दै.इन्क्लाबच्या 2 जानेवारीच्या संपादकीय मध्ये उत्तर प्रदेशामधील कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधी भाष्य करीत राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. आदित्यनाथ यांना एवढ्या मोठ्या प्रदेशाचा मुख्यमंत्री करताना भाजपच्या नेतृत्वाच्या मनात कोणता विचार आला असेल याचा अंदाज तेव्हाच झाला होता. त्यांना वाटत होते योगींना मुख्यमंत्री केल्यामुळे प्रदेशामध्ये हिंदुत्वाचा विकास होईल, तो झाला की नाही हा जरी चर्चेचा विषय असला तरी या उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. दररोजच्या माध्यमांमधील येणार्या बातम्यांनी सर्वसामान्यांच्या लक्षात येतच आहे. बुलंद शहर आणि गाजीपुरा मध्ये झालेल्या हिंसक घटना रोखण्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे अशयस्वी झालेले आहे आणि हे सर्व योगी यांच्या, ’ ठोक दो’ या नितीचा परिणाम आहे. आजकाल उत्तर प्रदेश केवळ वाईट बातम्यांसाठी चर्चेत आहे. योगींना वेळीच पायबंद नाही घातला तर उत्तर प्रदेशाची स्थिती अजूनही बिघडेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
उर्दू न्यूज या मुंबईच्या वर्तमानपत्रात 8 जानेवारी रोजी शकील रशीद यांचा ”लोकसभा निवडणुका 2019” यावर एक अहवाल प्रकाशित झाला असून यात आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर भाष्य केले आहे. यात म्हटले की, मुस्लिम मतांची विभागणी कशी होईल, यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झालेेले आहेत. एका बृहत योजनेचे अनेक नेते प्यादे म्हणून काम करत आहेत. सोमवारी काही उर्दू वर्तमानपत्रातून एक बातमी आली की, काही मुस्लिमांनी काँग्रेसकडे हा आग्रह केला आहे की, मुंबईच्या कोणत्याही एका मतदान क्षेत्रातून लोकसभेसाठी एक मुस्लिम उमेदवार द्यावा. विशेषताः ही मागणी करण्यामध्ये हाफिज सईद अथरअली यांची प्रमुख भुमिका आहे. ते मुंबई समाजवादी पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. आश्चर्य म्हणजे समाजवादी पार्टीमध्ये असून सुद्धा आग्रहमात्र काँग्रेसकडे केलेला आहे. या अहवालात लोकसभेच्या निवडणुकांसंबंधी सुक्ष्म निरीक्षण करण्यात आले आहे.
12 जानेवारीच्या दै. इन्क्लाबमध्ये प्रिय दर्शन यांनी ’अचानक आपल्या देशात नमाज अदा करणे वाईट कृत्य कसे काय झाले आहे?’ या शिर्षकाखाली लेख लिहिला आहे. ते म्हणतात, आपण त्या देशात राहतो ज्या देशात अर्ध्यापेक्षा जास्त सन रस्त्यावर साजरे केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हा सिलसिला जारी आहे. असे असतांना आठवड्यातून फक्त एक दिवस ते ही काही मिनिटांसाठी जर मुस्लिम बांधव सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करत असतील तर त्याविरूद्ध आक्षेप घ्यावा तरी कसा? जे आक्षेप घेत आहेत ते स्वतः जातीवादी असल्याचा पुरावा देत आहेत. असे करणे अल्पसंख्यांकांच्या धर्म स्वातंत्र्याची गळचेपी केल्यासारखे होईल. धर्माच्या काही विशिष्ट ठेेकेदारांनी हे कृत्य करून सर्वांचीच अडचण करून ठेवली आहे. त्यांच्या लक्षातच येत नाही की जागतिक स्तरावर बहुसंख्यवादाने अंतिमतः त्या-त्या देशांचीच हानी केलेली आहे.

- फेरोजा तस्बीह
9764210789
9764210789
Post a Comment