Halloween Costume ideas 2015

मुद्द्यांचे विकृतीकरण

लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्षांद्वारे सर्वसामान्यपणे राष्ट्रहित व जनहिताशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सन २०१४ ची लोकसभा निवडणूकदेखील मागील यूपीए सरकारच्या तथाकथित निष्क्रियता, त्यांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचार, गुन्हे, महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढविण्यात आली होती. विरोधी पक्ष एनडीएद्वारा भाजपच्या नेतृत्वाखाली जनतेला अनेकानेक दिवास्वप्ने दाखविण्यात आली होती. जनतेने त्यांच्या आश्वासनांना बळी पडून त्यांच्या हातात सत्ता सोपविली होती. मात्र सत्ताधारी रालोआ सरकारचा चार वर्षांचा कालावधी लोटला तरी जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या आश्वासनांबद्दल सरकारला विचारण्यात आले असता संभाषणाची दिशाच बदलण्यात येते. देशातील जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे निवडणुकीतील मुद्द्यांना बगल देणे अथवा वास्तविक व जनसमस्यांशी संबंधित मुद्द्यांचे परिवतर्थन भावनात्मक मुद्द्यांमध्ये करणे हे स्वच्छ राजकारण होऊ शकते काय? अथवा अशा प्रकारच्या भावनात्मक व जनसमस्यांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांमुळे देशातील नागरिकांचे व राष्ट्राचे भले होऊ शकते काय? असा प्रश्न पडतो. गरीब जनता, कामगार अथवा शेतकऱ्यांच्या हितांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अथवा एखाद्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी व्यवस्थेकडून नक्षलवाद्यांचे अथवा दहशतवाद्यांचे समर्थक ठरविले जाते. जर एखाद्याने देशात वाढत्या असहिष्णुतेची गोष्ट केली, एखाद्या राजकीय पक्षाने अल्पसंख्यकांच्या हिताची गोष्ट केली अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आपले विचार व्यक्त केले तर त्याला राष्ट्रविरोधी वा पाकधार्जिणे ठरविले जाते. जर एखाद्या संघटनेने अथवा नेत्याने सर्व धर्म व जातींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सेक्युलर विचारधारेला हिंदूविरोधी ठरविण्यात येते. सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरी देण्यात आलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न जर सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला तर उत्तर मिळेल की नेहरू-गांधी परिवाराने देशाला बरबाद केले आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दोन कोटी प्रति वर्ष रोजगारनिर्मिती केली जाईल असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला तर ते सल्ला देतात की सरकारी वा खासगी वंâपन्यांमध्ये नोकरी मिळविणे हाच फक्त रोजगार नसून तुम्ही भजी-चहा-पान विका, हादेखील रोजगारच आहे. दुसरीकडे त्याचबरोबर साधूसंत, प्रवचनकार, डेरा-आश्रम संचालकांना मंत्री, खासदार व आमदार बनविले जात आहे. उत्तर प्रदेशसारखे सर्वांत मोठे राज्य तर बाबाजींच्या हवाली करण्यात आले आहे. देशाच्या लोकसभेतदेखील सत्ताधारी पक्षाचे अनेक साधूसंत आपल्या धार्मिक वेशभूषेत दिसून येतात. निश्चितच असे वाटू लागले आहे की आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत अशा बुवाबाबांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पाच बाबांना मंत्रीपदाचा दर्जा व मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा देऊन त्यांना सन्मानित केले. घर-कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना तिलांजली देऊन जे लोक त्यागी, तपस्वी, महात्मा वा धर्मोपदेशक बनतात ते किती शिकलेले असतात अथवा आपल्या जबाबदाऱ्या पार पाण्यात किती सक्षम असतात हे सांगण्याची गरज नाही. सध्या सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांद्वारे जनतेला भूलथापा ऐकवून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नेतेगणांचा वाचाळपणा अगदी चव्हाट्यावर आलेला आहे. निवडणुकच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. नेतागण एकमेकांवर खासगी प्रहार करू लागले आहेत. आपली निष्क्रियता लपविण्यासाठी दुसऱ्यांना अपमानित करणे आणि तुच्छ ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजदेखील काँग्रेसचा विरोध करून आणि नेहरूंना अर्वाच्च बोलून मत मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावरून विनाकारण वादविवाद सुरू केला जात आहे त्या जिन्नांच्या मजारचे दर्शन घेण्यासाठी भाजपचेच लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लवाजम्यासह पोहोचले होते. त्या वेळी कोणीही अडवाणींच्या विरूद्ध धरना-निरदर्शने केली नव्हती. यांना गांधी, नेहरू, जिन्ना असे सर्व शत्रू वाटतात. त्यांचे संस्कार व त्यांचा आदर्श विभाजनकारी आहे, समाजाला धर्म व जातीच्या आधारावर दुफळी माजविणारा आहे. त्यांचे विचार व आचरण शेतकरी, कामगार व महिलाविरोधी आहेत. आजचे सत्ताधारी जनतेला तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. म्हणून ते जनता व राष्ट्राच्या विकास व प्रगती आणि देशाची एकता व अखंडतेशी संलग्न मुद्द्यांना निवडणूक प्रचारातील मुद्दे न बनविता त्यांचे विकृतीकरण करण्यात मग्न आहेत.
-शाहजहान मगदुम

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget