जीवन रहस्यमयी आहे़ आम्ही जन्मापासून सद्यस्थितीच्या वयापर्यंत जेवढे जगलो आणि जे पाहिले त्यावर प्रकाश टाकला तर आशा, अपेक्षांचा ताळमेळ लागत नाही़ जसं आपल्या शरिरात जे बदल होतात ते आपल्याला दिसत नाहीत परंतु जाणवतात. आपण असेच पुढे वाढत असतो़ या दरम्यान, एखादा त्रास सुरू झाला की आपण डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा तो सांगतो की तुम्हाला हा आजार जडला आहे़ तुम्हाला या गोळ्या घ्याव्या लागतील, एवढ्या दिवस आराम करावा लागेल आणि तुम्ही जर असं नाही केलं तर तुमचा आजार बरा होणार नाही. तो वाढतच जाईल जो तुमच्यासाठी अत्यंत घातक आहे. येथपावेतो की तुमची दिनचर्या जर अशीच ठेवाल अन् वेळेत याचे प्रिस्क्रीप्शन घेतले नाही तर ते तुमच्या जीवावर बेतेल़ या भितीने आम्ही डॉक्टराचं म्हणणं ऐकत असतो आणि गोळ्या औषध घेत असतो़ आणि काही दिवसात आमचा आजार बरा होतो़ म्हणजेच आम्ही दुसर्याच्या सांगण्यावरून स्वत:त बदल केलेला असतो़ परंतु ज्यावेळी आमचं शरीर आजाराकडे वळत असतं त्यावेळी आमचं मन, शरीर आम्हाला संकेत आणि लक्षणे दाखवत असतं की तुला हे होत आहे, तू असं रहा, तू असं खा, हे घेतलं पाहिजे, हे नको घे, तरी परंतु आम्ही या दुखण्याकडे, या संकेताकडे जाणते अजानतेपणात दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागते़ परंतु, वेळेतच जेव्हा पहिली वेदना झाली, पहिल्यांदा संकेत मिळालं तेव्हाच आम्ही स्वत:त बदल केले, मनाप्रमाणे चालले तर निश्चितच आम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही़ पैसाही अन् वेळेही वाचतो़ यातून बोध एवढाच घ्यावा लागतो की, आम्हाला अंतरमनाचं ऐकावं लागतं त्याचं जर ऐकलं नाही तर आम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागतं़ आम्ही दुसर्याला मार्गदर्शन करतो की, असं राहिलं पाहिले, असं जगलं पाहिजे, परंतु, ज्यावेळी स्वत:वर वेळ येते त्यावेळेस आम्ही तसं वागत नाही़ आम्ही स्वत:त ते बदल करत नाही़ ज्यामुळे आम्हाला अतोनात नुकसान होऊन जातं़
तसेच आमच्या रोजच्या दिनचर्येत आम्ही आपल्या होत असलेल्या चुकांना पांघरून घालतो. आपण ज्यावेळी कुठली चूक करत असतो त्यावेळी मनात हे चुकीचं आहे असं वाटलं की आपण त्या ठिकाणी सुधार करायला हवं मात्र तसंच आपण पुढं चलतो. नंतर मनात वारंवार त्या गोष्टी घोळत असतात. जर का आपण अशी चूक होताना तिथेच मनाला थांबविले व बरोबर गोष्टीचा आग्रह केला तर आमच्यात बदलाला वाव मिळतो. तसेच आपण प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टीने पहायला हवी. विवेक जागृत ठेवायला हवा. जेणेकरून आपण कुठलीही गोष्ट डोळे झाकून करणार नाही. मनाला वारंवार सकारात्मक गोष्टीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा. मनात वाईट गोष्ट येत असेल तर तिथेच विचार करायचे थांबावे अन् नैतिक गोष्ट मनात आणून त्यावर चालावे. आम्ही जशा दुसर्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो त्याच पद्धतीने आपल्यात तसे बदल घडणे आवश्यक आहे. शेवटी आमच्या बेचैन अंतरमनावर जालीम उपाय कुरआननं सांगितला आहे. कुरआनमध्ये अल्लाहने म्हंटले आहे की, ” लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे, ही ती गोष्ट आहे जी अंतःकरणात जो विकार आहे त्यावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरिता मार्गदर्शन आणि कृपा आहे. (कुरआन ः 10ः57)
त्यामुळे आपण एकदा संपूर्ण कुरआन समजून वाचावेे. त्यामुळे निश्चितच आपलं अंतरमन त्यामुळे प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. ते आपलं सुख याच मार्गदर्शनावर निहित असल्याचं ठामपणे तुम्हाला सांगेल. त्यामुळे स्वतःत बदल करायचा असेल तर अंतरमनाला काय वाटते? त्याच खाद्य काय आहे? हे आम्हाला शोधणे गरजेचे आहे. निश्चितच ते कुरआनमध्ये आहे.

- बशीर शेख
Post a Comment