Halloween Costume ideas 2015

खिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल

‘‘खिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल
दिल व निगाह मुसलमां नहीं तो कुछ भी नहीं।’’

(इक्बाल और कुरआन – डॉ. अल्लामा इक्बाल)
    ‘इक्बाल और कुरआन’ हे पुस्तकच अल्लामा इक्बालचा कल इस्लाम, मुस्लिम समाजाकडे होता हे अधोरेखित होण्यास पुरेसे आहे. तर बांगेदरातील त्याचें इस्लाम, मुसलमान, नबी करीम (स.) यांच्याविषयीचे लेखनही त्यानुषंगाने बोलके आहे. त्याचबरोबर शिकवा-जवाब-ए-शिकवा, दुआ तराना-ए-मिल्ली मधून समाजाविषयीची तळमळ स्पष्ट होते.
    मुस्लिम समाजाबरोबरच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांबाबतची विशेषत: सारे जहां से अच्छा, हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत आणि राम ना इमामे हिंद संबोधून त्यांनी त्यांचे राष्ट्रप्रेमही तेवढ्याच तळमळीचे आहे हेच सुस्पष्टपणे दाखवून दिले आहे.
    तरीही त्यांच्यावर पाकिस्तानचे जनक म्हणून बिनबुडाचे आरोप होत असतात ते पूर्वग्रहदूषितेमुळेच, यात शंका नसावी. हे हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत यातील शेरच्या पुढील ओळींवरून समजून येते-
‘‘बंदे कलीम जिसके परबत जहां के सीना
नुहे नबी का आकर ठहरा जहां सफीना
रफअत है जिस जमीं की बामे फलक का जीना
जन्नत् की जिंदगी है जिसकी फिजां में जीना
मेरा वतन वहीं है’’

    १८५७ सालचा स्वातंत्र्य लढा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक आदर्श होता. १९०५-०६ मध्ये मुस्लिम लीग, हिंदू महासभा यांची स्थापना झाली. त्याच दरम्यान बंगालची धर्माधिष्ठित फाळणी इंग्रज सत्ताधाऱ्यांनी केली आणि पुन्हा द्वेषभावनेने समाज जो ग्रासला गेला तो केवळ बंगालच्या फाळणीपर्यंत न थांबता संपूर्ण देश दुभंगला. त्यानंतर स्वातंत्र्याची जबाबदारी आली. मात्र द्वेषाचे बीज पेरून न बसता ते वाढेल कसे याचीच काळजी अधिक घेण्यात आली. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याची जबाबदारी डोक्यावर राहिलीच नाही. परिणामी बाबरी मस्जिद शहीद झाली. मुस्लिमांविरोधात बोलण्यातच राष्ट्रवाद ठरू लागला अर्थात तो तसा बेगडीच. डॉ. अल्लामा इक्बालना पाकिस्तानेच जनक ठरविताना हेच विष डोक्यात शिरले असावे. आज याच विषाचा उद्रेक झाला असल्याकारणाने पं. नेहरूंसारख्या ख्यातनाम मुत्सद्दीमुळे भारताची ओळख जागतिक पातळीवर शांतीचा कट्टर पुरस्कर्ता व आर्थिक सुबत्तेचा म्हणून ओळखली जात होती. त्याच भारत देशात आजी पंतप्रधानांच्या पराकाष्टेच्या प्रयत्नांना परदेशातून निराशाजनक प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. आधीच पेरलेल्या बिजांचा तो परिणाम तर नसेल ना – अशा वेळी पुढील शेर स्मरतो-
‘‘न समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंददोस्तांवालों।
तुम्हारी दास्तां-तक न होगी दास्तानों में।’’
    हे बोलदेखील त्याचेच ज्यांनी जगाला हे निक्षून सांगितले होते की,
‘‘क्या बात है के हस्ती मिटती नहीं हमारी (गीत सारे जहां से अच्छा)’’
    डॉ. अल्लामा इक्बाल यांच्याबाबत शोधनने जी लेखमाला प्रसिद्ध केली आहे ती आज अत्यावश्यकच होती. धन्यवाद!
    डॉ. इक्बाल मजुरांप्रती कसे भावूक होते हे जे दाखवून दिले आहे तेदेखील देशोधडीला लागलेले मिलमजूर, शेतमजूर असोत की घरमजूर, त्यांची मजुरी अविश्वासाच्या भावनेतून रोजच्या रोज निदान खेडेगावातून दिली जात नसते असा अनुभव आहे. मला वाटते की मुस्लिमांकडून तरी असे घडू नये, कारण पैगंबरे इस्लाम (स.) यांचे फर्मान – ‘‘मजुरांची मजुरी त्यांचा घाम वाळणयापूर्वी त्यांच्या हातात ठेवा.’’ असे आहे. डॉ. इक्बाल यांनी याच फर्मानाला आपल्या लिखाणांत प्राधान्य दिले असावे.
    इंग्रज निघून गेले असले तरी त्यांच्या इंग्रजी भाषेचे अतिक्रमण हे आहेच आणि ते इतर अनेक भाषांप्रमाणे उर्दू भाषेवरही आहे. परिणामी उर्दू भाषेतून आजवर ज्या मुस्लिमांनी साहित्यादि अनेक क्षेत्रांत केलेल्या कार्याबाबतची माहिती इस्लाम व मुसलमानांचे शत्रू एक तर पुढे येऊ देत नाहीत आणि नष्टही करू पाहत आहेत. ताजमहल हे ताजे उदाहरण. अशा वेळी ‘शोधन’मधून महान मुसलमान लेखक, कवी, गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, खगोलशास्त्र, तंत्रज्ञान अशा नानाविध क्षेत्रांत आपला ठसा जागतिक पातळीवर उमटवून गेले आहेत, उमटवत आहेत अशांची माहिती देऊन आणि अन्य प्रत्यक्ष चर्चासत्राद्वारे घडवून आणल्यास इस्लाम जागृतीचे कार्य यशस्वी होण्यास उपयुक्त ठरेल.
- बशीर अमीन मोडक.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget