Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२८) अल्लाह तुमच्यावरील बंधने शिथिल करू इच्छितो कारण मनुष्य दुबळा निर्माण केला गेला आहे.
(२९) हे श्रद्धावंतांनो! आपसात एकमेकांची संपत्ती खोट्या पद्धतीने खाऊ नका. देणे घेणे झाले पाहिजे परस्परांच्या राजीखुषीने५० आणि स्वत:चा आत्मघात करू नका.५१ खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर मेहरबान आहे.५२
(३०) जो कोणी जुलूम व अत्याचाराने असे करील त्याला नि:संशय आम्ही आगीत लोटू आणि हे अल्लाहकरिता काही अवघड कार्य नाही.
(३१) जर तुम्ही त्या मोठमोठाल्या पापापासून अलिप्त राहिला ज्यांची तुम्हाला मनाई करण्यात येत आहे, तर तुमच्या लहानसहान दुष्कृत्यांचे आम्ही पापक्षालन करू,५३ आणि तुम्हाला  सन्मानाच्या ठिकाणी दाखल करू.
(३२) आणि जे काही अल्लाहने तुमच्यापैकी एखाद्याला दुसऱ्याच्या तुलनेत अधिक दिले आहे त्याची अभिलाषा धरू नका, जे काही पुरुषांनी कमाविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे  आणि जे काही स्त्रियांनी कमाविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा होय, अल्लाहजवळ त्याच्या कृपेची प्रार्थना करीत राहा.५०) `खोट्या पद्धती' (खोटी पद्धत) म्हणजे त्या सर्व पद्धती जे सत्याच्या प्रतिकूल आहेत आणि शरीयत आणि नैतिकतेच्या दृष्टीने अवैध आहेत. `देणे घेणे' म्हणजे आपापसात हित  आणि लाभाचे देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. ज्याप्रकारे व्यापार आणि उद्योग धंद्यात चालते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो आणि तो  त्याला मेहनताना देतो. आपापसातील सामंजस्याने देणे घेणे व्हावे. अयोग्य दबावाखाली होऊ नये किंवा छलकटप करून होऊ नये. व्याज आणि लाचमध्ये प्रत्यक्ष सामंजस्य असते परंतु  ते सामंजस्य मजबुरीमुळे होते आणि दबावाचेच ते परिणाम असते. जुगारातसुद्धा सामंजस्य असते परंतु प्रत्येकजण जुगारी त्या खोट्या आशेवर सामंजस्य करतो की जीत त्याचीच  होईल. हारण्यासाठी कोणीच खेळत नाही. छलकपटाच्या व्यवहारातसुद्धा प्रत्यक्षरूपात सामंजस्य (रजामंदी) होते, परंतु या भ्रमामुळे की आत छलकपट नाही. जर दुसऱ्याला माहीत झाले  की तुम्ही त्याच्याशी छलकपट करीत आहात तर तो यासाठी कधीही तयार होणार नाही.
५१) हे वाक्य मागच्या वाक्याचे पूरक वाक्य किंवा स्वयं एक स्थायी वाक्य असू शकते. जर मागील वाक्याचा पूरक समजले जावे तर अर्थ होतो दुसऱ्यांची संपत्ती अवैध मार्गाने हडप  करणे म्हणजे स्वयं आपल्या स्वत:ला विनाशात टाकणे आहे. जगात याने संस्कृती व्यवस्था खराब होते आणि यांच्या दुष्परिणामांनी हरामखोर व्यक्ती स्वयं वाचू शकत नाही आणि  परलोकात कडक शिक्षेला सामोरे जातो. जर याला स्थायी रूपाने एक वाक्य समजले गेले तर त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे एक दुसऱ्यांची हत्या करू नका आणि दुसरा अर्थ  आत्महत्या करू नका. अल्लाहने अशा व्यापक शब्दाचा वापर केला आणि वर्णनक्रम असा ठेवण्यात आला आहे की त्याने हे तिन्ही अर्थ निघतात आणि हे तिन्ही अर्थ योग्य आहेत.
५२) म्हणजे अल्लाह तुमचा हितैषी आहे. तुमची भलाई इच्छितो आणि ही अल्लाहचीच मेहरबानी आहे की तो तुम्हाला अशा कामांपासून मनाई करत आहे ज्यात तुमचे स्वत:चे नुकसान आहे.
५३) म्हणजे आम्ही संकुचित वृत्तीचे नाही की लहान सहान गोष्टींमुळे (अपराध) दासांना शिक्षा ठोठवावी. तुमचे कर्मपत्र मोठ्या अपराधांपासून जर रिक्त असेल तर लहान अपराधांकडे  दुर्लक्ष केले जाईल आणि तुमच्यावर चार्जशीट लावले जाणार नाही. जर मोठमोठे अपराध करून आलात तर मात्र तुमच्याविरुद्ध जो दावा ठोकला जाईल त्यात लहानसहान अपराधांचासुद्धा  समावेश असेल. येथे हे समजून घेतले पाहिजे की मोठे अपराध आणि छोटे अपराधामध्ये काय फरक आहे. मला कुरआन आणि हदीस अध्ययनाने असे कळाले की (अल्लाह अधिक  जाणतो) तीन बाबीं आहेत ज्या एखाद्या कर्माला मोठे पाप बनविते.
१) कुणाचे हक मारणे मग अल्लाहचा हक्क, आईवडिलांचे हक्क किंवा दुसऱ्यांचे हक्क मारणे किंवा स्वत:विषयीचे हक्कांची हेळसांड करणे. ज्यांचा हक्क अधिक तितकेच त्या हक्कांना  पायदळी तुडविणे अधिक मोठा गुन्हा होतो. याच आधारावर अपराधाला अत्याचारसुद्धा म्हटले जाते. आणि याच आधारावर कुरआनने `शिर्क' ईश द्रोह (अनेकेश्वरत्व) ला मोठा अपराध आणि मोठा अत्याचार म्हटले आहे.
२) अल्लाहशी निडर होणे आणि त्याच्याशी अहंकार करणे, ज्यामुळे अल्लाहच्या करणे व न करण्याच्या आदेशांची मनुष्य पर्वा न बाळगता, अवज्ञेसाठी जाणूनबुजून ते काम करतो  ज्याला करण्यास अल्लाहने मनाई केली आहे आणि ज्याचा आदेश दिला आहे त्या कृत्यांना हेतुपुरस्सर न करणे. ही अवज्ञा जितकी जास्त धिटपणे आणि दुस्साहसपूर्ण, निर्भीकतापूर्ण  असेल तितके अपराध मोठे असेल. या अर्थाच्या अपराधासाठी अरबीमध्ये ``फिस्क'' आणि ``मासियत'' यांचा प्रयोग झाला आहे.
३) त्या बंधनांना तोडणे आणि त्या संबंधांना बिघडविणे ज्याचे जोडणे, मजबूत करणे आणि ठीक असण्यावर मानव जीवनाची शांती अवलंबून आहे. मग हे संबंध दास आणि  अल्लाहमधील असोत किंवा दास आणि दासांदरम्यानचे असोत. मग तो संबंध जितका अधिक महत्त्वाचा आणि ज्याच्यामुळे शांती भंग होते किंवा शांती स्थापनेची जितकी जास्त आशा  केली जाते तेव्हा शांती भंग करण्याचा गुन्हा तितकाच मोठा गुन्हा ठरतो. उदा. व्यभिचार आणि त्याच्या अनेक रूपांवर विचार करा. हे कुकर्म संस्कृती व्यवस्थेला स्वत:हून नष्ट करणारा  आहे. म्हणून एक मोठा गुन्हा आहे परंतु याचे वेगवेगळे रूप एक दुसऱ्यापासून गुन्ह्यामुळे अधिक उग्र आहेत. विवाहित मनुष्याचा व्यभिचार (जिना) अविवाहितापेक्षा जास्त मोठा गुन्हा  आहे. विवाहित स्त्रीशी व्यभिचार करणे अविवाहितेशी करण्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा आहे. शेजाऱ्या स्त्रीशी व्यभिचार करणे शेजारी नसलेल्याशी करण्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा आहे.  मरहम स्त्रीया उदा. बहिणी, मुलगी, आईशी व्यभिचार करणे गैर मरहम स्त्रीपेक्षा जास्त घृणित व मोठा गुन्हा आहे. मस्जिदमध्ये व्यभिचार करणे इतर ठिकाणी करण्यापेक्षा जास्त  संगीन अपराध आहे. एकाच अपराधाचे विविध रूप सांगितले गेले आहेत जिथे शांती स्थापनेची अधिक आशा आहे आणि जिथे मानवी संबंध जितके अधिक माननीय आहेत आणि जिथे  या संबंधांना तोडणे जेवढे अधिक सामाजिक बिघाडाचे कारण आहे, तिथे व्यभिचार करणे तेवढाच मोठा गुन्हा आहे. याच अर्थाने गुन्ह्या (अपराध) साठी `फुजूर' शब्द वापरला गेला आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget