होते त्याची थोडी मात्रा सुद्धा हराम आहे.’’
जर एक ग्लासभर दारूमूळे नशा होत असेल तर, त्याला घुटभर पिणे सुद्धा हराम आहे. इस्लामी शरियतनुसार, इस्लामी शासनाची जबाबदारी आहे की दारूबंदी सक्तीने लागू करावी. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दारू सेवन करणाऱ्यांबरोबर जेवण घेण्यास मनाई केली आहे. ‘खम्र’ म्हणजे द्राक्षाची दारू. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट मत आहे की, ‘‘प्रत्येक नशा निर्माण करणारी वस्तू ‘खम्र’ आहे. आणि प्रत्येक वस्तू जी नशा निर्माण करते, हराम आहे.’’
‘खम्र’ म्हणजे प्रत्येक ती वस्तू जी बुद्धीला झाकून टाकते. प्रेषितांनी दारूला भेट म्हणून देण्यासही मनाई केली आहे. औषध म्हणून दारूच्या वापरास मनाई केली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘दारू औषध नव्हे तर आजार (रोग) आहे.’’
Post a Comment