Halloween Costume ideas 2015

जब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार!

व्यसन हा शब्द डोळ्यासमोर आला, की कोणती ना कोणती वाईट सवय नजरेसमोर येते. बिडी, सिगारेट, तंबाखू, तपकीर, मिश्री, दारू, ताडी, माडी, गांजा, चरस, अफू, भांग, गर्द,  झोपेच्या गोळ्या, इंजेक्शन्स अशा कितीतरी नशा आणणाऱ्या गोष्टींची यादी या वाईट सवयींमध्ये मोडते. मादक पदार्थांमध्ये पेट्रोलियम पदार्थ, खोकल्याची कोडीनमिश्रित औषधे, अंग  दुखीच्या मलमांची सॅण्डविचेस, इंक रिमूव्हर किंवा व्हाईटनर, टाईपराईटिंग मशिनमध्ये वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची शाई यांचा वापर मुले करायला लागली आहेत. दारूमुळे होणारे  यकृताचे आजार, नशील्या पदार्थांनी होणारे मानसिक आजार आणि नशा करून होणारे हिंसाचार, अत्याचार, अवैध कृत्ये, वाहनांचे अपघात यांच्यातला किशोरवयीन मुला मुलींचा टक्का  वर्षानुवर्षे वधारत चालला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २००५ मध्ये ई-सिगारेटचे उत्पादन करणारी केवळ एकच कंपनी चीनमध्ये होती. आता मात्र ई-सिगारेट आपल्याला ५०० ब्रँडमध्ये आणि ८ हजार स्वादात  उपलब्ध आहे. हा व्यवसाय आता तीन अब्ज डॉलरचा बनला आहे. यावरून ई-सिगारेटचा वाढलेला विळखा आपल्या ध्यानात येईल. मादक पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई ही  आजच्या काळातील चिंताजनक बाब बनली आहे.
शहरातील मुलांचे व्यसनाधीनतेचे प्रमाण ६५ ते ७२ टक्क्यांवर गेलेले दिसते. दारू पिण्याशी संबंधित तीन-चार कॉम्प्यूटर गेम्ससुद्धा उपलब्ध आहेत. उदा. ब्रिंज ड्रिंकिंग किंवा बॉटमस  अप  यासारख्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी वेळात जास्तीत जास्त अल्कोहोल घेण्याला पॉइंटस आहेत. शिवाय सोड्याच्या नावावर केलेल्या दारूच्या ज्या जाहिराती (त्याला सरोगेट जाहिराती  म्हणतात!) प्रसारमाध्यमांतून व सिनेमांतून केल्या जातात, त्यातही बॅगपायपर आणि मित्र परिवार साथीला असेल तर जगात कोणतीही मर्दुमकी गाजवता येते. परिणामी सगळ्यातून  वेगवेगळ्या प्रकारे त्याविषयीची आवड वाढीला लागते. महाराष्ट्र राज्यात मादक पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या आत्महत्या देशात सर्वाधिक आहेत. समाजकंटक आणि सरकारला व्यसनांपासून
आर्थिक उत्पन्न मिळते पण अगणित कुटुंबांची दैना होते. कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. जगातल्या दहशतवादी चळवळीही यावरच पोसतात.  व्यसनांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणी यंत्रणा मधल्यामध्ये गबर होऊन जाते असा अनेक देशांमधला अनुभव आहे. देशच्या देश या समस्येने त्रस्त आहेत. व्यसनाधीनता हे  मानसिक आजारांचेच अंग आहे. सामाजिक संस्कारांनी यावर मात करता येते. तंबाखूला जर आळा घालता आला तर वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. तंबाखू - धूम्रपानावर बंदी घालणे अवघड आहे. तंबाखूचे आर्थिक साम्राज्य फार मोठे आहे. धूम्रपान करणाऱ्याबरोबर जवळच्या माणसालाही धूम्रपानाचा फुकट तडाखा बसतो, कारण हवेत धूर  पसरलेला असतो. प्रत्यक्ष धूम्रपानाप्रमाणे या फुकट धूम्रपानानेही आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यावाचून राहात नाहीत. धूम्रपानात इतर मादक पदार्थ मिसळून घेण्याचे प्रमाणही वाढत आहे.  मादक पदार्थ अधिनियम १९८५च्या कलम ७१ नुसार नशाखोरीला बळी पडलेल्यांचा उपचार करणे सरकार कटिबद्ध आहे. याशिवाय भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या एका अभ्यासानुसार भारतात कर्वâरोगाची ३० टक्क्यांहून अधिक प्रकरणे हे तंबाखूशी निगडीत आहेत आणि कर्वâरोगग्रस्त पुरुषांच्या मृत्युमागे ४२ टक्के कारण हे तंबाखू अणि सिगारेट आहे,  असे सांगितले गेले. इ-सिगारेट, ई-हुक्का आदींच्या वापरावर आणि विक्रीवर प्रभावीपणे निर्बंध घालण्याबरोबरच तंबाखू सेवनाच्या गंभीर दुष्पपरिणामाची माहिती जनमानसात  रुजवण्यासाठीही आणखी प्रयत्न हवेत. दारू, सिगारेट आणि अंमलीपदार्थ सेवनाविषयीची माहिती व दुष्परिणामांची ओळख शाळेपासूनच मुलांना द्यायला हवी. नशेच्या अंमलाखाली  उमलत्या वयातील सर्जनशीलता, नवनिर्माणक्षमता नष्ट होण्याचा आहे. मादक पदार्थाच्या सेवनावर आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध कायदे अस्तित्वात आहेत.
मादक पदार्थाची तस्करी हा एक मानवतेविरुध्द गंभीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतामध्ये तसेच महाराष्ट्रातही अनेक कडक कायदे आहेत व त्यात शिक्षेची तरतूद करण्यात  आलेली आहे. परंतु, विविध कायदे असूनसुध्दा अनेक तरुण व्यसनाला बळी पडतात. अशा तरुणांचा उपचार करण्यासाठी विविध प्रकारची औषधे व व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. देशातील  तरुणाईच्या जोशपूर्ण सहभागाच्या अभावी, उन्मुक्त ऊर्जेच्या अभावामुळे राष्ट्र नवनिर्माणाच्या कामात जो निरुत्साह, जे जडत्व, जी उदासीनता येत जाणार आहे, तो आपल्या सर्वांचाच मोठा तोटा आहे. कदाचित आपल्या प्रगतीच्या मार्गातला तो मोठा धोंडा असणार आहे. मादक पदार्थाचा विळखा फक्त कायदे बनवून सुटणारा नाही, तर जमाअत- ए-इस्लामी हिंद ही  सामाजिक संघटना २ ते ८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर ‘नशेचा नाश देशाचा विकास’ ही नशामुक्ती मोहीम राबवित आहे. यामध्ये समाज, कुटुंब पूर्ण ताकदीनिशी या  लढाईत उतरायला हवे आणि मला विश्वास आहे आपण पुन्हा एकदा तरुणांना नवचैतन्य व आत्मविश्वास देऊ शकतो. त्यांच्याशी मैत्री आणि प्रेमाने संवाद साधून आंतरिक शक्ती
वाढवण्याचा प्रयत्न केल्यास देशाचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget