Halloween Costume ideas 2015

आपण जितके मानवतावादी तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ - डॉ. श्रीपाल सपनीस

कोल्हापूर- आपल्या देशात धर्माच्या नावाखाली सुरु असलेले प्रकार गंभीर आहेत, पण  त्यासाठी धर्म संस्काराच्या मूळ पायाला दोष न देता धर्माचे मानदंड आणि त्यातील सत्यनिष्ठा या गोष्टी विवेकाच्या पातळीवर तपासून घेण्याची वेळ आली आहे. आपण जितके मानवतावादी, विश्वात्मक होऊ तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ  होईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. तसेच पुरोगामी चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्व क्षेत्रातील विचारवंतांनी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
     कोल्हापूर येथील शिवाजी पेठेत शिवाजी मंदिरात८व्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन गोवा विद्यापीठातील माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी साप्ताहिक करवीर काशी चे संपादक सुनीलकुमार सरनाईक, डॉ. जे. बी.शिंदे, मिरासाहेब मगदूम, हसन देसाई, प्राचार्य दिनकर खाबडे,प्राचार्य जी. पी. माळी, पी. बी. पोवार, प्रा.टी.एस.पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ. सबनीस म्हणाले, हिंदू धर्मात क्रौर्य व हिंसाचाराला स्थान नाही, तर हिंदु धर्म सर्व धर्म समभाव व सहिष्णुता मानतो, पण मनुवादी इतर धर्माचा द्वेष करायला शिकवतात, सानेगुरुजी जगावर प्रेम करायला सांगतात,येशू खिस्त यांनी शत्रूवरही प्रेम करा म्हणून सांगितले, आपल्या संतांनी जातीभेदाचा निषेध केला, पण संताना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. महापुरुषांनाही जात चिकटवून मर्यिादत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून नवे पर्व निर्माण केले पण सयाजीराव गायकवाड महाराज, छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात दिलेल्या योगदानाचे विस्मरण होते, पुरोगामी चळवळीला हे मारक आहे.
     यावेळी संमेलनाचे उदघाटक गोवा विद्यापीठ चे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंद पाटील म्हणाले, मनुवादी संस्कृती ने स्वत:च्या फायद्याचे शिक्षण दिले,केवळ ब्राम्हण आहे म्हणून त्याला महत्त्व देऊन इत्तरांचे शोषण करण्याची संस्कृती निर्माण केली. ग गवतातला शिकवण्याऐवजी ग गणपती असे शिकवले. क करवतातला न म्हणता क कमळातला सांगितले, संपूर्ण शिक्षण पध्दती कुचकामी केली व त्यामुळे बिनकामाच्या,ऐतगब्बू भटजींना बारा महिने बीनकष्टाचे भरपूर पैसा मिळण्याची सोय झाली.
      प्रास्ताविक डॉ. जे.बी.शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्र बळवंत यांनी ,तर आभार प्रदर्शन विशाखा जितकर यांनी केले.
       यावेळी डॉ. जयश्री चव्हाण, बाबुराव शिरसाट, गुलाब अत्तार,अशोक चौगुले व शिवप्रेमी शाहीर मिलिंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
     समारोपाच्या सत्रात डॉ. सुभाष देसाई, लक्ष्मण मोहिते यांनी विचार मांडले. तर प्रा.नवनाथ शिंदे यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर केला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget