Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२४) आणि त्या स्त्रियादेखील तुमच्याकरिता निषिद्ध आहेत ज्या इतर कोणाच्या विवाहबंधनांत असतील (मुहसनात) परंतु अशा स्त्रियांशी (विवाह करण्यामध्ये) त्या स्त्रिया अपवाद आहेत  ज्या (युद्धामध्ये) तुमच्या हाती लागलेल्या असतील.४४ हा अल्लाहचा कायदा आहे ज्याचे पालन तुमच्यावर बंधनकारक आहे. यांच्याखेरीज इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपल्या  संपत्तीद्वारे प्राप्त करणे तुमच्यासाठी वैध करण्यात आले आहे, परंतु अट अशी की त्यांना विवाहबंधनात सुरक्षित करा, असे नव्हे की तुम्ही स्वच्छंद कामतृप्ती करू लागाल. मग ज्या  दांपत्यजीवनाचा आनंद तुम्ही त्यांच्यापासून घ्याल त्याच्या मोबदल्यात त्यांचे महर (स्त्रीधन) कर्तव्य समजून अदा करा. परंतु महरचा ठराव केल्यानंतर परस्परांच्या राजी-खुषीने  तुमच्यामध्ये जर काही तडजोड निघाली तर त्याला काही हरकत नाही. अल्लाह सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.
(२५) आणि तुमच्यापैकी जर एखाद्याची इतकी ऐपत नसेल की त्यांचा सद्वर्तनी मुस्लिम स्त्रियांशी विवाह होईल तर त्याने तुमच्या त्या दासींपैकी एखादीशी विवाह करावा ज्या  युद्धामध्ये तुमच्या ताब्यात आल्या असतील व त्या ईमानधारक असतील. अल्लाह तुमच्या ईमानची स्थिती चांगल्याप्रकारे जाणतो. तुम्ही सर्व एकाच सहजातीचे लोक आहात,४५ म्हणून  त्यांच्या पालकांच्या अनुमतीने त्यांच्याशी विवाहबद्ध व्हा व परिचित पद्धतीनुसार त्यांचे महर (स्त्रीधन) अदा करा जेणेकरून त्या विवाहबंधनात सुरक्षित (मुहसनात) राहतील. त्यांनी स्वच्छंद कामतृप्ती करीत फिरू नये आणि त्यांनी गुप्तरीत्या अवैधसंबंधही ठेऊ नये. मग जेव्हा त्या विवाहबंधनात सुरक्षित होतील आणि त्या एखादे अश्लील कर्म करतील तर त्यांना  त्या शिक्षेच्या तुलनेत अर्धी शिक्षा आहे जी मर्यादाशील स्त्रियांकरिता (मुहसनात) ठेवलेली आहे.



४४) २) जी स्त्री अशाप्रकारे एखाद्याची मिळकत बनली तिच्याशीसुद्धा तोपर्यत संभोग केला जाऊ शकत नाही जोपर्यंत तिला महावारी येऊन गेली नसेल आणि विश्वास व्हावा की ती  गर्भवती नाही. या पूर्वी संभोग करणे हराम आहे. ती गर्भवती असल्यास मूल जन्मेपर्यंत संभोग करणे अयोग्य आहे.
३) युद्धात कैदी स्त्रियांशी संबंधाविषयी ही अट नाही की त्या ग्रंथधारकच असाव्यात. त्यांचा धर्म कोणताही असो जेव्हा त्या वाटल्या जातील तेव्हा ज्यांच्या वाट्यात त्या येतील ते त्यांच्याशी संभोग करू शकतात.
४) जी स्त्री ज्या पुरुषाच्या स्वाधीन केली गेली केवळ तोच तिच्याशी संभोग करू शकतो. दुसऱ्याला तिला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. या स्त्रीपासून जी संतान जन्माला येईल ती  त्याच पुरुषाची वैध संतान असेल ज्याच्या ताब्यात ती स्त्री आहे. त्या मुलांचे तेच कायदेशीर हक्क असतील जे शरीयतनुसार सख्या मुलांसाठी निश्चित केले आहेत. मूल बाळ  झाल्यानंतर ती स्त्री विकली जाणार नाही. परंतु मालक मेल्यानंतर मात्र ती स्वतंत्र होईल.
५) जी स्त्री अशाप्रकारे एखाद्याची मिळकत बनली आणि त्या मालकाने तिला दुसऱ्याशी लग्न करून द्यावे अशा स्थितीत मालक तिच्याशी यौवनसंबंध ठेवू शकत नाही मात्र इतर सेवा  घेऊ शकतो.
६) शरीयतने पत्नींची संख्या चार निश्चित केली आहे त्याप्रमाणे दासींची संख्या मात्र निश्चित केली नाही. परंतु याने शरीयतचा उद्देश हा मुळीच नव्हता की श्रीमतांनी अगणित दासीं  ठेवाव्यात आणि आपल्या घराला भोगविलासी घर बनवावे. खरे तर याविषयी अनिश्चतेचे कारण युद्धाच्या परिस्थितीचे अनिश्चित होणे आहे.
७) मिळकतीच्या इतर सर्व हक्कांप्रमाणे स्वामीत्वाचे हक्कसुद्धा स्थानांतरित केले जाऊ शकतात जे एखाद्या व्यक्तीला कायद्याने युद्धकैदीसाठी राज्याने दिले असतील.
८) प्रशासनाकडून मिळकतीच्या हक्कांना विधीवत बहाल करणे तसेच एक वैधानिक कर्म आहे जसे निकाह (लग्न) एक वैधानिक कर्म आहे. म्हणून काही यथोचित कारण नाही की जो  मनुष्य लग्नात कोणत्याच प्रकारची घृणा प्रतित करीत नाही तो दाशींशी संबंध ठेवण्यात घृणा का करेल.
९) युद्धकैद्यांपैकी एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाच्या स्वाधीन केल्यानंतर राज्य तिला परत घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तिच्या मालकाने त्या स्त्रीचा दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तिला  परत घेण्याचा अधिकार नसतो.
१०) जर एखादा फौजी कमांडर केवळ अस्थायी स्वरुपात कैदी स्त्रीयांशी संभोग करण्याची परवानगी आपल्या शिपायांना देतो आणि यासाठी त्या स्त्रियांना काही काळासाठी सैन्यात वाटून  दिले तर हे गैरइस्लामी कृत्य आहे. यात आणि व्यभिचारात काही फरक नाही आणि हे अपराध आहे. (तपशीलासाठी पाहा, तफहिमात भाग २ व रसाइल व मसाइल भाग १)
४५) म्हणजेच जीवनमानाच्या स्तरात लोकांत जे अंतर आहे ती फक्त औपचारिकता आहे अन्यथा सर्व मुस्लिम एकसमान आहेत. त्यांच्यात विभेदाचे काही कारण आहे तर ते ईमान  आहे जे फक्त प्रतिष्ठितांची मिरास नाही. शक्यता आहे एक दासी चरित्र आणि आचरणात एका कुलीन घराण्यातील स्त्रीपेक्षा श्रेष्ठतर असेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget