Halloween Costume ideas 2015

समजाचे सत्य परजूया

स्वतःचा आवाज हरवून, गुलामीची गोडी वाढलेल्या या समकालात जगण्याची उमेद बारगळत चालली आहे. दररोज बदलणारे इंधनाचे चढे दर, सणासुदीच्या मार्केटींग मधून पळवापळवीच्या हरामबाता, समर्थन संमोहनातून छोट्या मुलांपर्यंत पाजलेली कट्टरतेची लस यांचा अतिरेक झाला आहे.
    प्रश्नांचा ढीग समोर घेऊन, उत्तरांच्या शोधात भटकणारे बुद्धिजीवी फोल ठरताहेत. बोलघेवड्या, उतावीळ पोपटपंची प्रतिक्रियांनी वेळ मारून नेली जातेय. म्हातारी मरतच आहे, काळ सोकावतोच आहे. दुःख मांडण्याची आणि सुखासाठी  भांडण्याची इच्छाशक्ती लुळीपांगळी करत व्यवस्था सुखरूप सर्वताबा घेत आहे.
    अशा व्यवस्थेत हस्तक्षेप न करता ’चांदण्यात रमणार्या’ कलेची निर्मिती होणं म्हणजे या फॅसिस्ट व्यवस्थेला पुरक असणं ही साधी गोष्ट आज एकूण साहित्य- संस्कृतिकतेला कळत नाही. याचाच अफसोस वाटतोय. मूळ मानवी मुल्यांना डावलून वेगळ्या चुली मांडून, वादांची नावे भांडून, केवळ आत्मसमाधानात रमणार्या या पुरक व्यवस्थांची किमान सकारात्मक चिकित्सा व्हायलाच हवी. माध्यमं आणि मेंदूला आलेली सूज यामुळे टेस्ट ट्युब बेबी किंवा प्रिमॅच्युअर डिलीव्हरी वा सरोगसीसारख्या टॅग्समधून प्रसवणारी कोणतीही कला ही पिढी  बर्बाद -(उर्वरित लेख पान 7 वर)
करणारी ठरत आहे. कथा, कविता, साहित्य, नाट्य, संगीत नृत्य चित्र शिल्प या माध्यमांनी किमान पक्षी ’डिग्नीटी ऑफ ह्युमॅनिटी’ चे संगोपन करावं की केवळ कट्टरतावादी धर्मांध उजव्या-डाव्या मुल्यांच पोषण करावं? सकाळी उठल्यापासून उशिरा निजेपर्यंत साथीचा मोबाईल पसरवत राहतो अफवांचा कचरा, पुराव्यापुरातन सनातन धार्मिक अंधश्रद्धांनी वाटोळं करत राहतात. चॅनल्समधून पुस्तकांच्या पानापानांतून विषारी शब्दांचा विखार ढासळवत जातोय. विवेकाची घरं... हंगामी संवेदना मांडून मिळवल्या जाताहेत टाळ्या आणि मृत्यूशोकावर रचलं जातयं नृत्य-संगीत आणि मुल्यमानाची ऐसीतैशी करून मिळवला जातोय बांडगळी मोठेपणा. जिथे-तिथे सर्वत्र मुल्यात्मक कलानिर्मिती हा मानवी बुद्धीचा आविष्कार पण मुल्यांचं अवमुल्यन केवळ जाणीवपूर्वक करण्याच्या वीडा बहुतेक सर्वत्र सर्वांनी उचललेला दिसतो. साहित्य, कला तत्वज्ञान, विज्ञान यातून मानवतेचं उन्नयन व्हावंच, पण यातला गोतावळा व्यवस्था समर्थक ठरला की सामान्य मानवी समुहाचे दारिद्रय, गुलामी, दुःख वेदना तशाच प्रभावी राहतील यात शंका नाही. कुठलीही कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, अभ्यूदयाची आशा प्रसवात असते. पाब्लो पिकासो आपल्या कृतीबद्दल सहज बोलून जातो. माझे कुठलेही चित्र केवळ सजावट, शोभेसाठी नाहीच तर ते साधन आहे, अविवेकाच्या विरोधातील शस्त्र आहे. अलिकडच्या काळात विशेषतः संमोहीसनातन संघी व्यवस्थेच्या काळात या कलांचे शस्त्र बोथट झाले आहे. ज्यांनी कुणी कलेचा वापर करून समाजाबद्दलाचा किंवा व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचं थोडं धाडसं केल त्यांना पुसून टाकलं गेलं. आम्ही निषेध मोर्चा अनागोंदी यातच गुरफटून रहिलो. येणार्या पिढींची भाषा आणि वेदनेला नव्या लिपीत व्यक्त करण्यासाठी सुसज्ज होण्याची हीच वेळ आहे.
    टाळ्या मैफीली, धनाचे पुरस्कार, पेपरातील कात्रणी बातमी यापेक्षा येणार्या पिढीने कलावंत-कलाकाराला मुल्यस्थापना करणारा म्हणून ओळखावं, यासाठी हमी दिली  पाहिजे. सभासंमेलने मेळावे कार्यक्रम सारखे इव्हेंट केवळ इव्हेंट्स न राहता मूल्यकेंद्रीत मुव्हमेंट कसे होतील याचा विचार करावयास हवा. प्रतिगामी, क्रुरतेचा काळ स्वतःहून ओढवून घेतला की बुद्धीचा गंज ’मी’ पणाने गडद होतो. मुठभर चांगलं काम करणार्यांच्या ’मी’चा ’आम्ही’ होणे आज गरजेचे आहे. आम्हीचा हा प्रवास बळकट करण्यासाठी मूलभूत दुव्यांची पायवाट तयार होतेय आता यावरचे प्रवासी वाढले पाहिजेत.
    ’येरे माझ्या मागल्या’ चे माथी मारलेले पुराणगीत बाजूला सारून नवविवेकी मुल्यांची, मानवी प्रेमस्नेहाचे दृढीकरण करण्यासाठी... बहरून येण्यासाठी स्वतःप्रत गाडून घेणे, समर्पित होण्याची ताकद येत राहो...
    ”मैं अकेला चला था” वगैरा ऐवजी आम्ही सारे निघालो सामूहिक बळाची नित्तांत गरज आहे.’
    कला ही क्रांतीच्या टप्प्यावर अर्थपूर्णता आणत असते. मर्यादेत हे सार मांडत असताना दाखल उदाहरणांची साखळी मी जोडणार नाही, पण अत्याचार, दारिद्रयाच्या भयानवास्तवाला करकचून बांधण्यासाठी निःसत्व होणार्या समुहासाठी ’मानव अस्मितेचा’ मुद्दा सहजसुंदर संपन्न होईल. यास्तव शब्दांची किमान मजबूत सांगड मांडत राहीन.
    ”आम्ही घरीधन शब्दांचीच शस्त्रे’ म्हणत आता समजेच्या सत्याला परजत राहूया. एखादा पाब्लो, एखादे तुकोबा आणि डॉ. अल्लामाला अशावेळी किमान आठवूया.
    ”फतवा है शेख का ये ़जमाना कलम का है
    दुनिया में अब रही नहीं तलवार कारगर”


- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) - 8668691105

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget